Link copied!
Sign in / Sign up
14
Shares

फेशियल केल्यानंतर चेहऱ्यावर ह्या गोष्टी चुकूनही करू नका...

   जसे जसे तुमचे वय वाढत जाते तसे बऱ्याच मॉम्स स्किन केयर साठी फेशियल रॅट करत असते. आणि ही गोष्ट स्किन साठी महत्वाची असते. कारण ह्यामधून स्किनला पोषक घटक माळून जातात आणि पोषण मिळते. आणि त्याचबरोबर त्वचेवर जमणारी धूळ आणि मातीचे कण चेहऱ्याला लागली असतात. आणि फेशियल मुळे तुमची शरीर रिलॅक्स होत असते.

       १) काही स्त्रिया महिन्यातून किंवा दोन महिन्यातून फेशियल करत असतात. पण तुम्हाला फेशियल करण्यावेळी काही गोष्टीबाबत लक्ष द्यायला हवे. कारण प्रत्येक पार्लर मध्ये फेशीयल केले जाते पण त्यामधून तुमच्या त्वचेला कोणते फेशियल योग्य राहील आणि सूट होईल. हा प्रश्न आहे?

      २) कारण काही स्त्रिया फेशियल करून टाकतात पण त्यांना त्या त्वचेवर ऍलर्जी सारखी समस्या यायला लागते. म्हणून तुमच्या त्वचेवर कोणते फेशियल योग्य राहील ह्याचा विचार करून घ्यायला हवा. त्यासाठी तुमचा मागचा अनुभव कामास येईल.

ह्या ब्लॉगमधून तुम्हाला फेशियल नंतर कोणत्या चुका करायच्या नाहीत त्याविषयी आम्ही सांगणार आहोत.

३) चार तासापर्यंत तोंड धुवायचे नाही

फेशियल मध्ये जितक्याही क्रीमचा वापर केला जातो. त्यात खूप सारे पोषक घटक असतात. त्यामुळे त्यांचा प्रभावी परिणाम होण्यासाठी फेशियल काही वेळेपर्यंत राहू द्यावे.

४) सिरम लावू नका

फेशियल नंतर सिरम लावू नका त्यामुळे तुमची त्वचा आणखी सेन्सिटिव्ह होऊ शकते. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात . त्यामुळे फेशियल नंतर एक आठवड्या पर्यंत सिरम लावू नका.

५) मेकअप करू नका

फेशियल केले असेल तर लगेच मेक अप करू नका. कारण मेक अप मध्ये खूप सारे केमिकल असतात जी तुमच्या त्वचेवर खूप वाईट परिणाम करू शकता. फेशियल नंतर तुमच्या त्वचेला श्वास घ्यायला मोकळी राहू द्या.

६) पिंपल फोडू नका

काही स्त्रियांना फेशियल केल्यावर पिंपल्स येतात पण ही सामान्य गोष्ट आहे. म्हणून तुम्ही पिंपल्स फोडू नका. कारण त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर काळी निशाण येऊ शकतात.

७) उन्हापासून त्वचेला सुरक्षित ठेवा

फेशियल केल्यानंतर उन्हात जाऊ नका. कारण ह्यामुळे स्किनबर्न होऊ शकतो. आणि जर बाहेर पडावे लागत असेलच तर चेहरा व्यवस्थित झाकून घ्या.

८) स्क्रब करू नका

जर तुम्ही आताच फेशियल केलं असेल तर लगेच स्क्रब केल्याने चेहरा बिघडण्याचा धोका असतो. त्यासाठी ३ दिवसानंतर स्क्रब करा. त्याचबरोबर आयब्रो वैगरे सुद्धा करू नका.

 

कारण फेशियल केले आहे आणि त्यात त्वचा घासली जात असते. तुमच्या चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी ह्या गोष्टी बिलकुल करू नका. आणि ह्या केल्यावर काय होते ह्याचा अनुभव तुम्हाला असेलच. 

 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon