Link copied!
Sign in / Sign up
10
Shares

आईंनो : अशी माळा तुमच्या डोक्यावर सजवून बघा . . . .

 

केसांत फुलं माळणं हे आता ओल्ड स्टाइल किंवा काकूबाई छाप मुळीच नाही. फॅशनचा थोडा अंदाज घेतलात आणि कपड्यांसोबत फुलांचं छानसं कॉम्बिनेशन केलंत की, तुम्हीही झक्कास दिसू शकता. केसाचा आबांडा घातल्यावर थोडा मोठ्या आकाराचं फुल अंबाड्यावर घाला. हे मोठं फुल घातल्यावर इतर दागिन्यांची किंवा अॅक्सेसरीजची गरज नाही.

१) ह्या प्रकारची स्टाइल साडीवर आधिक उठून दिसते.अंबाड्याभोवती मोगऱ्याचा गजरा लावल्याने पारंपरिक लूक येतो. सिल्क साडीवर मोठे कानातले आणि अंबाड्याभोवती मोगऱ्याचा गजरा हा सध्या फॅशन ट्रेंड आहे.यासोबत सध्या दोन फुलं लावायचा ट्रेंड आहे. एकसारख्या आकाराची दोन फुलं लावल्याने कोणत्याही हेअरस्टाइलला क्लासी लूक येतो.

२) खूप हटके लूक मिळण्यासाठी तुम्ही केसात कुठेही नाजूक फुल लावू शकता. यामुळे तुमची वेगळी अशी स्टाइल स्टेटमेंट तयार होते.हेअरस्टाइलला साजेसा फ्लोरल टियारा तुम्ही घालू शकता. जो सध्या मुलींमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.

३) अंबाडा- मोगऱ्याचा गजरा किंवा एखादं फुल अंबाड्याला लावल्यास पारंपारिक लूक येतो. पण सध्या हिट असलेला मेसी बन हा प्रकारही तुम्ही फुलांसह सजवू शकता. आणि आकर्षक दिसू शकता.

४) वेणी -  वेगवेगळ्या तऱ्हेने पेढ घालून वेण्यांची अर्थात ब्रेडस् स्टाइल केली जाते. त्या तुम्ही मोकळ्या सोडू शकता किंवा त्याचा अंबाडा किंवा पोनीटेल घालू शकतो. अशा हेअरस्टाइलमध्ये तुम्ही कुठेही फुलं घालू शकता.

५) केसात घालण्यासाठी शक्यतो गुलाब, मोगरा, लीली आणि नाजूक फुलांची निवड करा. केसात जिथे ते लावणार आहात तिथं ती फुलं बॉबी पिनने बसवा आणि त्यावर हेअर स्प्रे मारा. जेणेकरुन ते निघणार नाहीत.

६) फुलं केसात लावण्यापूर्वी रात्रभर फ्रिजमध्ये ठेवा. त्यामुळे ती संपूर्ण दिवस ताजीतवानी राहतात.

७) केसात फुलं घालणार असाल तर जास्त मेकअप आणि अॅक्सेसरीज घालणं टाळा.

                  साभार - म.टा (शब्दुली कुलकर्णी)

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon