Link copied!
Sign in / Sign up
16
Shares

पायांना सूज का येते.

पायांना येणारी सूज हि विविध आजारांचे लक्षण आहे. आणि हि समस्या आजकाल सर्व वयोगटातील लोकांमध्ये आढळून येत आहे.शरीराच्या खालच्या भागातील टिश्यूजमध्ये द्रवपदार्थ साठल्यामुळे पायांना सूज येते.या समस्येला’Oedema’असेही म्हणतात. पायांवर येणाऱ्या सुजेकडे कधीच दुर्लक्ष करू नये. डॉक्टरांना दाखवून त्यामागचे कारण जाणून घेऊन उपचार करावे.

पायाला येणाऱ्या सूज ही दोन प्रकारची असते. हे प्रकार म्हणजे पीटींग आणि नॉन-पीटींंग.

१. पीटींग सूज

अश्या प्रकराची सूज आली असल्यास या सूजेवर दाबले असता खळगा पडतो व काही सेंकदानी तो पुर्ववत होतो.

२. नॉन-पीटींग सूज

या प्रकारच्या सूजेवर दाबले असता खळगा पडत नाही.

पाय सुजण्याची कारणे

१. रक्तदाब आणि हृदय विषयक समस्या 

२. किडनी संदर्भातील समस्या

३. रक्तवाहिनीमध्ये रक्त गोठणे

४.नसांमध्ये अशुद्ध रक्त साठणे 

५. वाढते वय

६.गरोदरपण

७. मधूमेह

८. जखम होणे

९. अतिरिक्त वजनाची वाढ 

१०. आहारात मीठाचे प्रमाण अधिक असणे

११. औषधाचे दुष्परिणाम

उपाय

१. प्रथम पायांना आलेली सूज का आली आहे हे जाणून घ्या.

२. झोपताना पाय उंचावर ठेवा. श्वसनाचा त्रास असणाऱ्यांनी हा उपाय करू नये

३. बराच वेळ उभे रहाण्याचे किंवा बैठे काम असल्यास लागल्यास थोड्या-थोड्या वेळाने पायांची हालचाल करत राहा.

४. आहारातील मीठाचे, मसालेदार पदार्थांचे प्रमाण कमी करा.

५. काहीवेळ पाय मीठाच्या पाण्यात ठेवा.रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांनी हा उपाय डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नका

६.गरोदरपणात पायांवर येणारी सूज ही हानिकारक नसते. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon