Link copied!
Sign in / Sign up
0
Shares

प्रसूतीच्या काळातील तीव्र वेदनाबाबत काही गोष्टी


प्रेग्नन्सीच्या काळात महिलांना कळांचा त्रास होतं असतो. पण त्यातही काली महिलांना हा त्रास खूप जास्त प्रमाणात होतो. त्यांना हा त्रास एवढ्या जास्त प्रमाणात होतो, की त्यामुळे त्यांना तोंडातून एक शब्द काढणंही अवघड जातं. ही काही खूप गंभीर समस्या आहे अशातील बाब नाही. ही खूप सामान्य बाब आहे. पण या वेदना नेमक्या कशामुळे होतात हे जाणून घेऊया.

प्रेग्नन्सीच्या काळात होणाऱ्या बहुसंख्य गोष्टी ह्या तुमच्या हार्मोन्समुळे होतं असतात. पण नेहमीच ज्या हार्मोन्सची चर्चा होते, त्या इस्ट्रोजन आणि टेस्टोस्टेरॉनचा इथं काहीही संबंध नसतो. तर या काळात थायरॉइड, अॅड्रेनॅलीन, इपिनफ्राइन, इन्सुलीन यांचा तुमच्या शरीरावर जास्त परिणाम होतो. या हार्मोन्समधील थोड्या बदलानेही तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीत मोठा बदल बदल होतो. तुम्ही किती वेळा लघवी करता, तुम्ही ताण-तणाव कसा हाताळू शकता, तसेच हृदयाचे ठोक्यांचे नियंत्रण या सर्व गोष्टी हे हार्मोन्स नियंत्रित करतात.

त्याचप्रकारे गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या वेदना ह्यासुद्धा या हार्मोन्समधील बदल, अड्रेनॅलीनचा प्रतिसाद आणि तापमान यांचाच परिणाम आहेत. पण प्रत्येक महिला ही वेगळी असते, तसेच त्यांचे हार्मोन्सही वेगळे असतात. त्यामुळे तुम्हाला या वेदना होतीलच असं नाही. या काळात ऑक्सिटॉसिन हे हार्मोन्स बाहेर पडत असते. ऑक्सिटॉसिनमुळे गर्भाशयावरील आणि गर्भाशयमुख अधिक आकुंचन पावते. त्यामुळे ह्या वेदना होतात. यावेळी पाठीच्या खालच्या भागातून किंवा ओटीपोटातून आतून कळा येतात. तसेच यावेळी शरीरात रासायनिक बदल आणि इतर हार्मोन्समुळेही ह्या वेदना तीव्र होतात. तसेच त्यामुळे उलट्या होणे, घाम येणे आणि अगदी खाज येण्याचा त्रासही होऊ शकतो. या काळात तुमच्या स्नायुंना आराम देण्यासाठी तुम्हाला ब्लॅकेटसमध्ये गुंडाळण्यात येतं. किंवा जास्तच त्रास होऊ लागल्यास औषधही घ्यावं लागलं.  

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon