Link copied!
Sign in / Sign up
29
Shares

गरोदरपणात येणाऱ्या पेटक्यांवर (क्रॅम्प्स cramps) हे ७ उपाय जे तुम्हांला नक्कीच उपयुक्त ठरतील

ज्यावेळी तुमची प्रेगन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येते त्यासारखा आनंदाचा क्षण कोणताच नसतो. तो आनंद अवर्णनीय असतो ज्यावेळी बाळ पहील्यांदा पोटात लाथ मारते आणि त्याच्या अस्तित्वाची जाणीव होते त्या आनंदापुढे सगळ्या गोष्टी छोट्या असतात . पण हा आनंद काही समस्या पण बरोबर घेऊन येतो जसे मळमळणे, उलट्या, काही गोष्टी नकोश्या वाटणे, छातीत जळ-जळ होणे, उदासीनता, पाठदुखी,पाय सुजणे अश्या अनेक समस्यांना या काळात सामोरे जावे लागते.

या समस्यांपैकी एक सतावणारी आणि त्रासदायक अशी समस्या म्हणजे पायाला वात किंवा पेटके म्हणजेच क्रॅम्प्स येणे. या काळात ही समस्या विविध कारणांमुळे निर्माण होत असते. आणि ती प्रचंड वेदना देणारी असते. या त्रासा मागचे मुख्य कारण म्हणजे वजनात सातत्याने होणारी वाढ हे असते. आणि जसं -जसे दिवस येतात म्हणजेच गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात वाढत्या वजनाबरोबर हा त्रास वाढायलाच लागतो. कधी-कधी हे क्रॅम्प्स गरोदरपणातील इतर शाररिक बदलांमुळे देखील येत असतात. तसेच गरोदर असताना लॅक्टीक आणि प्यूर्यूव्हीक ऍसिडस् तयार करण्याची प्रक्रिया आपल्या पायच्या स्नायूंमध्ये त्रासदायक आकुंचन आणि क्रॅम्प्स निर्माण करते.

 

खालील ६ उपाय हे तुम्हांला येणाऱ्या क्रॅम्प्स पासून तुमची त्वरित सुटका करण्यात मदत करतील

१. पाय उंचावर ठेवा

दिवसाच्या शेवटी ज्यावेळी तुम्ही झोपायला जाल त्यावेळी पाय उंचावर किंवा उशीवर ठेवा. त्यामुळे बराच फरक पडेल. बऱ्याचवेळा दिवसभर उभे त्यामुळे रक्तभिसरण प्रकियेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे पायांमध्ये क्रॅम्प्स येण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे झोपायच्यावेळी थोड्यावेळ पाय उंचावर किंवा उशीवर ठेवल्यास आराम पडतो. तसचे तुम्ही गरम पाण्याच्या पिशवीने देखील पायाला शेक देऊ शकता ( हा शेक फक्त पायलाच द्यावा )तसेच पाय थंड पडले असल्यास मोजे घातल्याने देखील पायाला उबदार वाटून थंडीने किंवा गारठ्याने येणारे क्रॅम्प्स कमी होतात (मोजे घातल्यावर गुळगुळीत फारशीवरुन चालताना काळजी घ्या )

२. योग्य चप्पल-बूट निवडा

पायाला योग्य बसणारे टाच नसलेले-फ्लॅट चप्प्पल बूट हे गरोदरपणात तुमच्या शरीराच्या भाराचे संतुलनराखण्यास मदत करतात आणि चालताना फिरताना पायाला आणि शरीराला योग्य तो आधार देतात. पायाला योग्य तो आधार मिळाल्याने पायाला क्रॅम्प येणे कमी होते.

३.जास्त प्रमाणात मीठ खात आहात ?

गरोदर असताना तुमच्या आहारात जरा मिठाचे प्रमाण जास्त असले तर त्याने देखील तुम्हांला पायाच्या या समस्येला तोंड द्यावे लागत असेल.तसेच यामुळे पायावर सूज देखील येण्याची शक्यता असते. आहारातील जास्त प्रमाणातील मिठामुळे तुमच्या शरीरीतील पाण्याची पातळी कमी होण्याची शक्यता असते त्यामुळे जर तुमच्या आहारात मिठाचे प्रमाण जास्त असल्यास ते कमी करा किंवा शक्य नसल्यास थोड्या-थोड्या वेळाने थोडे-थोडे पाणी पिऊन शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य ठेवा 

 

 

४. शाररिक हालचाली

या काळात पायात खूपच क्रॅम्प्स येत असतील तर जर शाररिक हालचाली जास्त करत असाल तर त्या कमी करा. किंवा नुसत्या एका जागी बसून असाल तर तसे न करता डॉक्टरांची परवानगी असल्यास थोडे चाल घरातील किरकोळ कामे करा थोडी हालचाल करा

५. पोषक आहार

 

आहारातील काही जीवनसत्वाची कमतरता हे देखील क्रॅम्प्स येणे पाय दुखणे याचे एक कारण असू शकते त्यामुळे या काळात पोषक आहार घेणे आवश्यक असते. आहारात पोटँशिम,मॅग्नेशियम सारखी जीवनसत्वे असणे आवश्यक असते. तसेच पायाला बळकटी येण्यासाठी आहारात काही फळांचा आणि काही कडधान्यचा समावेश असणे आवश्यक असते. यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने कोणती फळे आणि कडधान्ये खावीत हे जाणून घ्यावे.

६. विशिष्ट प्रकारच्या आरामदायक उश्यांचा वापर करा

या काळात पायांना आणि पोटाला आधार देणाऱ्या विशिष्ठ प्रकाच्या उश्या मिळतात त्याचा वापर करावा. या गरोदर स्त्रियांना स्नायूंना येणारा ताण कमी करण्यासाठी मदत करतात.

७. शेवटचे पण महत्वाचे… काळजी करू नका.

हे येणारे पेटके हे गरोदरपणात वाढण्याची शक्यता असते तसेच जास्त वेदनामय असण्याची देखील शक्यता असते, प्रसूतीनंतर हे पेटके कमी होऊन हळू--जातात. त्यामुळे वरील काही उपायाचा वापर करून ते कमी करण्याचा आणि वेदना कमी करण्याचा प्रयन्त तुम्ही करू शकता. त्यामुळे तुम्ही जर काळजी करत बसलात किंवा चिंता करत बसलात तर हा होणार त्रास वाढण्याची शक्यता असते. आणि या क्रॅम्प्स बद्दल तुमच्या जोडीदाराला आणि घरातल्या व्यक्तीला सांगून ठेवा म्हणजे अचानक सहन न होणारे क्रॅम्प्स आले तर घरातील व्यक्ती तुम्हांला मदत करू शकेल.

तुमचा जर असा पाय दुखण्याचा किंवा क्रॅम्प्स येण्याचा काही अनुभव असेल तर आम्हांला नक्की सांगा आणि तुम्ही त्यावेळी काय उपाय केले हे देखील सांगा 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon