Link copied!
Sign in / Sign up
24
Shares

या काही गोष्टी पत्नीला आपल्या पतीला सांगायच्या असतात पण ती सांगत नाही.

ज्या वेळी एखादी पत्नी अचानक रहस्यमय पद्धतीने वागू लागते त्यावेळी तिला आपल्या पतीला काहीतरी सांगायचे असते. काही व्यक्त करायचे असते. जे पतीने न सांगता ओळखावे असे तील वाटत असते किंवा त पतीने समजूतदारपणे जाणून घ्यावे असे त्याला वाटत असते. त्यामुळे ती या गोष्टी पतीला कधीच सांगत नाही. अश्या गोष्टी कोणत्या ते आपण जाणून घेणार आहोत.

१. मला त्याने सुंदर म्हणावे.

कोणत्याही व्यक्तीला स्वतःचे कौतुक आवडते. विशेषतः स्त्रीला तिच्या पतीनेतिच्या सौंदर्यांचे केलेलं कौतुक तिला फार आवडत असते. हे पतीने जाणून घेऊन तिच्या सौंदर्याचे नेहमी कौतुक करावे असे तीला वाटत असते. पतीने सुंदर म्हणल्यावर तिचा संपूर्ण दिवस छान जातो. भले ती थोडी जाड दिसायला लागली असेल तर तू अजूनही सुंदर दिसतेस असे तिला म्हणलेले आवडत असते. पण हे आपण न सांगता आपल्या पतीने ओळखावे आणि आपली स्तुती करावी असे तील नेहमी वाटत असते.

२. पुढाकार घेणे.

काही गोष्टी अश्या असतात ज्या पहिला गेलं तर फार छोट्या आणि सध्या असतात, पण त्यात आपल्या पतीने पुढाकार घ्यावा असे तील वाटत असते जे ती कधीच सांगत नाही. जसं समागमच्या बाबतीत पुढाकार घ्यावा, किंवा कुठेतरी फिरायला जायचा असेल तर पुढकार घ्यावं, बाईक वरून लांब कुठेतरी फिरायला जायचे असेल तर त्याबाबत पतीने पुढाकार घ्यावा, तसेच समजा शॉपिंग ला एकत्र गेलं तर न सांगता तिच्या हातातल्या पिशव्या घेणे अश्या सध्या अपेक्षा आपल्या पतीने न सांगता ओळखाव्या असे तील वाटत असते.

३. सरप्राईज कोणाला आवडत नाही.

स्त्रियांना सरप्राईज नेहमी आवडत असतात. त्यामुळे त्यांना सरप्राईज देण्यासाठी खूप मोठ्या गोष्टी करायची गरज नसते. फुले, चॉकलेट, किंवा कधीतरी स्वयंपाक करणे. सुट्टीच्या दिवशी सकाळी आयता देणे. अश्या छोट्या-छोट्या गोष्टी या पत्नीला आपल्या पतीने कराव्या असे तीला हे तील पतीला सांगावेसे वाटत असते. पण या गोष्टी पतीने ओळखाव्या असे तिला वाटत असते.

४. आपल्या मित्राबरोबर नक्कीच वेळ घालव पण माझ्याकडे दुर्लक्ष करू नको

हो…हल्ली प्रत्येक पती-पत्नी आपल्या जोडदीदारा त्याच्या मित्रमैत्रिणासाठी देखील वेळ द्यावा. स्वतःचे असे आयुष्य जगावे इतपत समजूतदार असतात. परंतु आपल्या पतीने मित्रांच्या नादात आपल्याकडे दुर्लक्ष करू नये असे पत्नीला नेहमी वाटत असते. पण ती हे आपल्या पतीला राग येईल वाईट वाटेल म्हणून सांगत नाही.

५ . आपल्या पतीला गमावण्याची भीती वाटत असते

प्रत्येक स्त्रीच्या मनात ही भीती असते की कोणत्याही प्रकारे आपली आवडती व्यक्ती आपल्या सोडून दुसऱ्या कोणाच्या प्रेमात पडणार नाही ना ? आपली जागा दुसरी कोणी घेणार नाही ना ही भीती पत्नीच्या मनात नेहमी असते आणि ही भीती तिला आपल्या पतीला बोलून दाखवत येत नाही

६. नात्यातील प्रामाणिकपणा हा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे.

नात्यामध्ये प्रामाणिकपणा असणे हे खूप महत्वाचे असते. आपल्या पतीने सगळ्या गोष्टी कराव्या पण आपल्याशी आणि आपल्या नात्याशी प्रामाणिक असावे. कितीही भांडणे झाले, कितीही गैरसमज झाले तरी त्याचा परिणाम नात्यावर होऊ नये. पतीने खोटे बोलून नये माझ्यासाठी नात्यातील प्रामाणिकपणा खूप महत्वाचा आहे. हे पत्नीला आपल्या पतीला सांगायचे असते. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon