Link copied!
Sign in / Sign up
15
Shares

प्रत्येक आई या सोप्प्या पद्धतीने आपला मेकओव्हर करू शकतात

 

आईचा मेकओव्हर  हे नक्की ट्राय करा

 आई ही घरातील सर्वात व्यस्त व्यक्ती असते. स्वत:कडे लक्ष देण्यास त्यांना वेळच नसतो. त्यामुळे त्यांचा पोषाखही तसा गबाळाच असतो. आई झाल्यावर महिला बऱ्याच वेळा तेच तेच कपडे घालतात. त्यामुळे स्टाईल आणि ग्लॅमर या गोष्टी त्या विसरून जातात. पण काही मातांना मात्र तसं गबाळं राहणं आवडतं नाही. त्यामुळे अशा महिलांचा मेकओव्हर करण्यासाठी आम्ही तुम्हाला इथे काही टीप्स देणार आहोत. 

फ्रेश राहा

आई असल्यामुळे तुम्हाला स्वत:ला बऱ्याच वेळा थकल्यासारखे वाटतं. साहजिकच महिला जेवढं काम करतात त्यामुळे त्या गोष्टीसाठी त्यांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही. पण त्या थकलेल्या चेहऱ्यात तेज निर्माण करण्यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा आहे. मधात साखऱ मिक्स करून त्याची जाड पेस्ट तयार करा. ती पेस्ट हळुवारपणे तुमच्या चेहऱ्यावर आणि इतर त्वचेवरही लावा आणि गोळाकार घासा. त्यानंतर चेहरा उबदार कपड्यांनी पुसा. बघा तुमचा चेहरा मऊ आणि फ्रेश झाल्याचं तुम्हाला जाणवेल.

तुमचा विशेष लूक बनवा

तुमच्या व्यक्तीमत्वाचा एक विशेष लूक असावा असं कुणाला वाटणार नाही. त्यामुळे मम्मी ड्रेसेस आणि ढगळे कपडे विसरा. तुमचा काही तरी वेगळा लूक बनवा. कपडे. चेहरा, केस या सर्व गोष्टांचा त्यात समावेश होतो. तसेच तुम्ही आई झाल्यामुळे फक्त आई आहात म्हणून पुर्वीचा तुमचा लूक बदलण्याची काहीही गरज नाही.

जर्सी ड्रेस - गबाळेपणा ते चमत्कारिक

- एकदा आई झालं की स्त्रिया स्टायलिश असण्यापेक्षा आरामदायक पोषाखाला जास्त पसंती देतात. पण यापुढे आरामदायक पोषाखासोबतच स्टाईलही कायम ठेवणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आपल्या जर्सी ड्रेसच्या तळाशी थोडी गाठ बांधा. तसेच वेगवेगळे फुटवेअरही ट्राय करा. पण ते करत असताना तुमच्या लहान मुलांच्या मागे धावणंही सोप जाईल याचाही विचार करा.

पाच मिनिटांत केशभूषा

- बऱ्याच वेळा बाळांना तयार करण्यात आईचा वेळ जातो. त्यामुळे त्यांना तयार व्हायला वेळच मिळत नाही. त्यामुळे पाच मिनिटांत कराता येईल अशा काही हेअर स्टाईल त्यांना माहीत असणं आवश्यक आहे.

फॅन्सी हाफ-अप्स

- यासाठी तुम्हाला दोन बॉबी पीन्स लागतील. तुमच्या डोक्याच्या वरच्या भागातील केस हातात घ्या. डाव्या बाजूचे केस उजव्या बाजूच्या केसांवर दुमडा. किंवा त्याउलट करा. बॉबी पीन्स चांगल्या क्वालिटीच्या आहेत याची खात्री करा.

अॅक्सेसरीज

- जर तुम्हाला क्लासी आणि ग्लॅमरस दिसायचं असेल, तर काही गोष्टींचा नक्की विचार करा. ज्वेलरी, हॅट, स्कार्फ, पर्स, मॅचिंग फुटवेअर यांचा तुम्हा योग्य प्रकारे वापर करता आला पाहिजे. त्यामुळे तुमच्यात एक वेगळाच आत्मविश्वास येईल.

टच मेक-अप

- मेक-अपसाठी खूप वेळ लागतो म्हणून आपण बऱ्याच वेळा मेक-अप करत नाही. पण साध्या कमी वेळात केलेल्या मेक-अपनेसुद्धा तुम्ही खूप सुंदर, फ्रेश आणि कॉन्फिडन्ट दिसू शकता. तसेच तुमच्या डोळ्यांना मस्कारा लावूनही तुमच्या सौंदर्यात भर घालू शकता. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon