Link copied!
Sign in / Sign up
2
Shares

मुदतपूर्व(प्रिमॅच्युअर) बाळ रडत असल्यास त्याला शांत असे करा


नवजात बालकांचे सवांद साधण्याच एकच संकेत देतात ते म्हणजे रडणे. बाळाचे रडणे म्हणजे तुमच्या पालकत्वात दोष नसतो. त्या रडण्याचे वेगवेगळे अर्थ असू शकतात जसे की,भूक, तहान,भिती,डायपर बदलणे. लहान मूल काही कारण नसतानादेखील ओरडू शकतात त्यामुळे आपण शांत आणि सकारात्मक राहणे महत्वाचे असते. मुदतपूर्व जन्माला आलेली बालके ही थोडी चंचल असतात. पूर्ण वाढ झालेल्या बालकांच्या तुलनेत या मुलांची थोडी जास्त काळजी घ्यावी लागते. ही बालके जन्माला आल्यानंतर दिर्घकाळ नवजात गर्भवस्थेतील देखभाल केंद्रा (एनआयसीयू) मध्ये असल्याने घरी आल्यानंतर नव्या वातावरणाशी जुळवून घेणे थोडे अवघड जाते. घरी आल्यानंतर त्याला कदाचित हे वातावरण खूप शांत वाटू शकते त्यामुळे सबंधित खोलीत एक शांत संगीत नेहमी सुरू ठेवावे. घरात शांतता ठेवणे कदाचित मुलांसाठी हानीकारक ठरू शकते कारण मुलांना त्याची सवय लागू शकते जोपर्यंत ते पूर्ण शांत होत नाही तोवर ते शांत झोपू शकत नाही. तुमचे बाळ जर मुदत पूर्व जन्मले असेल तर कसे शांत करता येईल यासाठी काही टिप्स बघूया.

१. शांतपणे बाळाचे सांत्वन करा

आपल्या बाळाचे सांत्वन करण्यापूर्वी स्वत:चे मन शांत करा. तुमच्या आईने ,परिचारिकेच्या अनुभवातून गेलेल्या असतात त्यामुळे नवे पालक म्हणून तुमच्या मनात थोडी कमी पणाची भावना येऊ शकते, असे वाटू शकते की, पालकत्व निभावण्यास आपण असमर्थ आहोत. त्यामुळे तुम्ही चिडचिड केली तर ते बाळासाठी योग्य नसेल. बाळाच्या रडण्याने आई-वडील म्हणून तुम्ही आधी स्वत:ला समजावले पाहिजे की, जे तुम्ही करत आहात ते योग्यच आहे. जेव्हा तुम्ही तणावाखाली असता qकवा qचतेत असता तेव्हाच आपले बाळ सुध्दा ते ओळखून अस्वस्थ होते.

 २. रडण्याचे मूळ कारण शोधा.

 बाळ जेव्हा रडायला लागते तेव्हा त्याचे नीट निरिक्षण करा. ते नेमके कशामुळे रडत आहे ने जर दुपटे ओले केले असेल तर ते वाइप्सनी पुसा, दुपटे बदला, कोरडे करा, थंडी वाजत असेल तर उबदार कपडे घाला, भूक लागली असल्यास त्वरित स्तनपान द्यावे. पेंगूळलेले असेल तर झोपवा. कधी ते तुमचे लक्ष वेधण्यासाठी सुध्दा रडू शकतात, जरी या सर्व भावना मुदतपूर्व जन्माला आलेल्या बालकांमध्ये उशीरा विकसित होतात.

३. तुमचे मूल कायम असंतुष्ट आहे असे समजू नका 

बाळ सारखे रडत असले तर त्याला त्याच्या रडण्यावरून रागाने बोलणे, चिडचिड करणे हा उपाय असू शकत नाही. तर तुमचे बाळ असंतुष्ट qकवा अस्वस्थ ही असू शकते. त्यांना असे वाटते की, त्यांच्या छोट्याशा विश्वात काही तरी बिनसले आहे आणि आता त्याचे निराकरण होणे आवश्यक आहे. बाळाला तुमच्याशी संवाद साधण्यासाठी रडण्या व्यतिरिक्त दुसरा कोणताच मार्ग नसतो. तेव्हा तुमच्या बाळाला शांत करण्यासाठी तुम्ही शांत रहा.

४. त्यांची तब्येत चिडचिडेपणामधून कळते.

एका संशोधनातून असे स्पष्ट होते की, मुदतपूर्व जन्मलेली बालके ही पूर्ण दिवसांच्या बालकांपेक्षा थोडी जास्त चिडचिडी असतात,अशी तुलना करणे योग्य नाही. मुदतपूर्व जन्मलेली मुले ही पूर्ण दिवसांच्या मुलांपेक्षा थोड्या कमी वेगाने विकास होतो थकवा थोडी मागे पडतात. मुदतपूर्व जन्मलेली बालके ही वैद्यकीयदृष्टया नाजूक असल्याने आजारी पडल्यानंतर qकवा वेदना झाल्यामुळे अधिक चिडचिड आणि अतिसंवेदनशील असतात.

 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon