Link copied!
Sign in / Sign up
258
Shares

मुली आणि महिलांना होणारे पीसीओडी म्हणजे काय ?

मासिकपाळी अनियमित झाल्यावर आपण डॉक्टरांच्या तोंडून पीसीओडी हा शब्द ऐकत असतो  PCOD म्हणजे नेमके काय आणि कश्यामुळे होतो हे आपण जाणून घेणार आहोत. याला आधुनिक जगातला आजार म्हणाला तर काही चुकीचे ठरणार नाही. आजकाल हा आजार बऱ्याच महिलांमध्ये आढळून येतो. या आजाराच्या बाबतील महिलांमध्ये फारच कमी प्रमाणात जागरूकता आहे.

PCOD म्हणजे काय ?

 

पीसीओडी(PCOD) म्हणजे polycystic ovarian disease. यामध्ये स्त्रियांच्या अंडाशयात  (ovaries ) मध्ये गाठी होतात आणि त्यामुळे स्त्रियांना वेळच्यावेळी स्त्रीबीज  (egg ) तयार होण्यास अडथळे निर्माण होतात.

गरोदरपण आणि पीसीओडी

डिंब ग्रंथी मधून एक परिपक्व असे स्त्रीबीज बाहेर पडते. आणि  या स्त्रीबीजाचे मिलन शुक्राणूशी झाल्यावर गर्भाची निर्मिती होते व स्त्री गरोदर होते ज्या स्त्रियांची मासिकपाळी हि फारच अनियमित असले  पीसीओडीची तपासणी करणे आवश्यक ठरते

पीसीओडी कोणाला होऊ शकते

पुढील काही लक्षणं असणाऱ्या महिलांना पीसीओडी होण्याची शक्यता अधिक असते.

१.  अति लठ्ठ महिला ( साधारणतः ज्यांची कंबर ४० पेक्षा जास्त असते)

२. अनुवंशिकता

३. अनियमित आणि विचित्र अशी जीवनपद्धती

४. जास्त प्रमाणात जंक फूड खाणे.

५. मधुमेह असणाऱ्या स्त्रिया

पीसीओडीची लक्षणे

१. अनियमित मासिकपाळी

२. चेहऱ्यावर हात-पायावर केसांचे अति वाढ

३. लठ्ठपणा

४. मासिकपाळीतील आत्यंतिक वेदना

५. गर्भ ना राहणे

६. खाण्यानंतर देखील अशक्तपणा

७.  केस गळणे

८. त्वचेवरील वांग

९. चेहऱ्यावरील पुटकुळ्या

पीसीओडी  आणि उपाय

जर पीसीओडी मुळे  गर्भ राहण्यास जर समस्या होत असतील तर सुरवातीला डॉक्टर वजन नियंत्रित करायला  सांगतात तसेच नंतर काही व्यायामाचे प्रकार आणि योग्य प्रकार करायला सांगतात तसेच पुढील काही  कृत्रिम संप्रेक्रके देण्यात येतात. प्रत्येक स्त्रीच्या प्रकृतीनुसार  विविध तपासण्या आणि करून उपाय करण्यात येतात. पीसीओडी असणाऱ्यांना प्रथम वजन नियंत्रित करण्याचा सल्ला देण्यात येतो.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon