Link copied!
Sign in / Sign up
99
Shares

पोहे ह्या कारणांमुळे खायलाच हवे ?

             पोहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात केले जाते. आणि त्याविषयी तुम्हाला जाणून घ्यायला आवडेलच. पोहे हा नाश्त्यात केला जाणारा पदार्थ. कोणत्याही वेळेला खाता येईल असा पदार्थ. आणि पचायलाही हलका आणि सोयीस्कर. पोह्यांमुळे शरीरात आयर्नची कमतरता किंवा अ‍ॅनिमिया जडण्याची शक्यता कमी होते. लहान मुलांप्रमाणेच, गरोदर स्त्रिया तसेच नवमातांनी नाश्त्याला पोहे खाणे हितकारी आहे. आयर्नमुळे हिमोग्लोबिनची निर्मिती सुधारते तसेच रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण सुधारल्याने रोगप्रतिकारशक्तीदेखील सुधारते. पोहे बनवल्यानंतर त्यावर लिंबाचा रस पिळल्यास अधिक चांगल्या प्रकारे आयर्नचे शोषण होण्यास मदत होते.

पोह्यांमुळे शरीरात आयर्नची कमतरता किंवा अ‍ॅनिमिया जडण्याची शक्यता कमी होते. 100 ग्रॅम कच्च्या पोह्यातून शरीराला 20 mg आयर्न मिळते. लहान मुलांप्रमाणेच, गरोदर स्त्रिया तसेच नवमातांनी नाश्त्याला पोहे खाणे हितकारी आहे. आयर्नमुळे हिमोग्लोबिनची निर्मिती सुधारते तसेच रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण सुधारल्याने रोगप्रतिकारशक्तीदेखील सुधारते. पोहे बनवल्यानंतर त्यावर लिंबाचा रस पिळल्यास अधिक चांगल्या प्रकारे आयर्नचे शोषण होण्यास मदत होते.

पोहे पौष्टिक आणि पचायला हलके

पोह्यांमध्ये भाज्या घातल्याने त्यातील व्हिटामिन,मिनरल्स व फायबरचे प्रमाण वाढते. आवडीनुसार त्यात मोड आलेली कडधान्य, सोयाबीन,शेंगदाणे किंवा उकडलेले अंड मिसळल्याने त्यात प्रोटीन्सची मात्रा वाढते. पोह्यांची पोषणता वाढण्यासाठी पांढर्‍या पोह्यांऐवजी लाल पोहे (हातसडीचे) वापरावेत. जरूर वाचा

कार्बोहायड्रेट्स मिळतात

वाटीभर पोह्यातून शरीराला मुबलक प्रमाणात कार्बोहायड्रेट्स मिळतात. त्यामुळे पोहे हा नाश्त्याचा उत्तम पर्याय आहे. कार्बोहायड्रेसमुळे शरीरात उर्जा निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे वेळी-अवेळी लागणार्‍या भूकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी चिप्स किंवा बिस्कीटं खाण्याऐवजी पोहे फारच आरोग्यदायी आहेत.

ग्ल्युटनचे प्रमाण कमी असते

ग्ल्युटेनचे प्रमाण वाढू नये म्हणून अनेकजण गहू, बार्ली अशा धान्यांचा आहारातील समावेश कमी करतात. मात्र प्रत्यक्षात या धान्यांमुळे ग्लुटेनच्या प्रमाणात फारसा चढा-उतार होत नाही.

डायबेटीस असणाऱ्यांना खूप लाभदायक

मधुमेहींसाठी पोहे हा अत्यंत पोषक नाश्त्याचा पर्याय आहे. कारण पोह्यांचा आहारात समावेश केल्यास रक्तातील साखर हळूहळू वाढते. तसेच पोटभर पोहे खाल्ल्याने बराच वेळ भूकेवर नियंत्रण मिळवण्यास मदत होते. मधुमेहींनी पोह्यांची पोषकता वाढवण्यासाठी त्यात सोयाचा वापर करावा.

 

 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon