Link copied!
Sign in / Sign up
14
Shares

प्रसूतीनंतरचे संप्रेरकीय (हार्मोन्स)बदल

जर प्रसूतीनंतर तुम्हाला वाटत असेल की आपल्या शरीरात होणारे बदल संपले. तर तुमचा हा खूप मोठा गैरसमज आहे. प्रसूतीनंतर संप्रेरकांमुळे (हार्मोन्स बदलामुळे )शरीरामध्ये बदल घडून येतात. तुमच्या बाळाच्या अवयवांच्या वाढीसाठी ही संप्रेरके मदत करतात. गर्भधारणे नंतर लगेच ही संप्रेरके पुन्हा सामान्य स्थितीत येतात.

तुमच्या अस्थिर संप्रेरकांमुळे ( हार्मोन्स) खालील सामान्य अडचणी निर्माण होतात :

१.  दुखरे स्तन

तुम्हाला स्तनांमध्ये जडपणा जाणवेल. स्तनपानामुळे आलेल्या ताणाचा हा परिणाम असू शकतो. संप्रेरकांतील असमतोलपणामुळे स्तन जाड होऊ शकतात. दूध  निर्मितीसाठी व दुधाच्या वाढीसाठी हीच संप्रेरके कारणीभूत असतात. प्रसूती नंतरच्या पहिल्या वर्षात स्तनांच्या आकार सतत बदलण्याची शक्यता असते.

२. योनिमार्गाद्वारे होणाऱ्या वेदना आणि स्त्राव

ज्या द्रव्यपदार्थांचे व रक्ताचे घटक गर्भधारणेच्या काळात स्त्रवत नाहीं ते गर्भधारणेच्या पहिल्या काही आठवड्यांमध्ये बाहेर येऊ शकतात. अशावेळी योनीमार्गाचा योग्य दक्षता घेणे हे तुमच्यासाठी गरजेचे असते. या काळत योनीमार्गावर  कोणत्याही प्रकारचा दबाव व तणाव टाळा.

३. वजन कमी करण्याची अक्षमता

गर्भधारणेनंतर साठलेली चरबी लगेच  कमी करणे हे तुमच्यासाठी केवळ अशक्य असते. याचे मुख्य कारण म्हणजे संप्रेरकांची कार्यशीलता आहे. यावर मात करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने केलेला योगाभ्यास उत्तम; ज्यामुळे काही महिन्यांमध्ये निरोगी शरीर मिळू शकते. वजन कमी न होणाऱ्या निराशेपोटी तुम्ही नाराज होऊ शकता पण ही खात्री बाळगा की तुमचे शरीर काही महिन्यातच सामान्य स्थितीत येईल.

४. केसगळती

प्रसूतीनंतर तुम्हाला मोठ्या प्रमाणात केस गळती झालेली जाणवते. गर्भधारणेनंतर तुमच्या संप्रेरकांमुळे तुमच्या केसांचंच दाटपणा वाढतो. बाळाच्या जन्मानंतर शरीर पुन्हा पूर्वपदावर येण्याच्या मार्गावर असते. या प्रक्रियेमध्ये अतिरिक्त वाढलेले केस गळण्याची शक्यता असते. 

५. निद्रानाश

झोपविरहित रात्री ह्या गर्भधारणेचा सामान्य परिणाम आहेत. या पैकी एक कारण असे कि बाळ पोटात लाथा मारते असे वाटत राहते. एका अंगावर झोपायच्या सवयीमुळे सरळ पाठीवर ,पोटवर झोपताना दचकून जाग येते. तुमच्या आत हालचाली जाणवणे हे एक सामान्य लक्षण आहे आणि तुमचे शरीर काही काळातच पूर्वपदावर येत असते . तुमच्या शरीरातील संप्रेरकेसुद्धा निद्रानाशाला  कारणीभूत असतात. म्हणून धीर धरणे हेच उत्तम. वर नमूद केलेली लक्षणे काही महिन्यातच नाहीशी होतील.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon