Link copied!
Sign in / Sign up
3
Shares

झटपट होणारे पौष्टिक दडपे पोहे

स्रोत-मायबोली 

तुम्ही म्हणाल दडपे पोह्यात काय पौष्टिक आलं,ज्या भाज्या कच्च्या खाणे आवश्यक असते आणि मुलं काय आणि मोठे काय खाण्याचा कंटाळा करतात त्या भाज्या तुम्हांला यात घालता 

साहित्य (४ जणांसाठी )

१.२ वाट्या जाडे पोहे

२. २ वाट्या गाजराचा किस

३. १ वाटी खवलेले ओले खोबरे

४. १ वाटी डाळींबाचे दाणे

५. थोडे  भाजलेले शेंगदाणे

६. १ मोठा कांदा चिरून( आवश्यक असल्यास)

७. अर्धा वाटी चिरलेली कोथिंबीर

८. ३-४ हिरव्या मिरच्या कापुन

९. १ चमचा साखर

१०. चवीनुसार मिठ

अर्धा लिंबू (लिंबाचा रस)

फोडणी - तेल, मोहरी, जिरं, हिंग,मिरची 

कृती

पोहे थोडे भाजून घ्या. त्यानंतर गाजर,खोबरं ,डाळींब्याचे दाणे,शेंगदाणे,कोथिंबीर,एक कच्ची मिरची तुकडे सगळं एकत्र करा त्यावर थोडं मीठ आणि साखर घाला. त्यानंतर फोडणी करून त्या मिश्रणावर घाला. आणि मिक्स करून घ्या. पाच मिनिटे पोहे झाकून (दडपून) ठेवा आणि मग मस्त दडपे पोहे फस्त करा.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon