Link copied!
Sign in / Sign up
24
Shares

मुंबईची पावभाजी तुम्ही खाल्ली असेलच… तेव्हा घरीही ह्या प्रकारे करा…

पावभाजी हा सर्वांचाच आवडीचा पदार्थ आहे. पावभाजी ही डीश महाराष्ट्मध्येच नाहीतर भारतात लोकप्रिय आहे. आणि ह्या यम्मी पावभाजीचा जन्म हा मुंबईमध्ये झाला आहे. हो खरंच आहे. पावभाजीची लज्जत आणि चव जिभेवर रेंगाळणारी असते. मग पावभाजी या पदार्थाचा उदय नेमका झाला तरी कुठे? उत्तर सोपे आहे,तर १८५० मध्ये मुंबईमधील कापड गिरणीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना जेवणासाठी खूप कमी वेळ मिळायचा तेव्हा त्यावर त्यांनी उपाय शोधला की, एखादी भाजी घ्यावी आणि त्यासोबत पाव बुडवून खायचे. आणि पाव हा आपला नाहीच, कारण आपले अन्नपदार्थ हे पौष्टिक प्रकारातले आहेत. तर पाव हा पोर्तुगीजांनी भारतात आणला आणि तो रुजवला. आज फास्ट फूड नावाच्या प्रकारात पाव असतोच. सुरुवातीला पावभाजी ह्याच प्रकारे खाल्ली जायची, मग त्यानंतर सर्वच कामगार ह्याप्रकारे खायला लागले. आणि हळूहळू मुंबईमधल्या कामगारांमध्ये पावभाजी खूपच फेमस झाली. आणि आजची पावभाजी वेगळीच आहे. आणखी ह्यात मुंबईची पावभाजी, पुण्याची पावभाजी, आणि बंगलोरची पावभाजी ह्यात खाण्याच्या कल्चरनुसार बदल आहेच. आणि भारताबाहेरही पावभाजी अमेरिकेत आणि इंग्लंड मध्ये तुम्हाला खायला मिळेल. आणि असेही मराठी माणसे जिथे जातात तिथे आपले खाणे घेऊन जातातच.

पावभाजी हा शब्द जरी उच्चारला, तरी तोंडाला पाणी सुटते. जणू जीभ त्या वितळलेल्या मस्क्यात तरंगत रहाते, मध्येच बारीक कांदा दाताखाली येतो आणि लिंबाचा आंबटपणा त्याचा स्वाद आणखीनच वाढवतो आणि सोबतीला पापड. अशा या पावभाजीची लज्जत आणि चव जिभेवर रेंगाळणारी असते.

महाराष्ट्रातील अनेक मोठ्या शहरांत आणि इतर शहरात सुद्धा रस्तयांवर पावभाजीच्या लोटगाड्या पाहायला मिळतात. आणि ह्या रस्तावरच्या गाड्यांची चव हॉटेलातही मिळत नाही म्हणून बरीच मंडळी ताटकळत उभे राहून पावभाजी खाण्याचा आनंद घेतात. हा प्रकार खावयास मिळतो तसेच त्याची लोकप्रियता आता संपूर्ण भारतभर पसरल्याने तो सर्वच मोठ्या शहरांत खानावळीत आणि उपहारगृहात पहावयास मिळतो. पावभाजी हा तसा अलिकडचा पदार्थ. पावभाजी हा पदार्थ मुखत्वे करून संध्याकाळीच खाल्ला जातो. आणि ह्यामध्येही सर्वच मोठ्या शहरात पावभाजी संध्याकाळीच खायला मिळते. विशेषतः बंगलोरमध्ये मी स्वतः खूप गर्दी करून लोक पावभाजी रोडच्या कडेला उभ्या असलेल्या गाड्यावर खाताना बघितले आहेच.

पावभाजीचे प्रकार

१) चीज पावभाजी

२) फ्राईड पावभाजी

३) पनीर पावभाजी

४) मशरूम पावभाजी

५) खडा पावभाजी

६) जैन पावभाजी ह्यात कांदा आणि लसूण टाकलेले नसते.

७) कोल्हापुरी पावभाजी ही खूप तिखट बनवलेली असते.

८) पांढरी पावभाजी ह्यामध्ये गरम मसाला आणि तिखट वापरलेले नसते.

पाव-भाजी मध्ये भाजी बनविण्यासाठी टमाटे, बटाटे,कांदा,लसूण आल्याची चटणी,तिखट,मसाले,तसेच ढोबळी मिरची,फूलकोबी,मटार ह्या भाज्या आवश्यक असतात. पाव भाजीचे त्याच्या प्रकारावरून इतर नामकरण करण्याची देखील प्रथा आहे जसे भाज्या कुस्करून न घालता मोठ्या फोडींच्या स्वरूपात केल्या तर त्यास खडा-पावभाजी (खड्याप्रमाणे मोठ्या आकाराचे भाजीचे तुकडे) असे म्हणतात. तसेच भाजीत लोणी अधिक प्रमाणात वापरल्यास त्यास बटर / लोणी / मस्का (हिंदीत) पावभाजी,तसेच चिझ-पावभाजी,ड्रायफ्रुट (सुकामेवा)पावभाजी इ.असे प्रकार करण्यात येतात.

यम्मी पावभाजी तयार करण्यासाठी ही पदार्थ लागतात

* बटाटे

* टमाटे

* कांदे

* फुल कोबी

* हिरवी ढोबळ मिरची

* पानकोबी

* लसूण

* हिरवे मटार

* आल्याचे वाटण

* मीठ

* तिखट आणि त्याचबरोबर

* लाल मिरची

* मीठ

* लोणी

* पनीर

* चीज

* पावभाजीचा तयार असलेला मसाला

* पावाची लादी

* फोडणी देण्यासाठी हिंग, मोहरी, हळद.

* कोथंबीर पण ताजी

* तेल

* आणि तुमचा चांगला फ्रेश मूड

पावभाजी बनविण्यासाठी लागणारे साहित्य

अर्धा किलो बटाटे अगोदर चांगली उकडून घ्या,

त्यानंतर अर्धा किलो कांदा सोलून घ्या

अर्धा किलो टमाटे घ्या आणि जर तुम्हाला टमाटे आवडत जास्त आवडत नसतील

१ चमचा आमचूर पावडर, २ चम्मच पावभाजीचा मसाला( बाजारात तुम्ही आयते पॅकेट घेऊ शकता)

पाव किलो फुलकोबी घ्या त्यानंतर त्या फुलकोबीला बारीक चिरून घ्या.

पाव किलो भोपळी मिरची बारीक चिरून घ्या

२५० ग्राम वाटाणे

अर्धी वाटी तेल घ्या तुम्हाला सोयाबीन किंवा शेंगदाणे घ्यायचे असेल तर घेऊ शकता

१ चम्मच लाल तिखट

मीठ आणि मोहरी व हळद

२५० ग्राम अमूल बटर

१२ ते १५ पावभाजी चे ब्रेड

पावभाजी कशी बनवायची

* सगळ्यात अगोदर बटाटे सोलून बारीक कुस्कुरुन घ्या आणि जमलेच तर खूपच बारीक असायला हवे. वाटल्यास किसणी असेल तर किसणीवर बटाटे किसून स्मॅश करा.

* टमाटे बारीक चिरून घ्या त्यासोबत लसूण आणि आले वाटून घ्या.

* आता पावभाजी बनवायला सुरुवात करा, कढई मध्ये अर्धी वाटी तेल घेऊन गरम करून घ्या

* तुम्ही जो अगोदर कांदा चिरलेला आहे त्यातून अर्धे कांदे घालून खमंग परतून घ्या, आणि कांदा परतल्यावर आलं, लसून, मसाला, तिखट, हळद, मोहरी आणि आमचूर पावडर घालून परतून घ्या.

* त्यामध्ये बारीक चिरलेला फ्लावर आणि भोपळी मिरची मध्ये वाटाणे टाकून परतून घ्या,

* फुलकोबी आणि वटाणे शिजल्यावर टमाटा घालून त्याला घोटवून घ्या ह्यामध्ये तुम्हाला एक करत येईल की, फुलकोबी आणि वाटाणे कुकूरमध्ये वाफवून घेतले तर कुरकुरीत होईल.

* आता ह्या मसाल्यात बटाटे घालून त्याला घोटावे आणि त्यात २ वाटी पाणी घालून मीठ टाकून उत्तम शिजवावे.

* आता पावाची लादी घेऊन, पावाला मधोमध कापून त्याला अमूल बटर लावून तव्यावर शेकून घ्या.

* त्यानंतर तळलेला पावाच्या बाजूला पावभाजीची गरम भाजी अमूल बटर घालून परतून घ्या.

 

पावभाजीच्या प्रकारात जैन पावभाजी, बिरजू पावभाजी आणि गोविंदाश्रम पावभाजी खूप लोकप्रिय आहे. आणि ज्यांना तिखट खायचे असेल त्यांच्यासाठी कोल्हापुरी पावभाजी आहेच. पावभाजीबरोबरच झटपट तयार होणारे परंतु पोटभरीचे असलेले पावभाजी सँडवीच, पुलाव, आलू चाट, मसाला पाव म्हणजे जिभेला सुंदर मेजवानीच होय. पावभाजी सँडवीच हा असाच एक वैशिष्टय़पूर्ण पदार्थ आहे. की, जो तव्यावर बटर टाकून त्यात पाव गरम केले जातात. आणि त्यानंतर त्याला पावात गरमागरम पावभाजी टाकून हे सँडविच तयार केले जाते. त्याचप्रमाणे मसाला पावची चवही मस्त लागते. 

हा ही पदार्थ तुम्ही करू शकता 

प्रथम तव्यामध्ये तेल गरम करून त्यात कांदा लाल होईपर्यंत परतला जातो. त्यानंतर त्यात जिरे, आलं, लसूण पेस्ट टाकून ते सगळं मिश्रण भाजून घेतलं जातं. त्यानंतर त्यात पावाचे बारीक केलेले तुकडे, श्री पावभाजी मसाला, गरम मसाला, मीठ व पाणी टाकून चांगले मिश्रण करून मसाला पाव तयार केला जातो. पावभाजी आणि सोबत तवा पुलाव किंवा जिरा राइस हे समीकरण म्हणजे अस्सल मेजवानीच. तव्यावर तेल गरम करून त्यात कांदा लाल होईपर्यंत फ्राय केला जातो. मग त्यात आलं, लसूण पेस्ट, श्री पुलाव मसाला, मटार टाकून ते मिश्रण २ ते ४ मिनिटे शिजवले जाते. त्यानंतर मिश्रणात बासमती भात टाकून संपूर्ण मिश्रण एकसंध करून पुलाव तयार केला जातो.

पावभाजीचे वैशिष्टय़ म्हणजे विविध प्रकारच्या पावभाजीबरोबरच तुम्ही आलू चाट हे तव्यामध्ये तेल गरम करून त्यात बारीक बटाटय़ाचे काप/तुकडे फ्राय करून नंतर त्यात मीठ, चाट, लिंबू आणि जिरं टाकून ते मिश्रण एकसंध करू शकतात.

* कांदा फ्रायसुद्धा मस्तच. तव्यावर तेल गरम करून त्यात जिरे, कांदा, थोडय़ा प्रमाणात टॉमेटो, सिमला मिरची टाकून त्या मिश्रणात श्री पावभाजी मसाला, अद्रक-लसूण पेस्ट आणि मीठ टाकून २ ते ४ सेकंद ते मिश्रण एकसंध करून तयार केला जातो.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon