Link copied!
Sign in / Sign up
26
Shares

गर्भवती स्त्री साठी : गवारीच्या शेंगाची यम्मी भाजी


गवारीमध्ये प्रोटीन, विरघळणारे फायबर, कार्बोहाइड्रेट्स व्हिटॅमिन K, C, A भरपूर प्रमाणात आढळून येतात. या व्यतिरिक्त यामध्ये फॉस्फरस, कॅल्शियम, लोह तत्व आणि पोटॅशियम आढळून येते. विशेष म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारचे कोलेस्ट्रॉल आढळून येत नाही. गवारीला एक टॉनिक मानले जाते. गवारीत फायबरचे प्रमाण भरपूर असल्यामुळे पोटाच्या अनेक विकारांवर ती गुणकारी ठरते. एक सौम्य रेचक म्हणून गवारीचा उपयोग होऊ शकतो.

गर्भवतींसाठी गवार उपयुक्त आहे. कारण त्यात लोह आणि कॅल्शियमचा साठा आहे. गवार शेंग भाजी तशी फार लोकप्रिय नाही. मात्र मधुमेही व्यक्तींनी जरूर गवारशेंग भाजी खावी. कारण त्यामुळे रक्तातील साखर आटोक्यात राहते. या भाजीमध्ये भरपूर औषधी गुण सामावलेले आहेत. गर्भवती असताना मलावरोधाचा त्रास होत असतो म्हणून ही भाजी खाल्यामुळे ह्यात आराम मिळून जातो.

ही भाजी बनविण्यासाठी लागणारे साहित्य

* २.५ ग्राम गवारीच्या शेंगा, १ कप राजमा घ्या, पाव चमचा मीठ, आणि भाजीला फोडणी देण्यासाठी २ चमचे तेल, थोडी मोहरी, जिरे आणि कडीपत्त्याची पाने चवीसाठी.

ही भाजी कशी करायची :

* भाजी मंडईतून गवार घेतल्यावर तिला स्वच्छ पाण्यात धुवून घ्या.

* तुम्ही सकाळी ही भाजी करायचे ठरवले असेल तर राजमा अगोदरच्या रात्रीच भिजत घाला, आणि सकाळी कुकरमध्ये शिजवून घ्या.

* आता त्या गवारमध्ये थोडं मीठ टाकून शिजवून घ्या म्हणजे ती चावायला सोपी होईल

* राजमा थंड झाल्यावर त्याला मिक्सरमध्ये घाला आणि त्याची पेस्ट तयार करा.

* आता तेल टाकून त्याला फोडणी द्या.

* आता राजमाची पेस्ट त्यात घालून त्याला परतून घ्या.

* त्यात आता गवारीच्या शेंगा घालून चांगल हलवा आणि तुमची भाजी तयार. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon