Link copied!
Sign in / Sign up
1
Shares

तुम्हांला माहिती आहे का पुरुषांना देखील स्तनाचा कर्करोग होऊ शकतो!

           स्तनाचा कर्करोग हा एक अत्यंत घातक असा ट्यूमर आहे जो स्तन पेशीपासून सुरू होतो. स्तन कर्करोग मुख्यत्वे स्त्रियांमध्ये उद्भवते, परंतु, फार प्रमाणात हा पुरुषांमध्ये देखील आढळतो. पुरुषांचे स्तन हे स्त्रियांच्या स्तन इतके पुष्ट नसून नाममात्र असले तरी पुरुषांमध्ये स्तनाच्या ऊतीं असतात त्यामुळे स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. दुःखाची गोष्ट म्हणजे, अनेक पुरुषांना हे सत्य माहीत नाही. तसेच, स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांच्या स्तनाच्या कर्करोगाचे निदान हे उशीर होते. आपण पुरूषांना होणाऱ्या या स्तनांच्या कर्करोगाची कारणे, लक्षणे, आणि या आजाराला कसा प्रतिबंध घालावा याबाबत माहिती जाणून घेऊ.

स्तनाचा कर्करोगाची कारणे
खालील काही घटक पुरुषांना होणाऱ्या कर्करोगाची कारणे असू शकतात:
१. कुटूंबात कोणाला असल्यास ( कौटूंबिक इतिहास)

घरातील रक्ताची जवळचे नातेवाईक जसे ( आई, बहीण, मावशी) किंवा घरात कोणत्या पुरुषाला स्तनांचा कर्करोग झाला असल्यास स्तनांचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते.

२. विकिरणांचे उत्सर्जन (रेडिएशन एक्सपोजर)

ज्या पुरुषांच्या छातीवर उपचारांसाठी किंवा इतर कारणांमुळेविकिरणांचे स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते.

३. क्लाइनफेल्टर सिंड्रोम

क्लाइनफेल्टर सिंड्रोम अशी अवस्था किंवा स्थिती आहे , ज्यामध्ये पुरुषांमध्ये अतिरिक्त X गुणसूत्र आढळून येतात. तसेच हि समस्या असणाऱ्या बहुतांश पुरुषांचे वृषण किंवा लिंग लहान असण्याची शक्यता जास्त असते. आणि ही समस्या असलेले बहुतांश पुरुषांमध्ये वंध्यत्वाची समस्या आढळून येते. अश्या पुरुषांमध्ये स्त्री संप्रेरकांचे प्रमाण अधिक आढळून येते. त्यामुळे ही समस्या असणाऱ्या पुरुषांमध्ये स्तनांचा कर्करोग होण्याची शक्यता असते.

४. अति मद्यपान

मद्यपानाने देखील .मद्यपानाने देखील पुरुषांमध्ये स्तन कर्करोग होण्याची शक्यता वाढते. अति प्रमाणात पिणे हा यकृताचे नुकसान करतात, तसेच सिरोसिस होण्याची शक्यता वाढते. ज्यामुळे यकृताच्या (लिव्हर) कार्यामध्ये अडथळे निर्माण होतात, तसेच यकृताचे नुकसान होते. संप्रेरकांच्या कार्यामध्ये मध्ये यकृताची एक महत्त्वपूर्ण भूमिका असते. सिरोसिस हार्मोनल असंतुलन निर्माण करतो, परिणामी स्तन कर्करोग होण्याची शक्यता वाढते.

५. वय

वय हे देखील पुरुषांमधील स्तनाचा कर्करोग निर्माण होण्याचे कारण होऊ शकते. तारुण्यात देखील हा आजार होऊ शकतो परंतु ६० ते ७० दरम्यान वय असणाऱ्या पुरुषांना ही समस्या निर्माण होण्याची शक्यता जास्त असते.

पुरुषांच्या स्तनांच्या कर्करोगाची लक्षणे ?

 

ही लक्षणे स्त्रियांमधील स्तनांच्या कर्करोग सारखीच असतात.

१.छातीवर स्तनांच्या इथे गाठ निर्माण होणे, छातीचा भाग सुजणे, बहुतेक वेळा ही गाठ वेदनारहित असते. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होते.

२. स्तनाग्रांतून द्रव किंवा रक्तस्राव स्त्राव होणेdischarge

३.स्तनाग्रे आत वाळलेली असणे

४. छातीजवळचा स्तनाचा भाग किंवा स्तनाग्रे लाल होणे

५. छातीवरील अनियमित खड्डे

स्तनाचा कर्करोगासाठी काय उपचार आहेत?

स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या स्तनाचा कर्करोगासाठी  सारखीच उपचार पद्धती असते.

१. शस्त्रक्रिया

२.रेडिएशन

३. केमोथेरपी

४. संप्रेरक चिकित्सा (हार्मोन थेरपी)

५. औषधे

या काही मुख्यत्वे वापरण्यात येणाऱ्या उपचारपद्धती आहेत

निरीक्षणातून असे आढळून आले आहे की हार्मोन थेरपीला स्त्रियांच्या तुलनेत पुरुष जास्त योग्यरीत्या प्रतिसाद देतात.

प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत?

जरी स्तनाचे कर्करोग पूर्णपणे नष्ट होत नाही तरी स्तन कर्करोगाच्या जोखमी कमी करण्याचे काही मार्ग आहेत.

१.वजन नियंत्रणात ठेवणे

२. कर्करोगाचा कौटूंबिक इतिहास असल्यास जागरूक राहणे.

३. छातीवर आणि स्तनाच्या जवळील भागात काही लालसर होणे, गाठ होणे, स्तनाग्रांमधून काही अनियमित स्त्राव होणे.

अशी लक्षणे आढळ्यास त्वरित डॉक्तरांचा सल्ला घ्यावा. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon