Link copied!
Sign in / Sign up
6
Shares

ही लेबर पेनची लक्षणे नाहीत (गरोदर स्त्री ने जाणून घ्यायला हवेच)

गरोदरपणात शेवटच्या दिवसात अनेकदा पोटात वेदनादायक आणि कठीण कळा किंवा आकुंचने जाणवायला लागल्यास तुम्हाला तात्काळ दवाखान्यात धाव घ्यावीशी वाटते. एखादी कळ किंवा आकुंचन जाणवले की तुम्हाला वाटू शकते की आता तुमच्या लहानग्या बाळाला पोटातून बाहेर यायची वेळ झाली आहे. पण असे नसते. खरच त्या प्रसूती कळा आहेत की तुमचे शरीर तुम्हाला चिडवते आहे हे कळायला मार्ग नसतो, त्यामुळे तुमचा गैरसमज होऊ शकतो. पण या लेबर पेन म्हणजे प्रसूती कळांची काही ठळक लक्षणे आहेत. ती जाणून घेतलीत तर तुम्हाला दवाखान्यात जायची तयारी करायची का नाही याचा अंदाज येईल.

१) अवस्थता म्हणजे प्रसूती कळा नव्हे

प्रसूतीची वेळ जवळ आल्यावर तुम्हाला कदाचित अस्वस्थता किंवा अवघडल्यासारखे वाटू लागते, पण याचा अर्थ त्या प्रसूती कळा आहेत असे नाही. ब्रॅक्सटोन हिक्स नावची अकुंचने या काळात पोटात ठराविक जागेवर येतात आणि वेदना होऊ शकतात पण त्यामुळे बाळाची वेळ आली आहे असा ग्राह्य धरणे चुकीचे आहे. तुमच्या शारीरिक बाळांचा भाग म्हणून ही असहजता तुमच्या हालचालीत येते. दवाखान्यात जाण्याची वेळ आली आहे की नाही हे ठरवण्यापूर्वी या सर्व लक्षणांचे नीट निरीक्षण करून पाउल उचला.

२) स्थिती बदल केल्याने कळा थांबू शकतात

तुम्हाला प्रसूती कळा सुरु झाल्या आहेत की नाही हे ठरवण्यासाठीचा सर्वात सोप्पा मार्ग कोणता ? जर अकुंचने किंवा कळा येत असल्याचे जाणवले तर त्या थांबेपर्यंत थोडी हालचाल करा, तुमच्या मूळ स्थिती बदलून पहा. कळा येत असतांना वेदना होतात, अशावेळी हालचाल कारणे अवघड वाटत असले तरीपण वेदना थांबवण्यासाठी असे करणे गरजेचे आहे. जर वेदना कमी झाल्या तर त्या प्रसूती कळा नाहीत. एखादी आरामदायी स्थिती निवडा म्हणजे वेदनांची तीव्रता कमी होईल.

३. पडदा बंद आहे म्हणजे बाळाची वेळ अजून झाली नाही

आईच्या पोटात बाळ एका द्रवाच्या पिशवीत सुरक्षित असते. गर्भद्रवाची ही पिशवी फुटली म्हणजे प्रसूतीची वेळ झाली आहे असा अनेक जणांचा समज असतो. पण जोपर्यंत तुमच्या गर्भाशयाचे मेम्ब्रेनस् झोडलेले आहेत तोपर्यंत तुमच्या प्रसूतीकळा सुरु होत नाहीत. ही पिशवी गरोदरपणात कधीही फुटू शकते. परंतु प्रसूती कळा सुरु झाल्यानंतर बाळाच्या भोवती असणाऱ्या गर्भद्रवाची पिशवी गळू लागणे हे प्रसूतीची वेळ आल्याचे चिन्ह आहे. यावेळी जर प्रसूतीची इतर लक्षणे ठळक असतील तर या चिन्हाची वाट पाहू नका.

 

४) ब्रॅक्सटोन हिक्स आकुंचने आवळल्यासारखी असतात

गरोदरपणात येणाऱ्या कळा आणि असहजता तुमच्यासाठी अवघड असू शकतात. कधी कधी सामान्यतः पोट आवळले गेले तरीही तुम्हाला वाटू लागते की बाळाला बाहेर येण्याची वेळ झाली आहे. खऱ्या प्रसूतीकळा पाठीच्या भागातून सुरु होतात आणि पुढे पोटापर्यंत येतात. ब्रॅक्सटोन हिक्स आवळतात आणि सामान्यतः ज्याप्रमाणे पोट आखडते त्याप्रमाणे भासतात. प्रसूतीकळा कोणतेही ठराविक पॅटर्न दाखवत नाहीत. सामान्यतः पोट आवळल्यासारखे होणे सुद्धा असहाय्य होऊ शकते, परंतु प्रसूतीची वेळ आलेली नसते.

५) आकुंचने सारखी असतात

ब्रॅक्सटोन हिक्समुळे येणाऱ्या कळा या समान असतात. त्यांच्या तीव्रतेत फरक पडत नाही. काही वेळानंतर त्या नाहीश्या होतात. काही वेळा त्या वारंवार येतात पण वेळेनुसार त्यांची तीव्रता वाढत नाही. खऱ्या प्रसूतीकळा असहाय्य असतात आणि वेळेनुसार त्यांची तीव्रता वाढत जाते. जर तुमच्या कळा एका विशिष्ट स्वरुपात असतील आणि वेळेनुसार वेदना अधिक तीव्र होत नसतील तर त्या चुकीच्या कळा आहेत.

६)  रक्ताचा तपकिरी रंग

ज्या स्त्रियांची प्रसूती जवळ आली आहे त्या तपकीरी रक्तस्त्राव पाहून भांबावून जातात. बाळ येण्याची वेळ झाली आहे की काय? आता कळा सुरु होणार आहे का? असा प्रश्न लगेच त्यांना पडतो. जर गुलाबी रंगाचा स्त्राव असेल तर प्रसूतीची वेळ आलेली असू शकते. तपकिरी रंग असेल तर भांबावून जाऊ नका. तपकिरी स्त्रावाची काही कारणे असू शकतात. जसे की कर तुम्ही मागच्या काही काळात सेक्स केला असेल तर असे होऊ शकते. तेंव्हा रिलॅक्स! 

परंतु हा त्रास होत असतांना डॉक्टरांचा सल्ला घेत राहा. किंवा डॉक्टरांनी सांगितलेली लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा  किंवा दवाखान्यात जा. 

 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon