Link copied!
Sign in / Sign up
0
Shares

प्रसुतीपूर्व आणि डिलिव्हरी झाल्यावर योगा करता येईल ?

सध्या प्रसुतीपूर्व योगा करायला आता बऱ्याच स्त्रियांची पसंती आहे. आणि त्याबद्धल आता आवडही तयार झाली आहे. स्त्रीला गरोदरपणात आणि डिलिव्हरीच्या वेळेला ज्या समस्या येतात त्या प्रसुतीपूर्व योगाने दूर करता येतात. प्रसुतीपूर्व योगा हा तुम्हाला प्रसूतीच्या कळा सहन करण्याची शक्ती देत असतो. आणि त्याचबरोबर तुमच्या गर्भातल्या बाळावर त्याचा चांगला परिणाम होऊन बाळ सदृढ होत असते. आणि हे बाळ इतर बाळांपेक्षा वेगाने शिकत असते. 

स्त्रीचे गर्भारपण हे जादुई आणि आनंदाने भरलेला प्रवास असतो. ज्यामध्ये तुम्ही एका नवीन जीवाला जन्माला घालून बाळासोबत तुमच्याही नवीन जीवनाची सुरुवात करत असतात. आणि हा प्रवास जितका आनंदाचा वाटतो तितकाच तो खूप इमोशनल असतो. कारण ह्यात हार्मोन्समध्ये बदल होत असल्याने स्वतःला स्थिर आणि शांतही ठेवायचे असते तेव्हा योगा तुम्हाला ह्यावेळी खूप मदत करत असतो. ह्या दिवसात येणारी चिंता, नैराश्य, चीड-चिडपणा दूर होण्यासाठी प्रसुतीपूर्व योगा करायला हवा.

नवीन होणाऱ्या आईंसाठी प्रसुतीपूर्व आणि प्रसूतीनंतर योग करण्याचे फायदे

१) बाळाला जन्म देण्यावेळी स्नायूंवर खूप ताण पडत असतो आणि हा ताण सहन करून तुमची डिलिव्हरी सुखकर होईल.

२) ह्यामुळे गर्भवती स्त्रीच्या शरीराची लवचिकता आणि शरीराला मजबूतपणा येत असतो.

३) गर्भारपणात होणाऱ्या हार्मोन्स संतुलित करण्याची शक्ती मिळते.

४) रक्तदाबाची समस्या असेल तर त्याला मेंटेन करता येऊन तुम्हाला झोप चांगली मिळेल.

५) गरोदरपणात येणाऱ्या पाठदुखीला, डोकेदुखी आणि मॉर्निंग सिकनेस कमी करतो.

६) काही स्त्रियांना श्वास घ्यायला अडचण येते तेव्हा ह्यामुळे ती समस्या दूर होते.

७) गरोदरपणात बऱ्याच स्त्रियांचे खूप वजन वाढून जाते. आणि त्यांना ह्या वजनाचे खूपच दुःख असते की, हे कमी होईल की नाही तेव्हा योग्य तुम्हाला बॅलेन्स ठेवते. वजन वाढत नाही.

प्रसुतीपूर्व योगा तुम्हाला करता येईल ?

जर तुम्ही अगोदर योगा केला नसेल तरी तुम्ही गरोदरपणाच्या दुसऱ्या त्रैमासिकापासून 14 व्या आठ्वड्यापासून सुरु करू शकता. आणि जर तुम्ही अगोदर योगा केला असेल आणि तुम्ही डॉक्टरांना विचारले असेल आणि तुमच्या शरीरात काही कॉम्प्लिकेशन नसतील तर तुम्ही पहिल्या त्रैमासिकापासून सुरु करू शकता.

प्रसूतीनंतर योगा केव्हा करता येईल ?

तुम्ही डिलिव्हरीनंतर सहा आठवड्यांपासून योगा सुरु करू शकता, पण जर तुमची सिझेरियन किंवा डिलिव्हरीमध्ये काही अडचणी आल्या असतील तर 12 आठवड्यानंतर तुम्ही योग सुरु करू शकता. 

 साभार - आदिती फडणीस आणि डॉ. शिल्पी झा (फिजिओथेरपिस्ट आणि योग शिक्षिका)  

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon