Link copied!
Sign in / Sign up
16
Shares

तान्हा बाळापासून ते सर्व जगाला छळणाऱ्या पोलिओविषयी !


पोलिओ ह्याविषयी सर्वजण एकूण असतात पण ह्या रोगाविषयी कुणाला काही माहिती नसते आणि जर असेल तीही वरवरची असते. आणि पोलिओ ह्या रोगाने मानवजातीला खूप छळले होते. हा रोग लहान मुलाच्या हातापायाला लुळे पाडणारा आणि विषाणूची बाधा आपल्या बाळाला होऊ नये म्हणून पोलिओची लस देत असतात.

१) पोलियोमायलिटीस हा आजार प्रामु‘याने पोलिओ नावाने ओळखला जातो. हा आजार लहान मुलांपासून तरुणांदेखील होण्याची शक्यता असते. पोलिओचा विषाणू संसर्गजन्य संक‘मणास चालना देऊन सर्वात आधी सबंधित रुग्णाच्या घशाला आणि नंतर आतड्यात पसरतो. पोलिओ एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीमध्ये पसरण्याचे कारण बाधित रुग्णाची विष्ठा देखील असू शकते. मोकळ्या जागेवर अशा रुग्णांनी शौच केल्याने त्यातूनही आजूबाजूच्या परिसराचे वातावरण प्रदूषित होते. अशा ठिकाणी नाकावाटे आणि तोंडाद्वारे पोलिओचा संसर्ग होऊ शकतो.

२) यानंतर 1955 मध्ये पहिल्यांदा पोलिओवरील लसीचा शोध लागला. ही लस दोन प्रकारामध्ये असते. पहिला प्रकार ‘निष्कि‘य पोलिओव्हिरस लस (आयपीव्ही) दुसरा प्रकार म्हणजे ओरल पोलियोव्हायरस वॅक्सिन (ओपीव्ही)

३) ओपीव्ही मध्ये पोलिओ विषाणूचा वापर केला जातो. आयपीव्ही मध्ये नावाप्रमाणेच एखाद्या रुग्णाच्या घातक, सांसर्गिक पोलिओ संक‘मणापासून संरक्षण करण्यासाठी निष्कि‘य केलेल्या पोलियोव्हायरस जातींचा वापर केला जातो. या दोन्ही लसी पोलिओ विरुध्द लढण्यासाठी अतिशय प्रभावी आहेत.

४) काही रुग्णांना ओपीव्ही लस दिल्यानंतर देखील ते पोलिओ ग‘स्त झाले. अखेरीस सन 2000 मध्ये अमेरिकेने ओपीव्ही ऐवजी आयपीव्हीला पोलिओची लस म्हणून निवडले.

५) आयपीव्हीची मात्रा

बर्‍याच लसींमध्ये ज्या प्रकारे निष्कि‘य किंवा अ‍ॅटीन्यूएटेड व्हायरसचा उपयोग केला जातो त्याचप्रमाणे आयपीव्ही लसही कार्य करते. यामध्ये देखील ही लस रोगप्रतिकारक प्रणालीला उत्तेजित करते व प्रतिपिंडे तयार करते जी पोलिओ विषाणू आणि संसर्गाविरुध्द आपले संरक्षण करते.

६) पोलिओचा सर्वाधिक प्रभाव लहान मुलांवर पडतो हे जेव्हा शास्त्रज्ञांच्या लक्षात आले तेव्हापासून सर्व मुलांना सुरक्षिततेच्या दृष्टीने ही लस प्राधान्याने दिली गेली.

७) आयपीव्ही म्हणजे चार डोसचे लसीकरण

१.१) या लसीचा पहिली मात्रा बाळ दोन महिन्यांचे असताना, दुसरा बाळ चार महिन्यांचे झाल्यावर व तिसरी मात्रा सहा ते अठरा महिन्यांच्या दरम्यान दिली जाते.

१.२) शेवटची मात्रा ही चार ते सहा वर्ष वयोगटातील मुलांना दिली जाते. या लसीची मात्रा शक्यतो पाय किंवा खांद्याला इंजक्शनने दिली जाते.

८) आयपीव्ही देण्याचा विचार कधी दिला जातो

पोलिओची लस जशी लहान मुलांना आवश्यक असते तशी त्याची गरज खाली दिलेल्या प्रौढांना देखील असते. विशेषत: आयपीव्हीची लस ही संभाव्य शक्यता व धोके लक्षात घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने केली जाते.

१.१) ज्या व्यक्ती पोलिओ विषाणू संशोधन किंवा प्रयोगशाळेत किंवा आरोग्य आधिकारी म्हणून कार्यरत असतात किंवा ज्या व्यक्ती सतत पोलिओ रुग्णांच्या संपर्कात असतात त्यांनी आयपीव्हीची लस जरूर घ्यावी.

१.२) पोलिओ विषाणूचे ज्या क्षेत्रात प्रचंड अस्तित्व आहे, संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे अशा ठिकाणच्या व्यक्तींनी ही लस घेणे महत्वाचे असते.

१.३) ज्या व्यक्तींना भूतकाळात कधी आयपीव्हीची लस घेतली नाहीये त्यांनी आयपीव्हीची मात्रा खालील प्रमाणे घ्यावी. 

- पहिली मात्रा डॉक्टरांच्या सल्ल्याने निश्चित केली जाते.

- त्यानंतर दुसरी मात्रा ही पहिल्या मात्रेनंतर एक ते दोन महिन्यांनी दिली जाते.

- दुसर्‍या मात्रेनंतर आयपीव्हीची तिसरी मात्रा सहा ते बारा महिन्याच्या आत दिली जाते.

- यामध्ये चौथी मात्रा समाविष्ट नाही.

९) आयपीव्हीची मात्रा कोणी टाळावी?

काही विशिष्ट परिस्थितीत आयपीव्हीची लस देणे टाळले पाहिजे.

१.१) ज्या व्यक्तींना लसीची अ‍ॅलर्जी असते (साधारणपणे पहिल्या मात्रेनंतर लगेच दिसून येते) किंवा ज्यांना नियोमायसीन,स्ट्रेप्टोेमायसीन किंवा पॉलीमायक्सिनची अ‍ॅलर्जी आहे.

१.२) गर्भवती महिलांनीही आयपीव्ही घेणे टाळावे.

या संदर्भात नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणनुसार सर्व देशांत पोलिओच्या मोफत लसीकरणाविषयी जनजागृती केली जात आहे. हा कार्यक‘म अहोरात्र सर्व देशांत सुरू आहे. या जनजागृती कार्यक‘माला अपवाद केवळ नायजेरिया,पाकिस्तान,अफगाणिस्तान सारखे देश आहेत.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon