Link copied!
Sign in / Sign up
111
Shares

प्रसूती जवळ आल्यावरच्या काही गोष्टी ज्या माहिती असणे गरजेचे आहे

सर्वसाधारण गरोदरपणात गर्भधारणेला साधारण ४० आठवडे पूर्ण झाल्यावर किंवा ९ महिने पूर्ण झाल्यावर बाळाची पूर्ण होते आणि त्यानंतर स्त्रीची प्रसूती होते. जस-जसे प्रसूती जवळ यायला लागते त्यावेळी काही गोष्टी माहिती असणे आवश्यक असतात ज्या बाळंतपण सुखकर करतात

१) प्रसूती जवळ आल्याचे कसे ओळखाल

 सतत प्रसूती कळा येऊ लागतात, गर्भाशयाचे तोंड उघडू लागते. गर्भाशयातून योनिमार्गाद्वार लालसर आणि पांढरा चिकट द्रव स्त्रवू लागतो.

२)प्रसूती कळा कश्या ओळखाल

प्रत्येक स्त्रीच्या येणाऱ्या प्रसूती कळाची वेळ प्रकार वेगवेगळा असू शकतो. परंतु साधारणतः पुढील प्रकारे प्रसूती कळा

१)पोट बिघडले असल्यावर साधारणतः पोटाचा मधला भाग दुखतो. परंतु प्रसूती कळा या कमरेच्या भागातून आणि ओटीपोटातून यायला सुरवात होते. साधारणतः मासिकपाळी दरम्यान जश्या कळा येतात तश्या प्रकारच्या कळा यावेळी येतात

२) या कळा प्रसूतीची ताराखेच्या आसपास आणि प्रसूतीच्या १०-१२ तास आधी सुरु होतात. या कळा १०-१५ मिनिटांच्या अंतराने येत असतात आणि हळू-हळू या काळाच्या मधले अंतर कमी होत जाते

३)प्रसूती कळा येण्याची करणे

१)आईचे शरीर बाळाला बाहेर ढकलू लागते. बाळ गर्भातून बाहेर येऊ लागले की या बाळाच्या बाहेर येण्याचा आणि आईच्या शरीरातुन बाळाला बाहेर ढकलण्याच्या प प्रकियेतून प्रसूती कळा सुरु होतात.

२) हळू-हळू गर्भाशयाचे तोंड उघडू लागते आणि गर्भाशयाच्या भागावरील पोटाचा आणि ओटीपोटाचा भाग कडक होतो

४) आहार

प्रसूती जवळ आल्यावर हलका-फुलका आहार घेणे सुरु करावे. तसेच प्रसूती कळा सुरु झाल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याने आहार द्यावा. तेलकट मसालेदार पदार्थ खाऊ नये. जर सी-सेक्शन करण्याची वेळ आली तर जड आहार मुळे काही समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon