स्त्रीने सुंदर दिसायलाच हवे. आणि खूप स्त्रियांना स्वतःला सजवणे आवडते. त्यामुळे स्वतःला खूप आत्मविश्वास आल्यासारखे वाटते. खूप पुरुष किंवा काही स्त्रिया ह्या स्त्रियांच्या नटण्यावर टीका करतात. पतीही बोलत असतात की, तू खूपच सजत असते. पण खरी गोष्ट अशी आहे की, स्वतःला मेकअप करण्याने व तिला आत्मविश्वास येत असतो आणि हे कोणत्याही स्त्री साठी महत्वाचे आहे. बऱ्याच फेमिनीजमला मानणाऱ्या स्त्रियासुद्धा स्त्रियांच्या नटण्यावर टीका करतात पण मेक अप केल्यामुळे जर तुम्हाला उत्साहित व ठामपणा येत असेल तर त्यात काहीच चुकीचे नाही. तेव्हा ह्याच मेक अप च्या काही गोष्टीवरून काही माहिती.
१) मेक अप मध्ये, क्लीनअप, थ्रेडिंग, ब्लीचिंग ह्यातच फेशियल नावाचा प्रकार येतो. आणि हा स्त्रियांचा आवडता प्रकार आहे. फेशियल मध्ये, त्वचा ग्लो(तेज) होण्यासाठी खूप चांगले असते. ह्यात त्वचेवरच्या मृत पेशी निघून जाऊन त्वचा ही खूप मऊ आणि निखळ होऊन जाते. आणि हे फेशियल तुम्ही घरही करू शकता ह्यासाठी काही ब्लॉग/लेख हे घरगुती फेशियल साठी लिहले आहेत. ते तुम्ही पाहू शकता. आणि काही स्त्रिया ह्या पार्लर मध्ये फेशियल करतात.
२) पण काही स्त्रिया ह्या फेशियल नंतर काही चुका करून टाकतात त्यामुळे त्या कोणत्या आणि त्या न करता तुमचे फेशियल केलेले कसे वाया जाणार नाही आणि चेहऱ्यालाही धक्का लागणार नाही त्यासाठी हा ब्लॉग.
३) जर तुम्हाला वाटतं असेल की, आता फेशियल झालेय तेव्हा लगेच फेसवॉश करून तुमचा चेहरा आणखी उजळून निघेल असे समजून त्याला फेसवॉश लावू नका. किंवा साबणही लावू नका. कारण तुमचा चेहरा क्लीन होण्यापेक्षा केमिकल मुळे खराब होऊ शकतो.
४) जर तुम्हाला फेशियल करायचे असेल तर संध्याकाळी करा कारण फेशियल केल्यानंतर उन्हात जाऊ नका. आणि संध्याकाळी फेशियल केल्यावर तुम्हाला बाहेर निघता येणार नाही. जर तुम्हाला बाहेर जावेच लागत असेल तर उन्हापासून बचाव करण्यासाठी मास्क लावून घ्या. कारण फेशियलनंतर तुमचा चेहरा हा सॉफ्ट होत असतो. आणि लगेच अल्ट्राव्हायोलेट किरण हे तुमच्या चेहऱ्यावर परिणाम करू शकता.

५) केमिकल युक्त आणि कॉस्मेटिक प्रोडक्ट लगेच फेशियलवर लावू नका. त्वचेला स्किन इन्फेक्शन होऊ शकते. आणि नवीन क्रीम लावायचा प्रयत्न तर बिलकुल करू नका.
