Link copied!
Sign in / Sign up
1
Shares

प्रेग्नन्सी टेस्ट कशा प्रकारे काम करते?

प्रेग्नन्सी टेस्ट म्हणजे काय आणि ती कशा प्रकारे काम करते?

'होम प्रेग्नन्सी टेस्ट' ही सामान्यतः साधी लघवीची तपासणी असते, जी ती स्त्री गर्भवती आहे की नाही, हे शोधते. या टेस्ट्स 'ह्युमन कोरिओनिक गोन्डोट्रोपिन (HCG)' नावाचे हार्मोन शोधतात. हे हार्मोन जेव्हा फलित अंडपेशी गर्भाशयाच्या कडेला आकर्षित होते; तेव्हा उत्सर्जित होते. हे एखादी स्त्री गर्भवती असतानाच तिच्या शरीरात सापडते.

चाचणीचा परिणाम पुढील प्रकारे दर्शविला जातो

पॉझिटिव्ह- गर्भवती किंवा

निगेटिव्ह- गर्भवती नाही

सामान्य चाचणीमध्ये HCG च्या डिटेक्टरचा वापर होतो आणि तो रेषांच्या वा रंगांच्या माध्यमातून गरोदरपणाची अवस्था दर्शवतो.

प्रेग्नन्सी टेस्टचे विविध प्रकार:

मूलभूतपणे प्रेग्नन्सी टेस्टचे दोन प्रकार आहेत. ते पुढीलप्रमाणे:

ब्लड टेस्ट- हे HCG या प्रेग्नन्सी हार्मोनसाठी रक्ताची चाचणी करते. ही ब्लड टेस्ट करून घेण्यासाठी तुम्हाला डॉक्टरांकडे जायची गरज आहे. ब्लड टेस्ट्स या लघवीच्या चाचणीच्या तुलनेत लवकर HCG शोधू शकतात. अंडाशयाच्या उत्सर्गानंतर सहा-आठ दिवसांनंतर ब्लड टेस्ट्स परिणाम सांगू शकतात. हे HCG चे अगदी छोटे प्रमाणही मोजू शकते: म्हणून हे अगदी अचूक आहे.

ब्लड टेस्ट्सचे दोन प्रकार आहेत:

१. संख्यात्मक

हे रक्तातील HCG चे प्रमाण शोधते आणि अर्भकाचे वयही सांगते. जेव्हा पालकांना अंडपेशी केव्हा फलित झाली, हे जाणून घ्यायचे असते; तेव्हा ही चाचणी केली जाते.

२. गुणात्मक

हे फक्त हो किंवा नाही हे परिणाम दाखवते. हे फक्त HCG ची उपस्थिती दाखवते; पण HPT च्या तुलनेत हे जास्त प्रभावी असते.

३. लघवीची चाचणी

अगोदर सांगितल्याप्रमाणे घरी केलेल्या प्रेग्नन्सी टेस्टलाच 'होम प्रेग्नन्सी टेस्ट' असे म्हणतात, जे सहजपणे मेडिकल स्टोअर्समध्ये मिळते. आणि ती चाचणी गरोदरपणा ओळखण्यासाठी वापरली जाते. हे ब्लड टेस्टपेक्षा कमी किमतीत होऊन जाते. याला पूर्ण होण्यास काही कालावधी लागू शकतो. कधी कधी तिचा अचूकपणादेखील संशयास्पद असतो; पण तिची सहज उपलब्धता, वेगळेपणा आणि कमी किंमत यांमुळे ती सर्वाधिक लोकप्रिय चाचणी आहे.

लघवीच्या चाचणीचे दोन प्रकार आहेत:
स्ट्रीप प्रेग्नन्सी टेस्ट

तुम्ही लघवीच्या धारेमध्ये एक विशिष्ट पट्टी पकडू शकता. HCG च्या उपलब्धतेनुसार, ही चाचणी रचनेनुसार तिचा रंग बदलते. सामान्यतः या चाचणीस परिणाम दर्शवण्यास चार-सात मिनिटे लागतात.

कप प्रेग्नन्सी टेस्ट

तुम्हाला एका कप किंवा भांड्यामध्ये लघवीचा नमुना घ्यावा लागेल आणि नंतर टेस्टचे उपकरण कपमध्ये बुडवावे लागेल. रचना आणि संकेतांनुसार ही चाचणी परिणाम दर्शवेल.

प्रेग्नन्सी टेस्ट कधी घ्यावी?

जर तुमची पाळी वेळेवर झाली नसेल; तर लगेचच तुम्ही प्रेग्नन्सी टेस्ट घेऊ शकता. ब्लड टेस्ट्ससारख्या काही चाचण्या वेळेवर न आलेल्या पाळीच्या काही दिवस अगोदरदेखील काम करू शकतात; कारण त्या HCG दर्शवण्यामध्ये अधिक संवेदनशील असतात.

होम प्रेग्नन्सी टेस्टसाठी तुम्ही ती टेस्ट कधी प्रभावी असेल, हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या लेबलवरील संकेत वाचू शकता. साधारणपणे तुमच्या नियोजित पाळीच्या एका आठवड्यानंतर हे काम करते.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon