Link copied!
Sign in / Sign up
14
Shares

पुदिन्याचे हे औषधी गुणधर्म तुम्हांला माहिती आहेत का ?

तुळशीसारखा पुदिना देखील अनेक आजारांवर घरगुती उपाय म्हणून वापरतात आणि पुदिन्यातील औषधी घटकांमुळे अनेक आजारांवर औषध म्हणून वापर होतो. पुदिना हा मूळचा युरोपातील असून  भारतात देखील पुदिन्याचे पीक येते .या रोपांना एक विशिष्ट गंध असतो. पुदिन्याला संस्कृतमध्ये पुलिहा, इंग्रजीत फिल्डिमट तर शास्त्रीय भाषेमध्ये मेन्था पिपरिता म्हणतात. तो लॅबियाटी या कुळातील आहे.

 १. अपचन, आम्लपित्त, उलटी, मळमळ या विकारांवर पुदिना उपयुक्त आहे. या करता प्रकृतीच्या प्रकारानुसार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सकाळ-संध्याकाळ १-१ चमचा पुदिना रस घेतल्याने पचन क्रिया सुधारण्यास मदत होते.

२. पोटदुखीचा त्रास होत असेल तर अशा वेळी पुदिन्याचा रस १ चमचा आणि आल्याचा रस १ चमचा घेऊन त्यात चिमूटभ घालून ते प्यावे. याने पोटदुखी निश्चितच थांबते.

३. लहान मुलांना जंत झाले असतील तर त्यांना १ चमचा दोन वेळा पुदिना रस दिल्याने फरक पडतो. 

४. आवळा, पुदिना, तुळस यांच्यापासून बनवलेला काढा  मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा, संधिवात, यामध्ये उपयुक्त ठरतो.

६. पुदिना, तुळस व आले यांच्यापासून बनविलेला कपभर काढा प्यायल्याने ताप कमी होऊन आराम मिळतो. सर्दीमध्ये नाक बंद झाले असल्यास एक थेंब पुदिन्याचा रस टाकावा फरक पडतो.

७.  त्वचाविकारांवर पुदिन्याचा रस अत्यंत गुणकारी आहे. खरूज, नायटा या विकारांवर पुदिन्याचा रस त्वचेवर चोळावा तसेच १-१ चमचा पुदिना रस सकाळ- संध्याकाळ घ्यावा.

६. पुदिन्याची पाच-सहा पाने रोज चावून खाल्यास दात आणि हिरड्या स्वच्छ राहतात. आणि तोंडाला दुर्गंधी येत असल्यास ती देखील कमी होते.

७.  चेहऱ्याची त्वचा कोरडी झाली असेल चेहऱ्यावर पुटकुळ्या आल्या असतील तर त्या पुदिन्याचा रस किंवा लेपामध्ये थोडे लोणी आणि मध मिसळून त्याने चेहऱ्याला मसाज करा. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon