Link copied!
Sign in / Sign up
61
Shares

पीसीओएसच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

 

स्पर्धेच्या युगात सध्याच्या ताणतणाव वाढले आहेत. जीवनशैलीमध्ये वेगाने बदल झाले आहेत. व्यायामाचा अभाव, जेवण्याच्या अनियमित वेळा या सर्वांचा परिणाम हा आजार वाढण्यात होत आहे. त्यामुळे या आजाराने गंभीर स्वरूप धारण केले आहे.

महिलांमध्ये स्त्री-बिजांडकोष एक परिपक्व स्त्रीबीज तयार करते. पण, ‘पॉलिसिस्टिक ओव्हरी’ या स्त्री-बिजांडकोषापेक्षा आकाराने मोठय़ा असतात. त्यामुळे गर्भधारणेसाठी आवश्यक असणारे परिपक्व स्त्रीबीज तयार होऊ शकत नाही. त्यामुळे,गर्भधारणेस समस्या निर्माण होतात आणि संबंधित महिला गरोदर राहिल्यास तिला गर्भपाताचा धोका अधिक असतो.व्यायामाचा अभाव, अन्नधान्यांमधील रासायनिक द्रव्ये, कीटकनाशके, प्रदूषण, धूम्रपान, मद्याचे सेवन, कामाच्या बदलत्या वेळांमुळे यांमुळे पीसीओएस'चे प्रमाण वाढत आहे.

या समस्येची काही लक्षणे आहे ती कोणती ती आपण पाहून आहोत त्यामुळे या समस्येबाबत जागरूक राहायला मदत होईल.

१. अनियमित मासिकपाळी.

अनियमित येणारी मासिकपाळी ही या समस्याबाबतचे प्रमुख लक्षण असू शकते. बऱ्याच वेळा अनियमित मासिकपाळी मागचे कारण जाणून घेत असताना पीसीओसी समस्या लक्षात येते.  त्यासाठी स्त्रिरोगतज्ञांकडून निदान करून घेणे आवश्यक आहे.

२. जास्त प्रमाणात मुरमे येणे.

 चेहर्‍यावर मुरूमं येण्याची समस्या तारुण्यात हार्मोन्सच्या असंतुलनामुळे अनेकांमध्ये आढळून येते.पण हे प्रमाण अधिक असल्यास व तसेच चेहऱ्यावर  डार्क पॅच दिसणे, चेहरा तेलकट होणे. शिव समस्या आढळ्यास हे हार्मोन्सचे असंतुलन आहे की पीसीओएस  हे डॉक्टरकडून जाणून घ्या. 

३. थकवा 

हायपोथायरॉईडिझम,मधुमेह ,हृदयरोग आदि विविध कारणांमुळे किंवा शारीरिक श्रम,पोषक तत्वाची आहारातील कमतरता यांमुळे थकवा येऊ शकतो. परंतु यापैकी कोणतीही  समस्या नसताना किंवा कोणतंही शारारीक श्रम ना करता सतत थकवा जाणवणे. हे एक पीसीओएस असल्याचे कारण असाव शकते. 

४. सतत मूड बदलणे 

 मूडमध्ये बदल होण्यास इतरही काही कारणं कारणीभूत ठरतात. त्यामुळे म्ह पीसीओएसची इतरही काही लक्षणं आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा

५. केसाचे गळणे.

 डोक्यावरील केस गळण्याची, पातळ होण्याची समस्या वाढते. त्यामुळे केसगळतीची समस्या खूपच वाढली असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

६. अनावश्यक केसांची वाढ.

पीसीओएसमुळे अनावश्यक केस वाढतात. टेस्टोस्टेरोन हार्मोनची वाढ अतिप्रमाणात झाल्यास अनावश्यक केसांची वाढ होते टेस्टोस्टेरोन हार्मोनची वाढ पीसीओएस मागील हे एक प्रमुख कारण आहे. यामुळे ओठांवर,हनुवटीवर,छातीवर तसेच इनर थाईजमधील केसांची वाढ अधिकप्रमाणात होते. 

७. वजन वाढणं 

 पीसीओएसचे एक लक्षण म्हणजे वाढते वजन. प्रामुख्याने हे कमरेजवळ वाढते. तसेच ते आटोक्यात आणण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon