Link copied!
Sign in / Sign up
15
Shares

प्रसूतीआधी व नंतर योनिद्वारे होणारा स्त्राव.

जर तुम्ही गरोदरपणात आणि प्रसुतीनंतर योनिद्वारे काही प्रकारचा द्रवस्त्राव अनुभवला असेल किंवा अनुभवत असाल आणि याविषयी तुमच्या मनात शंका असेल तर हा लेख तुमच्यासाठीच लिहिला गेला आहे.
योनिद्वारे होणारा हा स्त्राव वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. तसेच यामागील कारणेही वेगळी असू शकतात. खाली दिलेल्या कारणांमुळे तुम्हाला अनुभव येत असू शकतो.

१.  यीस्ट संक्रमण 

 

तुम्ही कदाचित याविषयी यापूर्वी ऐकले देखील असेल. हा योनिद्वारे होणारा सर्वात सामान्य प्रकारचा स्त्राव आहे. हा द्रव स्त्राव पांढऱ्या रंगाचा असतो आणि यास कोणताही वास येत नाही. या संक्रमणामुळे तुमच्या योनीवरील भागावर सूज येते आणि कधी कधी दुखू देखील शकते. परंतु योग्य उपचारांद्वारे हे सहजपणे लवकर बरे होऊ शकते.
यात चिंता करण्यासारखे काहीच नाही. शरीरात असणाऱ्या संप्रेरकांच्या असमानतेमुळे हा स्त्राव होतो. गरोदरपणात हे संक्रमण होण्याचे प्रमाण मोठे आहे. वर सांगितल्याप्रमाणे यावरील उपचार सोपे आणि सहज आहेत.
 
२. यौन रोग ( Sexually Transmitted Diseases ) 

अशा स्त्रावाचे सगळ्यात महत्वाचे दुसरे कारण असू शकते ते म्हणजे लैगिक रोग. गर्भारपणात असुरक्षित संभोग केल्यामुळे असे रोग उद्भवतात. यामध्ये होणारा स्त्राव हा पिवळ्या किंवा हिरवट पिवळ्या रंगाचा असतो आणि याचा दुर्गंध येतो. स्त्रियांना होणाऱ्या लैगिक रोगांमध्ये ‘त्रिकोमोनीयासीस’ (trichomoniasis) हा रोग सामान्यपणे आढळतो. याच रोगामध्ये अशाप्रकारचा स्त्राव होतो. 
आमच्या मते, तुम्हाला या स्त्रावाचा अनुभव येत असेल तर तुम्ही योग्य वेळीच तुमच्या स्त्रीरोगतज्ञाकडे  जाऊन उपचार घेतलेले बरे.

३. बॅक्टेरियल  वजायनोसीस  (Bacterial Vaginoais) 

तुमच्या योनीत उपस्थित असणाऱ्या जीवाणूंनी सरळमार्गी न वागण्याचा निर्णय घेतल्यामुळे हे संक्रमण होते. यात करड्या-पांढऱ्या रंगाचा द्रव स्त्राव योनीमार्गे होतो ज्याला अतिशय दुर्गंधी असते. 
जर यावर वेळीच उपचार करण्यात आले नाहीत तर तुमच्या योनीची लघवी करतांना आग होऊ शकते. यामुळे गर्भाशयातील आतील आवरणाला इजा होते आणि गरोदर मातेला मुदतपूर्व कळा सुरु होऊ शकतात.
असे झाल्यास काळजी घ्या आणि लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवा. वेळीच केलेले उपचार तुम्हाला मोठ्या समस्येपासून वाचवू  शकतात.

४. गर्भाशयातील द्रव. (Amniotic fluids)

तुमच्या गर्भाशयातील बाळाला योग्य उर्जा आणि पोषके मिळण्यासाठी जे द्रव पदार्थ तुमच्या गर्भाशयात उपस्थित असतात त्यांना ‘ अॅम्निओटीक द्रव पदार्थ’ म्हणतात. या द्रवाचा गरोदरपणात काही प्रमाणात स्त्राव होतो. तुम्हाला याचा अनुभव आला असेल तर घाबरायचे काही कारण नाही. गर्भारपणाच्या ३६ व्या आठवड्यापर्यंत हे सर्व थांबते. जशी जशी प्रसूतीची वेळ जवळ येते तसा तसा स्त्राव कमी होत जातो. परंतु जर या द्रवाची गळती सतत होत असेल ( अल्ट्रासाऊंडद्वारे हे गळती कळू शकते.) तर तुम्हाला यावर उपचार घेणे गरजेचे ठरते. या समस्येला इंग्रजीत oligohydramnios असे म्हणतात.
तिसऱ्या त्रैमासिकात द्रव स्त्राव अनुभवत असाल तर डॉक्टरांना दाखवून उपचार घेणे योग्य ठरेल.

५. लौचीया (Lochia)

हा रक्तस्त्राव प्रसुतीनंतर होतो. यात गर्भाशयातील काही पातळ उर्वरित घटक प्रसुतीनंतर बाहेर पडतात. तुम्हाला गुलाबी-लाल रंगाचा द्रव प्रसुतीनंतर ४ दिवसांसाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडण्याचा अनुभव येईल.  
हे हळू हळू कमी होत जाते. १० व्या दिवसापर्यंत हे बंद होऊन एक पिवळ्या-पांढऱ्या रंगाचा द्रव कमी प्रमाणात स्त्रवेल. या सर्व प्रक्रियेत तुमच्या गर्भाशयातील नको असलेल्या गोष्टी बाहेर पडत असतात. यावेळी स्वच्छता राखा आणि स्वतःची काळजी घ्या.  

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon