Link copied!
Sign in / Sign up
79
Shares

पोटाची आणि मांडीची चरबी कशी कमी करावी ?

 


                प्रत्येक महिला ही सुंदर असते. प्रत्येक महिलेच्या चेहऱ्याची एक विशिष्ठ ठेवण असते. तसेच त्यांचा विशिष्ठ ड्रेसिंग सेन्स असतो. त्या गोष्टीमुळे ती महिला इतरांपेक्षा वेगळी दिसते. तुम्ही, होय तुम्हीसुद्धा खूप सुंदर आहात. पण या गृहावर अशी एकही महिला नाही, की जी स्वत:च्या सौंदर्यावर पुर्णपणे समाधानी आहे. प्रत्येक महिलेत तिच्या दिसण्याबद्दल एक तरी तक्रार असते. आपला चेहरा गोलकार आहे, आपले केस खूप विरळ आणि लहान आहेत, आपले ओठ खूप लहान किंवा मोठे आहेत किंवा आपण खूप जाड आहोत असं त्यांना वाटतं. तुम्हाला काय वाटतं यापैकी कोणत्या गोष्टींचा महिला जास्त विचार करतात. अंदाज लावा. हो, महिला सर्वात जास्त त्या जाड दिसतात का याचा विचार करत असतात.

समाजाच्या सौंदर्याच्या व्याख्या काय आहेत, त्यानुसार आपण स्वत:ला त्या व्याख्येत बसवण्याचा कधीही प्रयत्न करू नये. त्यापेक्षा आपण आपल्या त्वचेची, केसांची आणि मुख्यत: फिटनेसची योग्य ती काळजी घ्यावी. जर तुम्ही तुमच्या पोटाची आणि मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी प्रयत्नरत असाल, तर तुम्ही तुमच्या दररोजच्या आहारात आणि व्यायामात कोही बदल करणे आवश्यक आहे. जर तुम्ही व्यायाम करत नसाल, किवा व्यायाम केल्याने वजन कमी होतं यावर तुमचा विश्वास नसेल किंवा व्यायामासाठी तुमच्याकडे वेळ नसेल, तर पुढील सर्व माहिती तुमच्यासाठीच आहे.

१. व्यायाम का आणि कधी करावा ?

तंदुरूस्त राहण्यासाठी आपले शरीर हलतं आणि कार्यक्षम असणं खूप आवश्यक आहे. आपलं शरीर हे सारखं तासनतास एकाच जागी बसून राहण्यासाठी बनलेलं नसून नेहमी हलतं ठेवण्यासाठी बनवलेलं आहे. अश्मयुगात आपले पुर्वज अन्नासाठी जंगलात जात असते. प्राणी हे मानवापेक्षा जास्त वेगाने पळत असतं. त्यामुळे त्यावेळी प्राण्यांची शिकार करण्यासाठी मानवाला स्वत:ला प्राण्यांपेक्षाही वेगवान बनवले. तसेच भक्षकापासून स्वत:चे आणि कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी आपल्याला वेगात धावणे आवश्यक होते.

आता आपण मोबाईववरून जेवनाच्या होम ऑर्डर देतो. आता किराणा सामान किंवा भाजीपाला आणण्यासाठीही घरातून बाहेर पडण्याची आवश्यकता नाही. तेही आपण ऑनलाईन शॉपिंगवरूनच खरेदी करतो. आपण या सर्व गोष्टी वेळेची बचत करण्यासाठी करत असतो. पण एक्स्ट्रा डिलिव्हरी चार्ज देण्यापेक्षा पायी जावून किराणा सामान आणणं कसं राहील ? किराणा माल हातात धरा. ते तुम्हाला वेटलिफ्टिंग सारखंच वाटेल. ऑफिसमध्ये दर अर्ध्या तासाला उठून  थोड चालत पाणी प्या.

दररो मॉर्निग वॉकला जा. खरंच हे काही तेवढं अवघडं नाहीये. जर तुमची सकाळं खूपच व्यस्त असेल, तर एक तास लवकर उठा. घरातील इतर कुणाला तरी तुमच्यासोबत घेवून वॉकला जा. तुम्ही दररोज सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्याने सुर्याची किरणे अंगावर पडून तुम्हाला व्हिटॅमीन डीसुद्धा मिळेल. त्यानंतर परत आल्यावर एक ग्लास दुध प्या. तुमच्या हाडांना आराम मिळेल. त्यापासून तुम्हा कॅल्शिअम मिळेल. जर तुम्ही काही वेळासाठीही रूममध्ये एकट्या असाल, तर थोडावेळ उड्या मारा. त्यामुळे तुमच्या शरीरातील काही कॅलरीज कमी होती. त्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल.

२. कोणत्या प्रकारचा व्यायाम करावा.

जर तुम्हा फक्त पोट आणि मांडीवरील चरबीच कमी करायची असेल, तर तुमची निरशा होईल. कारण फक्त पोट आणि मांडीवरील चरबी कमी करणारा कोणताही व्यायाम नाही. जेव्हा तुम्ही व्यायाम कराल, तेव्हा तुमच्या सर्वच शरीरावरील चरबी कमी होईल. जर तुमच्या पोटावर आणि मांडीवर जास्तच चरबी असेल. तर व्यायाम आणि डायटचा योग्य तो समन्वय साधून तुम्ही ती कमी करू शकता.

दररोज नव्या मसल्सवर काम करण्यासाठी थोडा वेळ द्या. सोमावारी पायांवर मेहनत घ्या. ज्यात तुम्ही पाय दुमडून बसणे(स्क्वॅट), दोरीवरच्या उड्या मारू शकता. मंगळवारी मुख्य स्नायूंवर मेहनत घ्य़ा. त्यात तुम्ही प्लॅण्क्स, पुश-अप्स आणि क्रंचेस करू शकता. बुधवारी कार्डिओ एक्सरसाईज करा. ज्यात दोरीवरच्या उज्या, वेगात धावणे असे व्यायाम करू शकता. गुरूवारी वेटलिफ्टिंग करा. आठवड्याचा मधला दिवस असल्याने या दिवशी तुम्ही आरामदायी व्यायाम करू शकता. ज्यामुळे तुमच्या स्नायुंना आराम मिळेल. जेव्हा तुम्हाला थकवा आला असेल किंवा स्नायू दुखत असतील, तेव्हा तुम्ही स्ट्रेचिंग आणि योगा करू शकता. इतर दिवशी तुम्ही तुमचं शरीर स्करीय ठेवण्यासाठी एरोबिक्स करू शकता.

३. तुम्ही काय खावं

तुम्ही वजन कमी करण्यावर काम सुरू केलं आहे, याचा अर्थ तुम्ही खाणं थांबवाव असं नाही. तसं न करता तुम्ही काय खाता, ते तुम्ही बदलवलं पाहिजे. तुम्ही जास्त प्रोटिन्स, फॅट, व्हिटॅमिन्स आणि खनिज असलेले अन्न खायला हवे. कार्बोहायड्रेट कमी असलेले पदार्थ तुमच्या फॅट बर्न करण्यास मदत करतात. पण तुमचे वजन कमी करत असताना, तुमचं शरीर नेहमी हायड्रेट असेल याची काळजी घ्या.

तुमच्या आहारात मांस, अंडी, दूग्धजन्य पदार्थ, काजू आणि खूप सारी फळं आणि भाज्या असणं आवश्यक आहे. जास्तीत जास्ती पाणी आणि ज्यूस पिऊन नेहमी शरीर हायड्रेट ठेवा. तुम्ही वेगवेगळे सुप आणि हर्बल टी पीणेही उपयुक्त ठरतं.     

 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon