Link copied!
Sign in / Sign up
6
Shares

अशी करा गावरान पुरणपोळी (व्हिडीओ )

पुरणपोळी हा महाराष्ट्रात बनणारा एक गोड खाद्यपदार्थ आहे. हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे पक्वान्न आहे. देवाला पुरणपोळी चा नैवेद्य हा विशेष सणांंच्या निमित्ताने दाखवला जातो. होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य महत्वाचा मानला जातो. (मराठी, कोंकणी: पुरणपोळी/पुरणाची पोळी ,गुजराती: પોળી, तमिळ: போளி पोली, कन्नड:ओबट्टु/होलिगे, तेलुगु:बूरेलु या बोब्बाटु या बोब्बाटलु या पोलेय्लु, भाकशालू). पोळी बनवण्याची प्रत्येक प्रांतात वेगवेगळी पद्धत आहे. महाराष्ट्र ,कर्नाटक आणि आंध्रप्रदेशामध्ये वेगवेगळी पद्धत आहे.

काही प्रांंतात पुरणपोळी ,गुळवणी ह्या गोड पदार्थाबरोबर खाल्ली जाते. गुळवणी बनवण्यासाठी साखर किंवा गूळ, वेलची, सुंठ आणि पाणी इत्यादी साहित्य वापरतात.आचे वर एका पातेल्यात पाणी,साखर,वेलची आणि सुंठ समप्रमाणात घ्यावे आणि पाण्याला उकळी येवून द्यावी. थंड झाल्यानंतर त्याच्यात दूध आणि तूप घालावे आणि पोळीबरोबर खाण्यासाठी स्वादिष्ट गुळवणी तयार होईल. पुरण पोळी देवाचा नैवेद्य म्हणून वापरली जाते. काहीजण पुरणपोळी कटाच्या आमटीबरोबर सुद्धा खातात 

स्त्रोत -बिंग मराठी आणि विकिपीडिया 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon