Link copied!
Sign in / Sign up
12
Shares

पीसीओएस असताना गर्भारपण व प्रसूती याबाबत जाणून घ्या

गर्भारपण हे स्त्रीच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाची आणि आनंदाचे गोष्ट असते, पण काही स्त्रियांसाठी आनंददायी तसेच त्रासदायक आणि अवघड देखिल असते. विशेषतः ज्या महिलांना पीसीओएस म्हणजेच पॉलीसिस्टिक ओव्हरीन सिंड्रोम समस्या असते  त्यांच्यासाठी हा काळ हा खूप नाजूक असतो. त्यामुळे या महिलांनी पुढील गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे.

पॉलीसिस्टिक ओव्हरीन सिंड्रोम म्हणजे काय ?

पीसीओएस, ज्यास स्टीन-लिव्हेन्थल सिन्ड्रोम असेही म्हटले जाते. या समस्येमध्ये  स्त्रियांमध्ये हार्मोनल असंतुलनहोते आणि . स्त्रियांमध्ये पुरुष हार्मोन्स जास्त प्रमाणात निर्माण होऊन स्त्रवते.

पीसीओडी(PCOD) म्हणजे polycystic ovarian disease. यामध्ये स्त्रियांच्या अंडाशयात  (ovaries ) मध्ये गाठी होतात आणि त्यामुळे स्त्रियांना वेळच्यावेळी स्त्रीबीज (egg ) तयार होण्यास अडथळे निर्माण होतात.डिंब ग्रंथी मधून एक परिपक्व असे स्त्रीबीज बाहेर पडते. आणि  या स्त्रीबीजाचे मिलन शुक्राणूशी झाल्यावर गर्भाची निर्मिती होते व स्त्री गरोदर होते ज्या स्त्रियांची मासिकपाळी हि फारच अनियमित असले पीसीओएस तपासणी करणे आवश्यक ठरते

पुढील काही लक्षणं असणाऱ्या महिलांना पीसीओडी होण्याची शक्यता अधिक असते.

१.  अति लठ्ठ महिला ( साधारणतः ज्यांची कंबर ४० पेक्षा जास्त असते)

२. अनुवंशिकता

३. अनियमित आणि विचित्र अशी जीवनपद्धती

 ४. जास्त प्रमाणात जंक फूड खाणे.

५. मधुमेह असणाऱ्या स्त्रिया

पीसीओएस ची लक्षणे

१. अनियमित मासिकपाळी

२. चेहऱ्यावर हात-पायावर केसांचे अति वाढ

३. लठ्ठपणा

४. मासिकपाळीतील आत्यंतिक वेदना

५. गर्भ न राहणे

६. खाण्यानंतर देखील अशक्तपणा

७.  केस गळणे

८. त्वचेवरील वांग

९. चेहऱ्यावरील पुटकुळ्या

पीसीओएसचा गर्भारपणावर काय आणि कसा परिणाम होतो

१. गर्भपात

साधारणतः गर्भधारणेच्या पहिल्या २० आठवड्यात गर्भपात होण्याचा धोका असतो. हाच धोका पीसीओएस असणाऱ्या स्त्रीला सामान्य गर्भधारणा असणाऱ्या स्त्रीपेक्षा ३ पटीने जास्त असण्याची शक्यता असते

२.गरोदरपणात होणारा मधुमेह 

पीसीओएस असलेल्या गर्भवती महिलांमध्ये आणखी एक प्रमुख समस्या गर्भधारणेचे मधुमेह आहे. गर्भवती स्त्रियांमध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्याने होणारा हा एक प्रकारचा मधुमेह आहे. बहुतेकदा बाळाचा जन्म झाल्यानंतर या प्रकारचा मधुमेह बरा होतो. या  प्रकारचा मधुमेह सर्वसाधारणतः गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यात तिसऱ्या त्रैमासिकात होण्याची शक्यता असते. परंतु पीसीओएस असलेल्या महिलांमधे, जरा लवकर आढळून येण्याची शक्यता असते. असे असले तरी त्यावर उपचार करता येण्यासारखे आहे आणि नियंत्रित केला जाऊ शकतो. या प्रकारचा मधुमेह असणाऱ्या स्त्रियांची प्रसूती सी-सेक्शन प्रसूती या पद्धतीने होण्याची शक्यता जास्त असते. तसेच गरोदरपणात मधुमेह होणाऱ्या स्त्रियांना पुढील आयुष्यात देखील मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते.

३. प्रीक्लॅम्पसिया

प्रीक्लॅम्पसिया हा विकार केवळ गर्भावस्थेच्या शेवटी होत असतो. ही मुळातच एक गर्भधारणा व्याधी आहे, ज्यामध्ये उच्च रक्तदाबाची सुरूवात आणि मूत्रा मध्ये लक्षणीय प्रथिने आढळून येतात. जर स्थिती अधिक बिघडली तर गर्भवती स्त्रिया आणि त्यांच्या बाळांना हानिकारक ठरु शकते. त्यासाठी जितक्या लवकर होईल तितक्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

 

४. रक्तदाबाविषयक समस्या

ही स्थिती गर्भधारणेच्या दुसऱ्या सहामाहीत होऊ शकते आणि रक्तदाब वाढल्यामुळे होते. या परिस्थितीमुळे प्रीक्लॅम्पसिया देखील होऊ शकतो.आणि यामुळे प्रसूतीवर देखील परिणाम होऊ शकतो. यामुळे अनेक स्त्रियांची सी-सेक्शन प्रसूती झाल्याचे आढळून आले आहे.

५. बाळाचा वेळे आधी जन्म होणे

सर्वसाधारण गर्भधारण हि ३७ ते ४२ आठवड्यांची असते. परंतु पीसीओएस असणाऱ्या गरोदर महिलांसाठी हा काळ काम होऊन लवकर प्रसूती होण्याची शक्यता असते.आणि यामुळे मुल अशक्त होऊ शकते किंवा त्याला भविष्यात आरोग्य विषयी समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

६. सी-सेक्शन सिझेरियन प्रसूती

ज्या स्त्रियांना पीसीओएस हि समस्या असते त्या स्त्रियांची प्रसूती सी-सेक्शन म्हणजेच सिझेरियन पद्धतीने होण्याची शक्यता जास्त असते. तसेच प्रसूती दरम्यान समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

पीसीओएस असतानाची गर्भधारण ही  नक्कीच अवघड असली तरी.. अशक्य नाही.. समस्याविषयक योग्य काळजी  घेतल्याने पीसीओएस असले तरी त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या कमी होऊ शकतात. यासाठी गरोदरपणात योग्य प्रमाणात वजन कायम ठेवा. रक्तदाब आणि मधुमेहाबाबत जागरूक राहा तसेच डॉक्टर सुचवतील त्या शरीरास आवश्यक असणाऱ्या घटकांचे सेवन करा…यामुळे पीसीओएस मुले निर्माण होणाऱ्या गरोदरपणतील  आणि प्रसुती दरम्यानच्या समस्या कमी होण्यास मदत होईल.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon