Link copied!
Sign in / Sign up
3
Shares

प्रेग्नन्सीदरम्यान मशरूम खाणं सुरक्षित आहे का ?

मशरूम हे खूप स्वादिष्ट असल्यामुळे आपल्या सर्वांनाच आवडतात. त्यामुळे सूप, सलाड, पिझा आणि अशा बऱ्याच पदार्थांमध्ये आपण मशरूमचा वापर करतो. मशरूम हा एक बुरशीचाच प्रकार आहे. पण मशरूमचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. मशरूममध्ये अनेक पोषक घटक, आवश्यक असलेले व्हिटॅमिन्स, खनिजं आणि प्रोटीन्स असतात.

पण बऱ्याच वेळा प्रेग्नन्सीच्या काळात मशरूम खावं की नाही याविषयी महिलांच्या मनात संभ्रम असतो. त्यांना बरेज जण या काळात मशरूम न खाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे मशरूम खाण्याविषयी त्यांच्या मनात गोंधळ असतो पण मशरूमसंबंधी दिलेले सल्ले पूर्णपणे चुकीचे असतात असंही नाही. पण बऱ्याचवेळा चुकीचेही सल्ले दिले जातात.

गर्भातील बाळाची वाढ आणि आरोग्य ही पूर्णपणे आई कोणता आहार घेते यावर अवलंबून असते. त्यामुळे डॉक्टर काय खावं काय नाही याविषयी सल्ले देतात. तसेच मद्यपान, धुम्रपान असा सवयींपासून दूर राहण्यासही सांगतात. तर आता आपण बघुया की अशा मातांसाठी मशरूम सुरक्षित आहे की नाही.

मशरूम हे अशा मातांसाठी पूर्णपणे सिरक्षित असतात. त्यामुळे तुमच्या आहारातून मशरूमला वगळण्याचे काहीही कारण नाही. पण त्याचवेळी काही प्रकारचे मशरूम हे प्रेग्नन्सीदरम्यान अपायकारक असतात हेही महिलांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कच्चे मशरूम, मॅजिक मशरून आणि विषारी मशरूम महिलांनी टाळणं आवश्यक आहे. या तीन मशरूमशिवाय इतर सर्व मशरूम हे आरोग्यदायी, पोषक आणि औषधी मुल्य असलेली असतात.

मॅजिक मशरूममध्ये काही केमिकल्स असतात. त्यामुळे तुमच्या मेंदूवर परिणाम होऊ शकतो. त्याचा परिणाम तुमच्या गर्भात वाढणाऱ्या बाळावरही होऊ शकतो. त्यामुळे या प्रकारच्या मशरूमपासून दूर राहणे कधीही योग्यच. तसेच बाळांतपणानंतर बाळाला दूध पाजतानाही हे मशरूम खाणे टाळाच. जंगली मशरूम घेत असताना काळजी घ्या. त्यात विषारी अंश तर नाही ना याची खात्री करा. तसेच प्रेग्नन्सीच्या काळात मशरूम आहारात घेताना ते योग्य प्रकारे धुवून आणि बनवून खा.

अन्यथा मशरूम हे प्रेग्नन्सीच्या काळात आणि नंतरही खाण्यासाठी खूप आरोग्यदायी आणि सुरक्षित आहेत. मशरूममध्ये बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असलेले प्रोटीन्स आणि फायबर असतात. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा तुमचा त्रासही कमी होईल. तसेच मशरूममधील अॅण्टीऑक्सिडंट्समुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते.

मशरूममध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे तुमच्या रक्तातील हिमोग्लोबिन वाढम्यास मदत होते. तसेच शरीरातील डी आणि बी जीवनसत्व वाढण्यासही मदत होते. त्यामुळे हाड मजूत होतात. त्वचा आणि पचनप्रक्रियाही चांगली राहते.

शियटेक आणि मयटेक या औषधी मशरूममध्ये बेटा ग्लुकान असते. त्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे कॅन्स, ट्यूमर आणि इतर बुरशीजन्य रोग दूर राहतात. मशरूममध्ये असलेल्या आवश्यक पोषक घटक आणि व्हिटॅमिन्स हे बाळाच्या वाढीसाठीही उपयुक्त असतात. तसेच मशरूम चविष्ट असल्यामुळे विविध प्रकारच्या डिशेशमध्येही ते वापरता येतात. तुम्ही इंतरनेटवर पाहून मशरूमच्या वेगवेगळ्या डिशेश बनवू शकता.

जर तुमच्या मनात एखाद्या मशरूमविषयी काही शंका असेल इंटरनेववरून माहिती मिळवण्यापेक्षा आधी तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा. त्यांचा सल्ला घ्या. इंटरनेटवर खूप सारी माहिती उपलब्ध असते. ती तुम्हाला गोंधळात टाकणारी आणि अगदी दिशाभूल करणारी अशू शकते. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon