Link copied!
Sign in / Sign up
20
Shares

पोटात (गर्भाशयात) बाळाला उष्णता जास्त होत आहे याची १० लक्षणे


आई होणार असणाऱ्या स्त्रियांसाठी गरोदरपणाचा काळ सुखाचा असू शकतो कारण या काळात तुम्हाला हव्या असलेल्या आणि हेल्दी अशा सगळ्याचा चविष्ट डिशेस तुम्ही खाऊ शकता. तुमचे हवे तसे लाड देखील सगळीकडून होत असतातच. पण काही गोष्टी मात्र तुमच्यासाठी अवघड असतात त्या म्हणजे तुमच्यावरची बंधने. काय ,किती, कधी आणि कसे खायचे, काय करायचे आणि काय करायचे नाही या सगळ्या गोष्टींच्या सूचना आणि नियम मात्र गरोदर स्त्रीला पाळावे लागतात. यात काय खायचे आणि काय नाही याची तर एक यादीच आहे. शरीरात उष्णता वाढू नये म्हणून स्टीम बाथ घेणे देखील टाळण्याचा सल्ला गर्भवती स्त्रियांना दिला जातो.

जेंव्हा गर्भवती स्त्री च्या शरीरातील उष्णता वाढते तेंव्हा शरीर पहिल्यांदा बाळाची काळजी करते आणि गर्भातील प्लासेंटा म्हणजे नाळेच्या तापमानाला नियमीत करते. परंतु जेंव्हा शरीराचे तापमान १०० फॅरेन्हाईट पेक्षा जास्त वाढते तेंव्हा शरीराला हे तापमान नियमित करणे कठीण होते. याचा परिणाम बाळावर मोठ्या प्रमाणात होतो. या उष्णतेचा परिणाम पहिल्या त्रेंमासिकेतील गर्भापातात होतो किंवा बाळात काही जन्मतःच दोष असू शकतात.

ही उष्णता वाढणे टाळायचे असेल तर दिवसभरातून थोडे थोडे  पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळा असेल तर नेहेमी पेक्षा जास्तीचे पाणी पिणे योग्य ठरेल. तुमचे शरीर थंड ठेवण्यासाठी तुम्ही पाण्याच्या टबमध्ये बसू शकता. उन्हात जाणे शक्यतो टाळा. घरातच बसा  आणि जर बाहेर थंडवा हवा असेल तरच खिडक्या उघड्या ठेवा. उन्हाच्या झळांनी देखील उष्णता वाढते. घरात एसी असेल तर थोडा वेळ एसी लावून बसा किंवा संध्याकाळी बाहेर आल्हाददायक वातावरण असेल तर पार्कात किंवा बागेत बसा. तुम्हाला जे केल्याने उष्णता जाणवणार नाही ते सगळे करा.

इथे आम्ही तुमच्या शरीराचे तापमान जर वाढले असल्यास त्याची आढळणारी काही लक्षणे दिली आहेत.
१. नेहेमी थकवा जाणवणे.

सगळ्यात स्पष्ट कारण आहे की तुम्हाला नेहेमी थकल्यासारखे जाणवते. जर उष्णता जास्त असेल तर खूप झोप येते. दिवसातून जर तुम्ही अनेकदा झोप काढत असाल किंवा एकंदरीत दिवसातून ७ तासापेक्षा जास्त झोपत असाल तर हे उष्णता वाढण्याचे लक्षण आहे.

२. नेहेमीपेक्षा जास्त वेळा उलटी होणे.

जर तुम्हाला तुमच्या गरोदरपणाच्या काळात उलट्या होण्याचा त्रास सुरुवातीपासूनच असेल तर ह्यात काळजी करण्याचे कारण नाही. पण जर उष्णता वाढली असेल तर तुम्ही नेहेमीपेक्षा जास्त वेळा उलटी करत आहात असे तुमच्या लक्षात येईल. डीहायड्रेशनचा परिणाम म्हणून तुमच्या शरीराची उष्णता वाढलेली असू शकते. दिवसातून थोडे थोडे करून ३-४ लिटर पाणी प्या. जर तरीही समस्या सुटली नाही तर डॉक्टरांना भेटले पाहिजे .

३. वजन जाणवणे आणि चालतांना त्रास होणे.

जर तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या त्रैमासिकात असाल तर चालताना त्रास होणे हे नैसर्गिक आहे. वाढलेले पोट घेऊन चालतांना तुम्ही पेंग्विन सारखे दिसू लागता. परंतु जर चालणे म्हणजे तुमच्यासाठी एक अवघड काम झाले असेल आणि चालण्यामुळे थकवा सतत जाणवत असेल तर तुमची उष्णता वाढली असण्याची शक्यता आहे.

४ लाल त्वचा आणि रॅश.

जर तुमच्या चेहेऱ्यावर किंवा अंगावरील त्वचेवर लाल चट्टे किंवा लालसर पण आला असेल तर हे उष्णता वाढल्याचे लक्षण आहे. जास्त व्यायाम करणे किंवा खूप वेळ उन्हात जाणे या कारणांमुळे त्वचा लाल पडते. या दोन्हीही गोष्टी बाळासाठी योग्य नाहीत. शक्यतो उन्हात जाणे टाळा. घरी आराम करा आणि एखादा आईस पॅक लाऊन चेहेऱ्याला मसाज करा.

 

५. उन्हात डोक्याची त्वचा आणि मान ओलसर होणे.

उन्हात गेल्याने मस्तकाची उष्णता वाढू शकते. बाहेर असतांना डोक्याला आणि मानेला हात लाऊन बघा की त्वचा ओलसर झाली आहे का ते. जर इथली त्वचा ओलसर जाणवत असेल तर ही तुमची उष्णता वाढल्याची खूण आहे. दुपारी ११ ते ३ या वेळेत घराबाहेर उन्हात जाऊ नका. शक्यतो जवळ एक छत्री ठेवा. गुलाब पाणी किंवा वाॅटर - स्प्रे जवळ ठेवा जेणेकरून तुम्हाला स्वतः ची त्वचा थंड ठेवता येईल.

६. तापमान वाढले तरीही घाम न येणे.

तुम्हाला जाणवेल की तुमच्या शरीराची उष्णता वाढत आहे परंतु तुम्हाला घाम येत नाहीये. हे उष्णता जास्त झाल्याचे अजून एक लक्षण आहे. अशावेळी पाणी भरपूर प्यावे, पंख्याखाली बसा आणि गरज वाटल्यास बर्फ वापरून तुम्ही शरीराला थंड ठेवण्याचा प्रयत्न करू शकता.

७. तुमच्या शारीरिक क्षमता कमी झाल्यासारखे वाटणे.

तुम्ही पूर्वीसारखे आता कामं करू शकत नाही असे तुम्हाला वाटते का ? तुम्हाला सारखे थकल्यासारखे किंवा आळसावल्या सारखे वाटते का ? जर सामान्यपणे तुम्ही खूप उत्साही राहत असाल तर हे तुमच्या लगेच लक्षात येईल. पाणी पिण्याचे प्रमाण वाढवून बघा. याने फरक न पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

८. हृदयाचे ठोके जलद होणे.

हृदयाच्या ठोक्यांची गती वाढणे ही गरोदरपणातील सामान्य बाब आहे. कारण तुमचे हृदय आता तुमच्यासोबत तुमच्या बाळासाठी देखील काम करत असते. बाळाला सगळे पोषक द्रव्ये मिळावे म्हणून हृदय या काळात जास्त काम करते आहे. पण जर काही शारीरिक हालचाल न करता देखील नेहेमीपेक्षा जास्त गतीने हृदयाचे ठोके वाढले असतील आणि श्वसनाचे काही व्यायाम करून देखील हे थांबत नसेल तर तुमची उष्णता वाढली असू शकते.

९. भोवळ येणे किंवा वस्तू दोन–दोन दिसणे.

जास्त वेळ उन्हात उभे राहून अचानक सावलीत आल्यास जशी भोवळ जाणवते तशीच भोवळ येथे जाणवते. ही उष्णता डिहायड्रेशनमुळे वाढली आहे. असे असल्यास आता पाणी पिण्याचे प्रमाण वाढवायला हवे. तुम्ही पूर्ण झोप होणे देखील महत्वाचे आहे कारण त्यामुळेच तुमच्या शरीराची बाळासाठी जास्तीचे काम केल्यानंतरची झीज भरून निघणार आहे.

१०. श्वास लागणे

याचा संबंध तुमच्या हृदयाच्या वाढलेल्या ठोक्यांच्या गतीशी आहे. तुमचे हृदय नेहेमीपेक्षा दुप्पट वेगाने काम करत आहे. रक्तभिसरणासाठी ऑक्सिजन ची आवश्यकता असते. त्यामुळे श्वास लागू शकतो. ४ सेकंदासाठी दीर्घ श्वास घ्या आणि हळुवार सोडा. असे २-४ वेळा करा. दीर्घ श्वासाने हे नॉर्मल होऊ शकते.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon