Link copied!
Sign in / Sign up
2
Shares

प्रत्येक आईला या गोष्टींना सामोरे जावे लागते

दररोज आईला या अडचणींना सामोरं जावं लागतं

आई बनणं ही एक अमुल्य गिफ्ट आहे. ती एक प्रत्येक महिलेच्या जीवनाती आनंददायी बाब आहे. जगात अनेक महिलांच्या वाट्याला हा आनंद येत नाही. पण आई होण्यासोबतच भविष्यात त्यांच्या जीवनात मोठा संघर्षही असतो. पण मातृत्वाचा आनंद साजरा करायचा असेल, तर या गोष्टीला संघर्ष न मानता त्या गोष्टीला क्षुल्लक मानलं पाहिजे.

आपल्या समस्या इतरांना सांगितल्याने त्या सोडवण्यास मदत होते वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. पण अशा समस्यांना फक्त तुम्हालाच नाही तर सर्वच महिलांना सामोरे जावे लागते. अशा काही समस्यांची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१. कामाचा ताण

काम किंवा जॉब करणाऱ्या मातांना खूप ताण जाणवतो. त्यांना मातृत्व आणि काम अशा दोन्ही गोष्टांचे संतुलन साधायचे असते. हे संतुलन राखणे हे मोठे आव्हान वाटू शकते. त्यामुळे बऱ्याच गोष्टी प्लॅननुसार होत नाहीत. तुम्हाला एकीकडे आपल्या बाळाला जास्त वेळ द्यायचा असतो, पण त्याचवेळी तुम्हा कामाच्या ठिकाणच्या डेडलाईनही पाळायच्या असतात. त्यामुळे तुमचे संतुलन बिघडण्याचा धोका असतो.}

२. सकाळ

- आईची सकाळ ही खूप घाईगडबडीत जाते. आईला अनेक काम करावी लागतात. लहान मुलं ही खूप हट्टी असतात. त्यांना सांभाळण्यासोबतच घरची कामही या वेळेत आईला करावी लागतात. मुलांना तयार करायचं, त्यांच्या शाळेचा डब्बा बनवायचा, घरच्यांना नाश्ता-चहा बनवायचा. या सर्व गडबडीत महिलांना खूप ताण येतो. त्यामुळे यावेळी महिलांची चीडचीड वाढण्याची जास्त शक्यता असते.

३. झोप

- लहान मुलांना झोपी घालणं हे किती अवघड काम असतं हे प्रत्येकालाच माहीत आहे. पण तरीही तुम्हाला हे जाणून घ्यायची इच्छा आहे का ? याच एक साधं कारण आहे. लहान मुलांना खेळायला खूप आवडतं. त्यामुळे त्यांना शांतपणे झोपी जाणं खूप कंटाळवाणं वाटतं. त्यामुळे त्यांना झोपी घालणं हे खूप अवघड काम असतं.

४. वेळेचे नियोजन

- आई म्हणून जबाबादारी पाळत असतानाच तुमच्यावर इतरही अनेक जबाबादाऱ्या असतात. त्या सर्व गोष्टींसाठी वेळ काढणं ही खूपच कठीण बाब आहे. बाळाला सांभाळथ असतानाच इतर गोष्टांसाठी वेळ देताना तुम्हाला खूप कसरत करावी लागते.

५. कुतूहल

- कुतूहल ही खूप चांगली बाब आहे. पण लहान मुलांच्या बाबतीत कुतूहल ही गोष्ट एका वेगळ्याच पातळीवर असते. तसेच त्यांना सर्व गोष्टी हातात आणि तोंडाशी हव्या असतात. आईला या गोष्टीचा खूप त्रास होतो. मुलांचे कुतूहल शमवण्यासोबतच त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणंही आईसाठी खूप महत्त्वाच असतं.

६. मुलं मोठी होताना

- मुलांच लहानपण हे खूप आनंद देणार असतं. सुरूवातीला बाळासोबत खेळताना आई लाडाने सारख त्याच लक्ष आपल्याकडे वेधण्याचा प्रयत्न करत असते. पण जसं जसं बाळ मोठं होतं, तसं इतर गोष्टींतही आईला लक्ष्य देणं आवश्यक असतं. त्यामुळे मुलाकडे तेवढं लक्ष देणं शक्य होत नाही. त्यांच्याशी खेळता येत नाही. त्यामुळे मुलांनाही तुम्ही त्यांच्याशी योग्य व्यवहार करत नाही, असं वाटायला लागतं. त्यामुळे मुलं लहानाची मोठी होत असताना काही नव्या समस्या निर्णा होतात.

पण हे सर्व करत असताना या गोष्टींना संकट मन चालू नका. तुमच्यासाठी ह्या सर्व क्षुलल्क बाबी आहेत. कारण तुम्ही कोण आहात हे तुम्हाला माहीत आहे ना ? 'तुम्ही आई आहात.' 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon