Link copied!
Sign in / Sign up
13
Shares

प्रसुतीनंतर सुरक्षितपणे वजन कमी करा

 


बाळाचे आगमनानंतर आईचे आयुष्य आनंदी होते तसेच व्यग्र होते. बाळाच्या जन्माआधीपासूनच आई होणाऱ्या स्त्रीला आपल्या अनेक गोष्टींमध्ये बदल करावे लागतात. गर्भावस्थेत स्त्रीचे वजन सुमारे १० ते १५ किलो वजन वाढणे आवश्यक असते. मात्र खरी qचता सुरु होते ती बाळाच्या जन्मानंतर वजन कसे घटवायचे ही. पण प्रसुती नंतर वजन घटवताना आहारातज्ज्ञ किंवा स्त्रीरोग तज्ज्ञाचा सल्ला अवश्य घ्यावा.

वजन घटवण्यासाठी योग्य आहार घेतल्यासच योग्य पद्धतीने वजन कमी होऊ शकते. मुळातच वजन कमी होणे या प्रक्रियेला वेळ लागतोच कारण एका रात्रीत वजन कमी होत नाही. वजन कमी होण्याच्या वेळखाऊ प्रक्रियेला सामोरे जाण्यासाठी धीर ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. बाळ जेव्हा स्तनपान करीत असते तेव्हा आईचे थोडे वजन घटतेच. बाळ जसे जसे मोठे होऊ लागते तसे त्यांचा सांभाळ करणे, त्यांच्या नव्या नव्या गोष्टी, प्रगती यांच्या मागे धावता धावता वाढलेले वजन कमी होऊ शकते. मात्र गर्भावस्थेत वाढलेले वजन तसेच राहिल्यास अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. उदा. स्थूलपणा, मधुमेह, हृदयरोग इत्यादी आजार होऊ शकतात.

वास्तववादी रहा

अनेक स्त्रियांविषयक मासिकांमध्ये आपण प्रसिद्ध आयांच्या वजन घटवण्याच्या कथा ऐकत असतो. मात्र प्रसुतीनंतर वजन कमी होण्यासाठी वेळ लागतोच. जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार विविध देशांतील १७४३ मातांचे प्रसुतीनंतर २ आठवडे ते २ वर्ष या काळात ४.७ किलो वजन घटते. गर्भावस्थेत किती वजन वाढते त्यावर दोन वर्षांच्या काळात साडेचार किलो वजन कमी होणे हे सर्वसाधारण आहे. योग्य आहार आणि व्यायाम याच्या मदतीने वजन कमी करता येते.

क्रॅश डाएट नकोच

वजन झटपट कमी करण्यासाठी क्रॅश डाएटचा पर्याय निवडणे नक्कीच चुकीचे आहे. कारण क्रॅश डाएट ही बहुतेकदा लो कार्ब डाएट असतात त्यामुळे कमी वेळात वजन कमी होते हे खरे आहे. पण प्रसुतीनंतर बाळाचे पोषण हे आईच्या दुधावर होत असल्याने किमान सहा महिने तरी आईला सुपाच्य, पोषक आणि अधिक उष्मांक देणारा आहार घ्यावा लागतो. पण क्रॅश डाएटमध्ये हेच करता येत नाही. कारण त्यात अनेक महत्त्वाचे पोषक घटक नसतात. त्यामुळे अशक्तपणा जाणवू शकतो आणि बाळाची काळजी घेताना अधिक उर्जेची गरज असते. क्रॅ्रश डाएटमुळे झोप अपुरी राहू शकते. तसेच क्रॅश डाएटमुळे चरबी कमी होण्याऐवजी स्नायूंचे वजन कमी होऊ शकते. प्रसुतीच्या काळात शरीराचे स्नायू, गर्भाशय हलके झालेले असतात त्यामुळे स्नायूंचे वजन कमी होणे हे नक्कीच चांगले नाही.

बाळाच्या जन्मानंतर जमिनीवरील काही व्यायाम केल्याने विशेषतः ओटीपोट, योनीमार्ग पुन्हा पुर्ववत होण्यास मदत करतात. मात्र सी सेक्शन प्रसुती असल्यास टाके सुकल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने हे व्यायाम करावेत.

वजन कमी होण्यासाठी स्तनपान

स्तनपानाचे जसे बाळाला फायदे असतात तसेच ते आईलाही होतात. स्तनपानामुळे आईचे वजन कमी होऊ शकते. कारण स्तनपानासाठी अधिक उष्मांक जळतात. तर काही आयांच्या बाबतील स्तनपान थांबवल्यावर वजन कमी होऊ लागते. थोडक्यात सांगायचे तर ज्या आया स्तनपान देत आहेत त्यांनी डाएटचा विचार करु नये. कारण त्यामुळे स्तन्य म्हणजे दुधाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. अर्थात पहिल्या तीन महिन्यात आईला वजन कमी झाल्यासारखे वाटणारही नाही कारण आहारात पोषक पदार्थांचा समावेश असतो आणि शारिरीक हालचाल तुलनेने कमी असते. मात्र कोणतेही डाएट किंवा पथ्याहार सुरु करण्यापुर्वी डॉक्टरी सल्ला अवश्य घ्यावा. एका अभ्यासात ४९२२ स्तनपान करणाऱ्या महिलांचे ज्या महिलांनी सहा महिन्यानंतर स्तनपान देणे बंद केले त्यांच्या तुलनेत १.६८ किलोग्रॅम वजन कमी झाल्याचे दिसून आले.

वजन घटवण्यासाठी आहार

वजन कमी करायचे म्हणून जेवण टाळू नका. योग्य पद्धतीने वजन कमी करावयाचे असेल तर योग्य आहाराच्या सवयी असणे महत्त्वाचे आहे. प्रसुतीनंतर बाळाकडे लक्ष देताना कधी कधी आईला जेवायला वेळ मिळत नाही किंवा त्या जेवायचेच विसरतात. मात्र न जेवल्याने उर्जा कमी पडते आणि शरीर साठवलेल्या उर्जेचा वापर करते त्यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते. वजन कमी करण्यासाठी योग्य प्रमाणात तीन ते सहा वेळा आहार घ्यावा. सकाळची न्याहारी करावी सवय नसल्यास त्याची सवय करुन घ्यावी. त्यामुळे दिवसभरात थकवा येत नाही. तसेच सकाळी पोट भरल्याने अतिखाणे टाळले जाते.

तंतुमय पदार्थ, प्रथिने 

आहारात तंतुमय पदार्थांचा समावेश असावा कारण त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. विरघळणारे तंतुमय पदार्थ असलेला आहार घेतल्यास पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते आणि पचन क्रिया हळु होते त्यामुळे भुकेची जाणीव लवकर होत नाही. तंतुमय पदार्थांमुळे तसेच फळे, प्रथिनयुक्त पदार्थांचाही आहारात समावेश असावा. अर्थात सतत सलाडस खाऊ नयेत.

पाण्याचे प्रमाण

पाणी योग्य प्रमाणात प्यावे. दिवसातून बारा ग्लास पाणी आणि पेय पदार्थांचे सेवन केले पाहिजे. त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. आणि स्तनपान करताना दूध निर्मितीसाठी ९० टक्के पाण्याचीच आवश्यकता असते. स्तनपान करणाऱ्या आईचे शरीरात पाण्याचे योग्य प्रमाण राहणे आवश्यक आहे.

फास्ट फूड

बाळ झाल्यानंतर त्याला सांभाळताना वेळ मिळत नाही म्हणून बिस्किट, तयार बाजारातील पदार्थ खाल्ले जातात. मात्र त्यात अतिरिक्त साखर आणि रिफाईंड कार्ब असतात. कार्बोनेटेड ड्रिंक्स अजिबात पिऊ नये. त्यामध्ये साखरेचे अतिरिक्त प्रमाण असते. त्यामुळे जीवनशैलीशी निगडीत अनेक आजार जसे मधुमेह होऊ शकतात. त्यामुळे हे पदार्थ टाळावेत. त्यापेक्षा घरात फळे, सुकामेवा, सलाड, दही असे पर्यायी पदार्थ आणून ठेवावे.

वजन कमी करण्याच्या मार्गात व्यसनांचा अडथळा येऊ देऊ नका कारण पोषक घटक विरहीत केवळ अतिरिक्त उष्मांक त्यातून मिळतात त्यामुळे मद्यपान, धुम्रपान नकोच.

व्यायाम

वेळ मिळत नाही या कारणास्तव अनेक आया व्यायाम टाळताना दिसतात. जसे केवळ व्यायामाने वजन कमी होत नाही किंवा केवळ आहार नियंत्रण केल्याने वजन कमी होत नाही तर दोन्हीची सांगड घालावी लागते. त्यामुळे शक्य तेव्हा चालणे, धावणे, सायकलिंग असे व्यायाम झेपतील तितका वेळ जरुर करावे.

अर्थात अतिव्यायामही करू नये. काहीवेळा त्यामुळे शरीराला त्रास होऊ शकतो.

वजन कमी करण्यासाठीची औषधे, पावडर घेऊ नये. कारण स्तनपान करणारे बाळ असल्यास त्याला त्रास होऊ शकतो. तसेच आईलाही त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी योग्य पूरक आहार म्हणजे योग्य प्रमाणातील पोषक आहार

थोडक्यात काय तर जर धीराने आणि चिकाटीने गर्भावस्थेत वाढलेले वजन निश्चितपणे कमी करता येईल. सुरक्षित आणि कायमस्वरुपी वजन घटवण्यासाठी योग्य आहार आणि पुरेसा व्यायाम हीच गुरुकिल्ली आहे.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon