Link copied!
Sign in / Sign up
61
Shares

पौष्टिक लाडू आणि त्याचे हिवाळ्यातील सेवनाचे फायदे

थंडीचे दिवस हे वर्षभराची ऊर्जा मिळवण्यासाठी आणि तब्बेतीसाठी उत्तम मानले जातात या काळात मुलांना पौष्टिक गोष्टी खाऊ घेतल्या की त्या अंगी लागतात. मुलांबरोबरच ,मोठ्याने देखील या काळात पौष्टिक पदार्थ खाणे गरजेचे असते. या काळात खालेल्या पदार्थाची उपयुक्तता तुम्हांला पुढील वर्षभरासाठी पुरते. त्यासाठी मुलांना तसेच मोठ्यांना आणि वयस्कर व्यक्तीसाठी काही पारंपरिक लाडूंबाबत माहिती देणारा आहोत.

मेथीचे लाडू

कणीक, साखर, तूप, सुकामेवा या नेहमीच्याच्या पौष्टिक घटकांना पदार्थांना मेथीची जोड देऊन हे लाडू केले जातात. मेथी कडू रसाची असल्याने त्यामुळे सूजनाशक आणि जंतूनाशक असे दोन्ही गुणधर्म त्यातून मिळतात. थंडीच्या दिवसात उध्दभवणारे सांध्यांचे विकार, सांध्यांची सूज, स्नायूंच्या वेदना, घशात जंतुसंसर्गामुळे येणारी सूज यावर मेथी उपयुक्त ठरते. थंडीने छातीत कफ जमा होणे, सर्दी होणे, अशा तक्रारींवर मेथी उपयुक्त ठरते. तसेच या दिवसात लहान मुलांना अश्या लाडूंचा सेवनामुळे त्यांची हाडे बळकट होतात. थंडीत होणाऱ्या केसाच्या कोंडा देखील या मेथीयुक्त पदार्थच्या सेवनाने कमी होतो , तसेच रक्त वाढवणे, रक्तशुद्धी करणे, हाडांना बळकटी देणे, त्वचा व डोळ्यांची काळजी घेणे हे फायदे मेथीच्या सेवनाने मिळतात. तेव्हा हिवाळ्यात मेथीच्या लाडूंचा खाण्यात जरूर समावेश करावा.

हळिवाचे लाडू
 

गूळ, खोबरे आणि हळीव घालून केलेले हे लाडू शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरतात. हळीव भिजवून लाडूत, दुधात वा फळांच्या रसात घालूनदेखील घेतले जातात, किंवा भाजलेले हळीव मीठ लावूनही खातात.

हळिवात प्रथिने, लोह, कॅल्शियम, फॉलिक अ‍ॅसिड, ‘क’ व ‘ई’ जीवनसत्त्वही आहे. त्यामुळे थंडीत हे पौष्टिक लाडू खातात. त्यातील फ्लॅव्हेनॉइडस्, टॅनिन्स, अल्कलॉइडस् यकृताचे संरक्षण करण्यासाठी मदत करत असून हळीव पित्तरसाचे स्रवण करण्यासाठीही उपयुक्त ठरतात. त्यामुळे पचनाचे कार्य सुलभतेने घडून येण्यास मदत होते. थंडीत होणारा खोकला, दमा, कफ यावर ते गुणकारी असतात.

डिंकाचे लाडू

थंडीच्या त्रासापासून दूर ठेवण्यासाठी डिंकाचे लाडू खावे. मुळात डिंक थंड असतो परंतु खाण्याचा. डिंक तळून वापरल्यास उष्ण गुणाने कार्य करतो व शरीराला थंडीच्या त्रासांपासून दूर ठेवण्यास मदत करतो. डिंक बारीक तळून त्यात कणीक, साखर/गूळ व सुकामेवा घालून लाडू करतात.

मात्र भिजवून वापरल्यास मात्र तो थंडावा निर्माण करतो. म्हणून हिवाळ्यात डिंक तळूनच लाडूत वापरावा. त्याचे प्रमाण तसे कमी लागते. २५० ग्रॅम कणीक, २५० ग्रॅम साखर घेऊन त्यात १५-२० ग्रॅम डिंक तळून घालावा व इतर सुकामेवा घालून त्याचे पोषणमूल्य वाढवावे.डिंकाचा लाडू हा वातनाशक आणि कफनाशक मानण्यात येतो

महत्वाचे हे लाडू पौष्टीक असले तरी गर्भार स्त्रियांनी खाऊ नये. थंडीच्या दिवसात अंगात उष्णता आणि ऊर्जा निर्माण करण्यासाठी या लाडवांची सेवन करण्यात येते. परंतु गर्भार स्त्रियांसाठी काही प्रमाणापेक्षा जास्त उष्ण पदार्थ खाणे घातक ठरू शकते त्यामुळे याची काळजी घ्यावी. साधारणतः गरोदरपणानंतर हे लाडू बाळंतिणीला देण्यात येतात. 

लवकरच या लाडूंची रेसीप देखील सांगणार आहोत.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon