Link copied!
Sign in / Sign up
16
Shares

पोटात बाळ असताना पहिल्यांदा त्याची लाथ(Baby Bump) केव्हा जाणवते !


      प्रत्येक आईला जाणून घ्यायला आवडते की, आपल्या पोटातल्या बाळाची पहिली हालचाल केव्हा जाणवायला लागते. दिवसातून किंवा आठवड्यातून कितीवेळा पोटातले बाळ लात मारत असते आणि बाळ का हालचाल करत असतो.

१) सामान्यतः तुमच्या गरोदरपणाच्या १८ व्या आठवड्यात किंवा २० व्या आठवड्यात तुम्हाला बाळाची हालचाल किंवा लात मारतोय असे कळायला लागते. ह्यात काही वेळा बदलही होऊ शकतो. पण खूप स्त्रियांना १८ व्या आठवड्यात जाणवते.

२) ज्या स्त्रिया पहिल्या वेळेस गरोदर असतात त्यांना समजायला थोडे कठीण जाते. पण ज्यावेळी त्यांना जाणीव होते तेव्हा त्यांना खूप आनंदित आणि आयुष्यभरासाठीचा खूप छान अनुभव असतो. हा अनुभव घेण्यासाठी १८ व्या आठवड्यापासून तुम्ही खूप लक्ष द्यायला पाहिजे.

३) दुसऱ्या वेळेस गरोदर असणाऱ्या स्त्रियांना १६ व्या आठवड्यापासून गर्भात बाळ असल्याची हालचाल व्हायला लागते.

४) तुम्हाला जर २४ व्या आठ्वड्यापर्यंत अशी कोणतीही हालचालींची जाणीव होत नसेल तर त्वरित डॉक्टरांना भेटावे. कारण ते तुमच्या बाळाचे हृदयाचे डोके तपासतील. त्यासाठी अल्ट्रासाउंड स्कॅन करतील.

दिवसातून किती बाळाची लाथ अनुभवायला मिळते ?

खूप मातांची जिज्ञासा असते की, माझे बाळ किती लाथ मारत असेल. त्याबाबत आम्हालाही खूप प्रश्न आले होते. व येत असतात. पण खरं म्हणजे बाळ नेमके किती लाथ मारत असते आणि एखाद्या दिवशी बाळाने लाथ मारली नाहीच तर बाळाला काही झाले नाही ना. अशा शंका येतात म्हणून आई विचारते. म्हणून जर बाळाची किक्स (लाथ) तुम्ही मोजायला लागलेच तर एखाद्या दिवशी तुम्हाला जाणवली नाही तर तुम्ही खूप काळजीत पडणार म्हणून त्याचा खूप विचार करत बसू नका.

कारण प्रत्येक पोटातल्या बाळाचे झोप घेणे, झोपेतून उठणे खूप वेगेवगेळे असते त्यांची निश्चित वेळही नसते. आणि जसेजसे दिवस जायला लागतात तुम्हालाच कळायला लागते. बाळ केव्हा किंवा आता काय करत असेल. आणि जर तुमच्या अनुभवानुसार हालचालींमध्ये काही फरक वाटला तर डॉक्टरांना विचारून घ्या.

बाळाची लाथ जाणवली नाही तर काय करायचे ?

५) अशावेळेस तुमचे पाय थोडेसे वरती ठेवून नाश्ता करायचा आणि रिलॅक्स व्हायचे. आणि त्यानंतर इकडे - तिकडे फिरायचे, तुम्ही थांबल्यावर, बाळ झोपला असेल तर त्याला जाग येऊन जाते.

६) थंड पेय घ्या. कारण शरीराचे तापमान बदलामुळे बाळ थोडेसे इकडे - तिकडे हालचाल करायला लागते.

७) मोठ्या आवाजात गाणे ऐका, थोडासा गोंधळ (नॉईज) निर्माण करा.

इतके सर्व केल्यावर बाळाची हालचाल जाणवत नसेल तर डॉक्टरांना भेटा. आणि बाळाच्या हालचालीवर सतत खूप लक्ष ठेवून असा.  

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon