Link copied!
Sign in / Sign up
21
Shares

प्रवास करताना गाडी लागत असेल तर . .

                 अनेक स्त्रिया प्रवास करण्याचे टाळतात ह्याचे कारण हे की, प्रवास त्यांना गाडी लागते. म्हणजे त्यांना ओमेटिंग होत असते. आणि ह्यामुळे नवऱ्याला व मुलांना त्रास होईल आणि स्वतःलाही खूप त्रास होतो म्हटल्यावर ते टाळतात. पण ह्या ब्लॉगमधून तुम्हाला काही उपाय सांगण्याचा प्रयत्न करतोय की, त्यामुळे ही समस्या सोडविता येईल व सुटेल.

१) लिंबू हे ओकारी आणि मळमळीवर एक प्रभावी औषध आहे. त्यामुळे प्रवासाला जाताना लिंबू सोबत घेऊन जा. जेव्हा मळमळ वाटेल तेव्हा लिंबाचा वास घ्या.

२) ओकारीवर उत्तम औषध म्हणजे जलजिरा. यामुळे शरीराला थंडावाही मिळतो व मळमळही थांबते.

३) लिंबावर मिरे पावडर आणि काळं मीठ टाकून ते चाटल्यास ओकारीपासून आराम मिळतो. त्यामुळे प्रवासात सोबत मिरे असुद्या.

४) प्रवासात जाण्याच्या आधी वेलची टाकलेला चहा पिल्यास प्रवासात आरामात मिळतो. तसेच सोबत वेलची नेऊन चघळल्यास मळमळ होत नाही.

५) आल्यामध्ये अँटी एमेटिक तत्व असतात त्यामुळे आल्याचे प्रवासात सेवन केल्यास ओकारीआणि मळमळीपासून आराम मिळतो.

६) प्रवासाला निघताना एका बाटलीत लिंबू आणि पुदिन्याचा रस सोबत न्या. जमल्यास त्यात काळे मिठं टाकलत तर फायदाच होईल. यामुळे ओकारी व मळमळ दूर होते.

७) तुम्ही प्रवासात असाल तेव्हा कुटलेली एक चिमूट लवंग साखर किंवा काळ्या मिठासोबत खाल्ली की मळमळीपासून आराम मिळतो. त्यामुळे प्रवासात नेहमी लवंग सोबत ठेवावी.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon