Link copied!
Sign in / Sign up
9
Shares

प्रसूतीनंतर लगेच संभोग करणे का टाळावे.


कोणत्याही प्रकारची प्रसूती असो, नैसर्गिक म्हणजेच योनीमार्गाने होणारी किंवा सी-सेक्शन प्रसूती म्हणजे एक दिव्यच असते आणि प्रसूती नंतर डॉक्टर काही दिवस संभोग करू नका असा सल्ला देत असतात. गरोदर असताना आणि प्रसुती नंतर स्त्रीला पूर्ववत होण्यास काही काळ जावा लागतो. त्यामुळे डॉक्टर काही प्रसूतीनंतर संभोग टाळण्याचा सल्ला देतात. तसेच पुढे काही करणे दिली आहेत त्यामुळे डॉक्टर संभोग टाळण्याचा सल्ला देतात.

१. मोठ्या प्रमाणात होणारा रक्तस्त्राव

बहुतेक महिलांना प्रसूतीनंतर देखील भरपूर रक्तस्त्राव होत असतो. हा रक्तस्त्राव मासिकपाळी दरम्यानच्या अति रक्तस्त्राव होणाऱ्या दिवसासारखा असतो. त्यामुळे साधारणतः हा रक्तस्त्राव पूर्णतः थांबे प्रयन्त संभोग करू नये असा सल्ला देण्यात येतो

२. टाक्यांना इजा होण्याचा धोका

नैसर्गिक म्हणजेच योनिमार्गाच्या प्रसूतीनंतर बहुतेक वेळेला योनीला टाके घालावे लागतात आणि सी-सेक्शन प्रसूती नंतर देखील ओटीपोटाजवळ टाके असतात त्यामुळे दोन्ही प्रकारच्या प्रसूतीनंतर टाके निघण्याचा आणि टाक्याने इजा होण्याचा धोका असतो. या जखमा बऱ्या होण्यासाठी वेळ जावा लागतो त्यामुळे प्रसूतीनंतर लगेचच संभोग करू नये असा सल्ला देण्यात येतो.

३.गर्भाशयाचे संक्रमण

प्रसूतीनंतर लगेच संभोग केल्याने या संक्रमणाची शक्यता फक्त योनिमार्गाद्वारे प्रसूती झालेल्या स्त्रियांनाच नाही तर सी-सेक्शन प्रसूती झालेल्या स्त्रियांना देखील होऊ शकते. त्यामुळे कमीत-कमी ६ आठवड्यानंतर डॉक्तरांच्या सल्ल्याने तुम्ही संभोग करू शकता.साधारणतः प्रसूतीच्या ४-६ आठवड्यानंतर संभोग करण्याचा सल्ला दिला जातो. कारण प्रसूती दरम्यान झालेल्या जखमा बऱ्या होण्यासाठी कमीत-कमी एवढा कालावधी जावा लागतो.

४. वेदना

प्रसूतीनंतर लगेचच संभोग केल्यास काही स्त्रियांना संभोग दरम्यान असह्य अश्या तीव्र वेदना जाणवण्याची शक्यात असते.

हे झाले शाररिक परंतु प्रसूती नंतर ज्यावेळी तुम्ही (स्त्री) खरोखर मनाने संभोगासाठी तयार होते त्यावेळी संभोग करावा. कारण गरोदरपणाचे नऊ महिने आणि त्यानंतरची प्रसूती या सगळ्यांमधून स्त्रीला मनाने आणि शरीराने संभोगासाठी टायर होण्यास काही काळ जावा लागतो. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon