Link copied!
Sign in / Sign up
4
Shares

प्रसुतीपूर्वी बाळाविषयी या ५ अपेक्षा प्रत्येक आईच्या मनात असतात.

बाळाचं गोंडस सुहास्य - हीच गोष्ट आई होणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या स्वप्नात गरोदर असल्याची बातमी कळल्यापासून ते बाळाचा जन्म होईपर्यंत घर करून असते. आईच्या शरीरातून एका नवीन जीवाची निर्मिती ही निसर्गाच्या अनेक अद्भुत शक्तींपैकी एक आहे आणि म्हणूनच कोणत्याही आईच्या मनात होणाऱ्या बाळाबद्दल काही अपेक्षा, इच्छा आणि स्वप्ने असणे साहजिकच आहे. आई ही शेवटी मायेची मूर्ती असते. प्रत्येक आई आपल्या मुलांवर पोटात असल्यापासून तेवढेच प्रेम करते.

निसर्ग भविष्यात कशाची निर्मिती करणार आहे याविषयी माणसाच्या अपेक्षा आणि महत्वाकांक्षा देखील जोडलेल्या असतात. अपेक्षांबद्दल बोलायचे झाल्यास प्रसुतीपूर्वी प्रत्येक गरोदर स्त्री काही गोष्टींची अपेक्षारूपी वाट पाहत असते. आम्ही यातील काही गोष्टी खाली दिल्या आहेत. यात तुमच्या अपेक्षाही तुम्हाला सापडतील.

१. बाळाचे शारीरिक गुणधर्म.

आपले बाळ दिसायला कसे असावे याबद्दल सर्वांप्रमाणे प्रत्येक आईच्या काही अपेक्षा असतात. हे रहस्य शेवटपर्यंत कायम राहते आणि बाळाच्या जन्मानंतर सर्वात पहिल्यांदा सुटते. मुलगी असो वा मुलगा याबाबत आईच्या अपेक्षा असतातच पण प्रेमात तसूभरही फरक नसतो. अर्थातच माझे बाळ ही जगातली सर्वात सुंदर गोष्ट असावी असे कोणत्या आईला वाटत नाही ?

२. बाळ कोणासारखे जास्त दिसावे.

आई आणि वडील या दोघांच्या मनात बाळ कोणासारखे जास्त दिसेल याविषयी अपेक्षा असतात. बाळाचे नाक बाबांसारखे सरळ असावे की डोळे आईसारखे मोठे असावे याविषयी सर्वांची मते असतात. शेवटी बाळात आई आणि बाबा या दोघांचे गुणधर्म असणार आहेत. कधी स्वभाव सारखा असतो तर कधी शारीरिक गुणधर्म सारखे असतात. तेंव्हा आता बाळाचा जन्म झाल्यानंतरच हे रहस्य सुटेल.

 

३. बाळाचा स्वभाव.

बाळाची वाढ कशा वातावरणात होते, त्याच्यावर संस्कार असे घडवले जातात यावर मुख्यत: त्याचा स्वभाव आणि वर्तन अवलंबून असते. परंतु असेही म्हटले जाते की बाळाचा मूळ स्वभाव जो त्याच्या वाढीच्या वातावरणाशी निगडीत नसतो तो त्याच्या गर्भासंस्कारांवर देखील अवलंबून असतो. अर्थातच आईला वाटत असते की बाळामध्ये तिचे आणि बाळाच्या पित्याचे सर्वोत्तम गुण यावेत. आईच्या अपेक्षेप्रमाणे तिला तिच्या अपत्यांच्या मानसिक आणि भावनिक गुणधर्मात उत्तम तेच हवे असते.

४. बाळाचे भविष्य.

कधी असेही होते की बाळ गर्भात असल्यापासूनच आईने बाळाच्या भविष्याबद्दल प्लान्स आखलेले असतात. त्याचे करियर कोणत्या क्षेत्रात उत्तम होऊ शकते किंवा त्याला कोणत्या गोष्टींचा छंद जडू शकेल याबाबत आईच्या मनात अनेक विचार येतात. प्रत्येकजण कोणाचेतरी अपत्य असते, तेंव्हा आपल्या पालकांनी आपल्याला जश्या त्यांच्या अपेक्षा सांगितल्या तशा आपणही आपल्या मुलांच्या भविष्याबाबतीत काही मनसुबे रचावेत असे आईला वाटणे साहजिक आहे. आईला बाळाकडून भविष्यात असणाऱ्या अपेक्षात तिला तिचे बाळ सर्वोत्तमच असावेसे वाटते.

५. प्रसूतीची प्रक्रिया.

गरोदरपणाचे ९ महिने कसे जातात हे आईला कळतही नाही आणि प्रसूतीची वेळ जवळ येते. दवाखान्यात प्रसूतीसाठी भरती होतांना मनात धाकधूक असतेच. सर्व काही नीट पार पडावे यासाठी प्रत्येक आई प्रार्थना करत असते. एवढी प्रतीक्षा केल्यानंतर बाळाच्या जन्माची ती वेळ जवळ येऊन ठेपलेली असते. ज्या मातांना पूर्वी अनुभव असतो किंवा ज्यांना या प्रक्रियेची माहिती असते त्यांना थोडा तणाव येणे साहजिक आहे. असे सिद्ध झाले आहे की प्रसुतीवेळी आईला होणाऱ्या वेदना या एकाचवेळी शरीरातील २० हाडे तुटण्याच्या वेदेनेच्या तीव्रतेएवढ्या असतात. हे ऐकून कोणत्याही आईच्या मनात भीती बसेल. पण या भीतीपेक्षा बाळाचा जन्म सुरक्षित व्हावा आणि बाळाला काही त्रास होऊ नये अशी आईची अपेक्षा असते.

आपल्यातून एका नव्या जीवाला जन्म देणे हा जगातील सर्वात अद्भुत अनुभव आहे आणि सर्व माता खूप नशीबवान आहेत कारण त्यांना नवीन जीव निर्माण करण्याची ताकद आणि क्षमता निसर्गाने दिली आहे. हाडे तुटण्याच्या वेदनेची तीव्रता सहन करूनही बाळाचे तोंड पाहताच ओठांवर हसू आणणारी आई हेच निसर्गाचे मानवाला खूप मोठे वरदान आहे.

शेवटी काय, तर बाळ कसे दिसावे आणि कसे असावे याविषयी आईच्या अपेक्षा असणे पूर्णतः योग्य आहे. प्रत्येक आईला ह्या अपेक्षा ठेवण्याचा पूर्ण अधिकार असतो. आई त्याग करते, एवढ्या सगळ्या वेदनांमधून जाते आणि ज्या जीवाची निर्मिती करते त्याच्या भविष्यातील अस्तित्वाविषयी अपेक्षा करणे अजिबात चुकीचे नाही कारण या अपेक्षांपलीकडे तिचे प्रेम आणि माया याला जगात कुठेच तोड नाही.     

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon