Link copied!
Sign in / Sign up
19
Shares

प्रसूती नंतर या ५ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

       ९ महिन्याची बाळाची प्रतीक्षा, त्यानंतर झालेला बाळाचा झालेला जन्म हा सगळा प्रवास जरी खूप छान असतो. पण तरी ज्यावेळी तुम्ही बाळाला जन्म देता त्यावेळी त्या ९ महिन्यातले सगळे कष्ट आणि कठीण दिवस संपल्या सारखे वाटते. आणि तुमचे इवल्याश्या पिल्लाबरोबरचे आनंदाचे दिवस सुरु होतात. तुमची त्या कडीं दिवसातून सुटका झाली असते वाटत असले तरी काही दुखणी आणि लक्षणे अशी आहेत,ज्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात येते आणि त्यामुळे भविष्यात अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. या समस्या निर्माण होऊ नये म्हणून पुढील काही लक्षणे आणि त्रास होताच लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हि लक्षणे कोणती ते आपण पाहणार आहोत

१. पाठदुखी आणि डोकेदुखी 

प्रसूतीनंतर होणारी पाठदुखी आणि डोकेदुखी ही कदाचित प्रसूती दरम्यान देण्यात येणाऱ्या भुलेचा दुष्परिणाम असण्याची शक्यता असते. त्यामुळे सतत पाठदुखणे आणि डोकेदुखी असा त्रास होत असेल तर ही पाठदुखी आणि डोकेदुखीचे कारण काय आहे हि चुकीच्या झोपण्याच्या पद्धतीमुळे आहे का भुलेच दुष्परिणाम आहे , हे जाणून घेणे आवश्यक असते. या करता डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. तसेच ही पाठदुखी व डोकेदुखी प्रीक्लॅम्पसियामुळे देखील होण्याची शक्यता आहे.

२. नकारात्मक विचार आणि नैराश्य

जर तुम्हांला सतत मूड स्विंग होत असतील तर सतत जर नकारात्मक विचार मनात येत असतील तर या लक्षणांकडे कडे दुर्लक्ष करू नका. याला प्रसूतीनंतर येणारे नैराश्य म्हणतात. बहुतेक वेळा स्त्रिया या मानसिक समस्याबाबतीत दुर्लक्ष करतात आणि हळू-हळू या गोष्टी गंभीर स्वरूप धारणा करतात. आणि त्यावेळी या गोष्टी आटोक्यात येते हे अतिशय कठीण जाते. प्रसूती नंतर येणारी उदासीनता नैराश्य ही फार सामान्य आणि बहुतांश महिलांमध्ये निर्माण होणारी समस्या आहे. परंतु असे असले तरी याबाबत स्त्रीरोगतज्ज्ञांशी बोलून सल्ला घेणे आवश्यक असते.

३.अति रक्तस्त्राव

         प्रसुति पश्चात् रक्तस्त्राव हे आणखी एक महत्वाचे लक्षण ज्यासाठी आपण तयार असणे तयार आवश्यक आहे. बाळाच्या जन्मानंतर, काही दिवसांपासून काही रक्तस्त्राव होतो. आणि ही सामान्य गोष्ट आहे, तरीही, जर जास्त रक्तस्राव असेल तर आपल्याला त्वरित आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

४. छातीत दुखणे

स्तनपान नंतर छातीत दुखणे असल्यास किंवा श्वास घेण्यास त्रास झाल्यास हे गर्भधारणेनंतर निर्माण होणाऱ्या काही समस्या पैकी समस्या असण्याची शक्यता असते. किंवा काही संक्रमण (इन्फेक्शन) असू शकते. त्यामुळे जास्त विलंब न करता ताबडतोब वैद्यकीय उपचार मिळविणे महत्वाचे असते.

५. अधिक प्रमाणातील ताप

ताप सामान्यपणे काही आजाराचे सूचना देणारा असतो किंवा एखाद्या रोगाच्या सुरुवात देखील असू शकतो. ज्यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तसेच आपल्या शरीरातील ऍन्टीबॉडीजचे कार्य बंद होण्यामुळे ताप देखील होऊ शकतो. म्हणून, जर आपल्याला सतत जास्त प्रमाणात ताप येत असले तर याबाबत डॉक्टरांशी बोलून घ्या. 

या अश्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका अन्यथा भविष्यात गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळीच लक्षणे ओळख आणि त्यावर डॉक्तरांचा सल्ला आणि उपचार घ्या. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon