Link copied!
Sign in / Sign up
22
Shares

प्रसुती नंतर आईने या ७ गोष्टी कराव्यात

बाळ झाल्याचा आई झाल्याचा आनंद खूप मोठा असतो मात्र त्याबरोबरच खूप जबाबदाऱ्याही वाढतात. एक आदर्श पालक होण्याच्या प्रयत्नात काही वेळा न झोपताही बाळाच्या अवतीभोवती आपण करत असतो आणि एकाच वेळी बाळाची काळजी घेणे आणि घराकडे लक्ष देणे (घरातली कामे करणे किंवा ती मार्गी लावणे) ह्या मुळे दमणूक होते किंवा या सगळ्ङ्माचा ताण येतो हे कोणीच नाकारणार नाही. मात्र तरी खूप उशीर होण्याआधी नव्या मातांनी प्रसुतीनंतर काही गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत. कोणत्या गोष्टी आहेत ज्या नव्या मातांनी आवर्जून केल्या पाहिजेत त्या जाणून घेऊया.

१. कोरसेट चा वापर/पोटाच्या पट्ट्याचा  वापर 

प्रसुतीनंतर मातेच्या पोट, कंबर भागातील त्वचा खूप ताणली गेल्याने ढिली किंवा थुलथुलीत झाल्यासारखी होते. ते साहाजिकच आहे. ही त्वचा घट्ट किंवा पुर्वीसारखी व्हावी असे वाटत असेल तर गीरडल किंवा कोरसेट चा वापर करावा. हा सल्ला जरा जुनाट वाटेल पण त्याचा नक्कीच ङ्कायदा होतो. (भारतात किंवा महाराष्ट्रात तरी किमान प्रसुतीनंतर सुती साडीचा पोटपट्टा किंवा सुती साडीच पोटाला घट्ट बांधली जायची. त्यामुळे पोट पूर्ववत होण्यास मदत होते. अर्थात हे देखील खूप जुनाट विचार वाटू शकतात. ) अर्थात हे कोरसेट खूप घट्ट नसले पाहिजे आणि आवळून बसायला नको त्यामुळे ते वापरताना सहन होण्याइतपत घट्ट किंवा आरामदायक आहे ना याची खात्री करा. या कोरसेटवर नेहमीचे कपडे घालता येतात.

सूचना- सी सेक्शन किंवा सीझर शस्त्रक्रियेद्वारे प्रसुती झाली असल्यास टाके ओले असू शकतात. त्यामुळ डॉक्टरांचा सल्ला घेऊन कोरसेट वापरावा.

२. भरपूर वेळ अंघोळ

आईपण नव्याने पेलले असल्याने स्वतःचे लाड करून घ्यायला हवेत. घरात बाथ टब असेल किंवा जकुझी असेल तर त्या मस्त डुंबून रहा. थोडी जास्त वेळ अंघोळ करा. अंघोळ करणे म्हणजे शांतता मिळतेच पण जास्त वेळ अंघोळ केल्यास प्रसुतीनंतर लवकर बरे होण्यासही मदत होते  खूप वेळ अंघोळ केल्याने प्रसुतीनंतर मूत्रमार्गाचा संसर्ग होण्याचा धोका आईला असतो तो टाळता येतो.

३.बालरोग तज्ज्ञांचा सल्ला

आपल्या घरात एक छोटीशी व्यक्ती नव्याने आली आहे जिची काळजी घेणे, सांभाळणे आलेच. त्यासाठी आता स्त्रीरोग तज्ज्ञांबरोबरच बालरोग तज्ज्ञांची भेटही घ्यावी लागते. त्याच्याकडे गेल्यानंतर बाळाला दैनंदिनीचा भाग असणाऱ्या काही विशेष गोष्टी, त्याना द्याव्या लागणाऱ्या विविध लसी, औषधे यांच्याविषयी बालरोगतज्ज्ञ माहिती सांगतात. त्यामुळे स्त्रीरोग तज्ज्ञाबरोबर त्यानाही भेटायला जावे लागणार त्यासाठी आठवड्याची किंवा महिन्याची वेळ आगाऊ नोंदवून ठेवावी.

४. केगल व्यायाम

प्रसुतीदरम्ङ्मान बाळाचा जन्म नैसर्गिक प्रसुतीद्वारे होताना शरीरांतर्गत अवयवांना हलकासा धक्का बसतो किंवा त्याचे स्थान बदलते. त्यामुळे प्रसुतीनंतर शरीर पुर्वावस्थेत येऊ पाहात असते तेव्हा व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. अर्थात खूप घाम गाळावा लागणारे, वाकून करावे लागणाऱ्या व्यायामाविषयी विचार नाहीच करत आहोत. अर्थात नव्या मातांसाठी व्यायाम करणे अवघडच जाते आणि बहुतेकदा व्यायाम न करण्याचा सल्लाच दिला जातो. पण हलका व्यायाम किंवा योगआसने आणि चालणे हे व्यायाम करण्याचा सल्ला नक्कीच दिला जाऊ शकतो. याव्यतिरिक्त केगल्स व्यायामाचा समावेश त्यात अवश्य असला पाहिजे. कारण प्रसुतीदरम्ङ्मान कळा येताना योनीमार्ग खूप जास्त ताणला गेलेला असतो त्यामुळे केगल्स हा व्यायाम योनीमार्गाचे स्नायु घट्ट करण्यास उपयुक्त ठरतो.

५. बाळाला आपल्या जवळ ठेवा

नवजात बाळाला स्पर्शाचीच भाषा समजते. त्यामुळे नवजात बाळाला आपल्या जवळ घ्या, कुशीत घ्या. त्यामुळे बाळाला आईची उब समजते आणि ते मस्त आरामात राहाते. आईच्या हृदयाचे ठोके बाळासाठी अगदी मृदु संगीतच असते. त्यामुळे बाळाची प्रतिकार क्षमता अधिक मजबूत होण्यास मदत होते आणि बाळ लवकर आणि शांत झोपी जाते.

६. भरपूर पाणी प्यावे

बाळंतिणीने भरपूर पाणी प्यायले पाहिजे त्यासाठी पाण्याची बॉटल जवळ ठेवली पाहिजे. अर्थात साखरमुक्त पेये किंवा फळांचे रस नकोच. खूप तहान लागली तर पाणीच प्यावे. शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखल्यास त्वचा चमकदार होते, प्रतिकार क्षमता वाढते आणि स्तन्य म्हणजेच आईच्या दुधाचे प्रमाणही वाढते.

७. विचारा आणि मदत स्वीकारा

प्रसुतीनंतर अनेक गोष्टींची जबाबदारी वाढते त्यामुळे सुपर वूमन किंवा सुपरहिरो होण्यासाठी वेळ नसतो आणि सर्वच जबाबदाऱ्या आपल्याच खांद्यावर घेणेही शक्य नसते. त्यामुळे विचारा आणि मदत स्वीकारा. जोडीदाराला विचारण्यात लाजू नका किंवा आपल्या माणसांची मदत घेण्यास लाजू नका. न विचारता आपल्याला मदतीचा हात दिला म्हणून खूप जास्त हुरळून जाऊ नका. स्तनपान, बाळाचे लंगोट बदलणे, बाळाला झोपवणे, बाळाला अंघोळ घालणे आणि इतरही अनेक कामे आईच्या हाताशी असतातच

या गोष्टी नवमातांनी जरुर लक्षात ठेवाव्या मग बाळंतपणाचा काळ अगदी आरामात निघून जाईल.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon