Link copied!
Sign in / Sign up
68
Shares

तुम्हाला गर्भवती व्हायचेय ना ! तर हा आहार घ्या

गर्भवतीने काय खावे किंवा काय खाऊ नये यासाठी अनेक जण भरपूर माहिती देतात. ज्या स्त्रिया या अनुभवातून गेल्या आहेत त्यांच्याकडे तर यादीच तयार असते. मात्र गर्भ रहावा यासाठी मात्र फारसे कुणी माहिती देत नाही. जसे गर्भवती राहिल्यानंतर बाळाच्या पोषणासाठी काय चांगले आणि काय वाईट अशे काही पदार्थ असतात तसेच मुळातच गर्भ राहाण्यासाठीही काही पदार्थ नक्कीच मदत करत असतील.

मुळात गर्भवती राहणे म्हणजे मूल होऊ देण्याचा निर्णय हा विचारांती घ्यावा. कारण गर्भ रहावा म्हणून किंवा गर्भधारणा झाल्यानंतर आहाराचे काही पथ्य नक्कीच पाळावे लागणार.     त्याची मानसिक तयारी असणे आणि जीवनशैलीतील बदल नवरा आणि बायको दोघांनीही स्वीकारणे गरजेचे आहे.

 

आहाराबाबत दक्षता

आहार आणि आरोग्य यांचा थेट संबंध आहेत. गर्भधारणे नंतर बदल करण्यापेक्षा सुरुवातीपासूनच नवरा बायको दोघांनीही सकस आहार घेतल्यास आरोग्यदायी बाळ जन्माला येण्याची शक्यता वाढते.

सवयींमध्ये बदल

आहाराच्या किंवा एकूणच जीवनशैलीतील काही सवयी मोडणे अशक्य नसते पण अवघड जरुर असते. त्यामुळे गर्भधारणेपुर्वीच आपल्या काही सवयींवर नियंत्रण ठेवल्यास गर्भाधारणा झाल्यावर त्या सवयींना मुरड घालणे अवघड जाणार नाही.

योग्य वजन

गर्भधारणा होण्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची ठरते. अतिवजन अनेक आजारांना आमंत्रण देते शिवाय त्यामुळे मासिक पाळीचे चक्र बिघडू शकते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवले पाहिजे जेणेकरून गर्भधारणा होण्यास विलंब लागणार नाही. 

कमी वजन असेल तर थोडे वजन वाढवावे आणि जास्त असेल तर ते घटवावे. अतिवजन किंवा कमी वजन दोन्ही गर्भधारणेसाठी त्रासदायकच. अतिलठ्ठ व्यक्तींना गर्भधारणा होण्यास आणि प्रसुतीस त्रास होतो तर बारीक स्त्रियांचे बाळ कमी वजनाचे असू शकते.

कोणत्या गोष्टींचे पथ्य पाळावे हे आपण पाहिले आता पाहूया आरोग्यदायी गर्भधारणा होण्यासाठी आहार कसा आणि कोणता घ्यावा.

जीवनसत्वे

संतुलित आहार घेत असाल तर बहुतांश पोषक घटकांची पूर्तता त्यातून होतेच. पण गर्भधारणा होण्याआधीपासूनच रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य असले पाहिजे. ते १० पेक्षा कमी असल्यास गर्भधारणेचा विचार करु नये कारण आई अशक्त असेल तर बाळ अशक्तच जन्माला येते. गर्भधारणेच्या आधीपासून जीवनस्तव आणि फोलिक अ‍ॅसिड तसेच इतर पोषक घटकांचे सेवन करावे. अर्थात डॉक्टरच्या सल्ल्याने गरज भासल्यास पोषक घटकांसाठी पूरक गोळ्या किंवा तत्सम औषधे घ्यावीत. मात्र मुख्य जेवणाला ते पर्याय ठरु शकत नाहीत. तसेच शाकाहारी व्यक्तींना डी जीवनसत्व आणि बी १२ जीवनसत्वही सेवन करावे लागते. आणि प्रथिनेही अधिक प्रमाणात सेवन करावे लागतात. फोलिक अ‍ॅसिड हे देखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे हृदयविकार, लकवा, कर्करोग आणि मधुमेह रोखण्यास महत्त्वाचे आहे. फोलिक अ‍ॅसिड पाण्यात विरघळणारे असते. त्यामुळे फोलिक अ‍ॅसिडचे सेवन जास्त प्रमाणात केल्यास ते शरीराबाहेर टाकले जाते. मात्र पाण्यात विरघळणारे असल्याने भाज्या शिजवताना त्या पाण्यात ते विरघळू शकत असल्याने भाज्या कमी पाण्यात शिजवाव्यात.

दुग्धजन्य पदार्थ

गर्भधारणेपुर्वी आहारात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असावा. त्यामुळे हाडे बळकट होतात आणि गर्भाशयाच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यामुळे दुध, दही, तूप कोणत्याही पदार्थाच्या माध्यमातून त्याचे सेवन नियमितपणे करावे. त्यामुळे थोडेसे वजन वाढण्याची शक्यता असते. मात्र प्रमाणात दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्यास त्याचाा फायदा होतो हे नक्की.

मांसाहार 

ज्या व्यक्ती मांसाहार करतात त्यांनी योग्य प्रमाणात चिकन, मटण याचे सेवन करावे. त्यामुळे शरीराला प्राणीज प्रथिनांचा योग्य तितका पुरवठा शरीराला होतो. याचे सेवन करताना अतिप्रमाण टाळावे कारण त्यामुळे गर्भधारणेची शक्यता कमी होते. आणि शाकाहारी असाल तर जीवनसत्वाचा पूरक आहार घेताना त्यातून लोहाचे पुरेसे प्रमाण मिळू शकते. मासे जसे सालमन सारखे मासे खावेत. त्यामुळे ओमागा ३ मिळते. पुनरुप्तादक अवयवांमध्ये रक्ताभिसरण वाढवण्यास मासे मदत करतात. अंडी देखील प्रजनन क्षमता वाढवतात. अंड्यांमध्ये कोलीन, फॉलिक आणि ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड आणि डी जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते.

भाज्या 

पालेभाज्या हा उत्कृष्ट आहार आहे. पालक, मेथी यांच्यामध्ये फॉलेट आणि बी जीवनसत्त्वाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे बीजनिर्मितीस मदत होते. तसेच गर्भपाताची शक्यता कमी होते शिवाय बाळही सुदृढ होते.

भोपळ्याच्या बिया

यामध्ये लोहाचे प्रमाण खूप अधिक असते. ज्या स्त्रिया लोहाचे नियमित सेवन करतात त्यांना गर्भधारणा होण्यात कमी प्रमाणात अडचणी येतात. भोपळ्याच्या बिया भाजून खाल्ल्यास त्यातून भरपूर लोह मिळते.

गव्हाचा ब्रेड 

शक्यतो बेकरीचे पदार्थ खाणे टाळावे मात्र ब्रेड खायचा असल्यास गव्हाचा ब्रेड सेवन करावा. त्यात कॉम्प्लेक्स काब्र्सचे प्रमाण अधिक असते त्यामुळे ते पचण्यास अधिक कालावधी लागतो. त्यामुळे रक्तशर्करेचे प्रमाण स्थिर राहण्यास मदत होते. कारण रक्तातील इन्सुलिनचे जास्त प्रमाण हे पुनरुत्पादक क्षमतेला अडथळा ठरु शकते. त्यामुळे गर्भवती राहण्याच्या प्रयत्नात पांढरा ब्रेड टाळून गव्हाचा ब्रेड आहारात असावा.

ऑलिव्ह तेल

ऑलिव्हच्या तेलात मोनोसॅच्युरेटेड फॅटस असतात त्यामुळे इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रित राहते आणि कोणत्याही प्रकारचा दाह कमी करण्यास मदत होते. सलाड मध्ये किंवा स्वयंपाक करताना लोण्याऐवजी ऑलिव्ह तेलाचा वापर करावा.

त्याव्यतिरिक्त

 

फळे 

आंबट फळे, केळी. डाqळब, अननस यांचा आहारात समावेश करावा. केळी खाल्ल्यास गर्भधारणेविषयक तक्रारी दूर होतात. तसेच मासिक पाळी नियमित येते. आंबट फळांमधील सी जीवनसत्त्व आणि मॅगनीज मुळे वंध्यत्वाची समस्या दूर होते.

सुकामेवा

वास्तविक गर्भधारणा होण्यासाठी सर्वच प्रकारचा सुकामेवा उपयुक्त ठरतो. त्यातही बदाम खाल्ल्यास ताकद येते.

हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट असल्याने प्रजननक्षमता वाढते. तर मिरचीमुळे प्रजनन संस्थेला शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो. लसणातील सेलेनियममुळे गर्भपात होण्याची शक्यता कमी होते.

गर्भधारणेपुर्वी आहार विहार दोन्हींमध्ये सकारात्मक बदल केल्यास आरोग्यदायी गर्भधारणा होण्यास मदत होईल

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon