मुलीचे किंवा बायकोचे हृदय जिंकायचे आहे? या ७ गोष्टी नक्की करा
''ये इश्क नहीं आसां,बस इतना समझ लिजिए ,
इक आग का दरिया है और डूबके जाना है ''
प्रसिद्ध उर्दू शायर मिर्झा गालिब यांच्या या ओळींमधून प्रेम आणि प्रेमात पडणाऱ्या जोडप्यांचे सुंदर वर्णन केले आहे. आयुष्यात खरे प्रेम मिळणे सोपे नसते आणि ज्यांना असे प्रेम मिळते ते खरोखर भाग्यशाली म्हणायला हवेत.

तुम्ही तुमच्या प्रियेसाठी कोणत्याही परतफेडीची अपेक्षाविना केलेलय प्रेमात खऱ्या भावना असतात.तिच्या कडून न उघडणाऱ्या डब्याचे घट्ट झाकण तुम्ही चटकन काढून दिलेत तरीही एवढ्या छोट्याश्या गोष्टीनेही ती तुमच्या प्रेमात पडते ,हो ना? अश्याच छोट्या छोट्या गोष्टीतून तिच्या प्रेम भावना जागृत होतात
तर मग जाणून घेऊया ७ अशा नामी युक्ती ज्याने तुमची पत्नी पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल.
१.तिला समजून घ्या

बर्फाचे दोन खडे जसे एकसारखे नसतात तसेच सर्व स्त्रिया वेगवेगळ्या असतात.दरवाजा उघडून देणे एखादी साठी सुखद असू शकते तर दुसऱ्या स्त्रीसाठी केवळ छोटीशी सेवा असू शकते.तुमच्या पत्नीला कोणत्या गोष्टीने आनंद होते आणि तिला काय आवडते हे लक्षात घ्या.
२.संवाद आवश्यक आहे

एकमेकांशी मोकळेपणाने बोलणे आणि तुमच्या जोडीदाराचे म्हणणे ऐकून घेण्याने तुमचे नाते घट्ट बनते. तुमच्या आवडी आणि नापसंती जोडीदाराला सांगा याने तुम्ही एकमेकांच्या अजून जवळ याल.तुमच्या पत्नीला चॉकलेट आवडत असेल आणि तुम्हाला कदाचित वॅनिला पण परस्पर संवादाने तडजोडी सहज शक्य होतात. तुम्ही दोघे चॉकलेट सिरप घातलेले चॉकलेट आईस्क्रीम आवडीने एकत्र खाल!!
३. तुमच्या सहभाग महत्वाचा आहे

पत्नीच्या हृदयावर राज्य गाजवायाचे असेल तर तुमच्या कुटुंबात तुम्हाला समरस व्हावे लागेल. एक कर्तव्यदक्ष पिता बनून तुमची जवाबदारी पार पाडा.विश्वास ठेवा,याने तुमच्या पत्निचे मन तुमच्यासाठी हळवे बनेल आणि ती अगदी धावत तुमच्या मिठीत येईल.
४.तिच्या मनातील सर्व गोष्टी ऐका
सर्व स्त्रियांना बोलायला खूप आवडते. पतीने आपली दखल घेतलेली प्रत्येक पत्नीला आवडते. तर मग तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन तिच्याशी बोला . अगदी सध्या गोष्टी जसे कि आजचा दिवस कसा गेला वगैरे .तुम्ही तिची काळजी घेता हे बघून तुमच्याशी बॊलणे तुमच्या पत्नीला खूप आवडायला लागेल.
५.तुम्हाला तिची गरज आहे हे दाखवून द्या

तुमच्या पत्नीला आहे त्यापेक्षा जास्त गरज तुम्हाला आहे हे मान्य करा! जेव्हा कधी तुम्हाला आयुष्यात पोकळी,निरर्थकता जाणवते,आई वगळता फक्त तुमची पत्नीच तुमची हि भावना समजू शकते कारण ती स्वतः भावनाशील असते.
६.तिचे लाड पुरवा

अहो खरेच ! समस्त स्त्री वर्गाला आवडणारी गोष्ट. मुले आणि तुमची उठाठेव करण्यातच तिचा अख्खा दिवस जातो मग वेळोवेळी एखाद्या राणीसारखा लाड करवून घेणे हा तिचा हक्कच आहे.तिला हवे ते सर्व लाडाने पुरवा .
७. ती जशी आहे,त्यावर प्रेम करा

तुम्ही तिच्या दिसण्याच्या नव्हे तर तिच्या स्वभावाच्या प्रेमात पडला होता. तिचा उत्साह,तिच्यातील गुण यांनी तुम्हाला आकर्षित केले होते.तुमच्या पत्नीचे चारित्र्य आणि व्यक्तित्व यांनी तुम्हाला मोहित केले होते. तुच्या समोर तिला कुठला हि मुखवटा घालण्याची गरज नसते,म्हणूनच तुमच्या सोबत ती निश्चिन्त असते. तुम्ही तुमच्या पत्नीवर खूप खूप प्रेम करता हे तुम्हाला हि माहित आहे ना..
तर मग आता वेळ आहे तुमच्या लाडक्या पत्नीला खूप सारे प्रेम आणि कौतुक करण्याची!!
