Link copied!
Sign in / Sign up
17
Shares

तुमचे बाळ अपुऱ्या दिवसाचे (premature baby)आहे? हे नक्की वाचा.

बाळाचा जन्म हा प्रत्येक कुटूंबासाठी आनंदाची गोष्ट असते. पण ज्यावेळी जन्माला आलेले बाळ अपुऱ्या दिवसाचे म्हणजेच premature baby असतं  त्यावेळी तो अनुभव त्या आईसाठी आणि त्या पूर्ण कुटूंबासाठी  सुरवातीचा काही काळ हा कठीण काळ असतो. यामध्ये त्या बाळाच्या पालकांना सुरवातीचे काही दिवस अतिशय  जागरूक असणे गरजेचे असते. ही मुलं इतर मुलांपेक्षा जरा नाजूक असतात. त्यामुळे या काळात बाळामध्ये पुढील लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधणे  गरजेचे असते.

 

१) जर बाळाला श्वास घ्यायला त्रास होत असेल तर  किंवा बाळाच्या श्वास घेण्याच्या पद्धतीत काही फरक जाणवल्यास लगेच डॉक्टरांना कळवणे गरजेचे असते

२) बाळाच्या नखांजवळ नाकाजवळ आणि ओठा जवळील भाग निळसर झालेला आढळून आल्यास.

३) जर बाळाचा अंगाच्या रंगामध्ये काही बदल जाणवल्यास,

४)  जर बाळ दूध पीत नसेल, काही खात नसेल किंवा औषध घेत नसेल.

५) जर बाळ नेहमीपेक्षा कमी हालचाल करत असेल किंवा मलूल झाले असेल तर हि काळजी करण्यासारखी बाब आहे.

६)  बाळाच्या शी मध्ये किंवा उलटी मध्ये रक्त पडल्यास ही बाब डॉक्टरांच्या निदर्शनास आणून द्यावी.

७) जर बाळाला पाण्यासारखी शी होत असेल आणि आणि असे बराच वेळा झाले तर. तुमच्या बाळाची तब्बेत बिघडली आहे असे समजावे व लगेच डॉक्टरांना कळवावे.

८)  जर बाळाला आकडी किंवा फिटस आल्यासारखे जाणवले तर त्वरित डॉक्टरांकडे जावे किंवा डॉक्ट्रांना घरी बोलवावे.

९) बाळाच्या नाकातून कानातून किंवा शूच्या (शु सोडून) जागेमधून कोणता पांढरा किंवा पिवळसर किंवा इतर  द्रव येत असेल तर बाळाला इन्फेक्शन झाल्याची शक्यता असते त्यामुळे हि गोष्ट डॉक्ट्रांच्या निदर्शनास आणून देणे आवश्यक असते.

तुमच्या बाळाच्याबाबती अशी कोणतीही लक्षणे आढळल्यास घाबरून जाऊ नका. बाळाला डॉक्टरांकडे घेऊन जा किंवा डॉक्टरांना घरी बोलवा. अपुऱ्या दिवसांच्या बाळाच्या बाबतीत काही दिवस अत्यंत जागरूक राहणे गरजेचे असते. त्यामुळे काही समस्या निर्माण झाल्यास बाळाला योग्यवेळी उपचार मिळतील.

 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon