पाऊसाच्या पाण्यात अशी घ्या केसांची काळजी....नाहीतर खूप केस गळून जातील
पाऊस आल्याचा पावसात चिंब भिजण्याचा आनंद प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो. पण काहीजण पावसाचा आनंदच घेत नाहीत कारण बऱ्याच लोकांना पावसाच्या पाण्यामुळे केस चिपचिप होतात, केस हे विचित्रच होऊन जातात, त्यामुळे बऱ्याच व्यक्तींना पाऊस म्हणजे केसांचे दुखणे होऊन जाते. तेव्हा ह्यावरती काही उपाय तुम्ही करू शकता. जेणेकरून पावसाचा आनंद तर घेता येईलच आणि केसांचे सौन्दर्य सुद्धा अबाधित राहील.
पावसाच्या सिजनमध्ये आठवड्यातून १ किंवा २ वेळा तेल लावले तरी चालते. आणि कंडिशनर हायड्रेटिंग शाम्पू ह्यांचा वापर करावा. ह्यामध्ये नॅचरल प्रोडक्टस चा वापर करा. केमिकल प्रॉडक्टस केसांना ड्राय करत नाहीत. तेव्हा नियमितपणे केसांना तेल लावत रहा. तेल लावण्याबाबत, बदामाचे तेल हे हायड्रेटिंग साठी उपयुक्त असते. आणि कोकोनट तेल हे केसांना अँटीबॅक्टरीयल देत असते. ह्यामूळे केसांचे तुटणे, कमजोर होणे कमी होऊन जाते. निम चे तेल केसांना थंड ठेवते आणि येणाऱ्या घामाला दूर ठेऊन खाज वैगरे सुटत नाही.

ज्या केसांची मुळे पहिल्यापासून कमजोर झाली असतील, त्यांना काही नुकसान पोहोचले असेल किंवा त्यांच्यावर काही ट्रीटमेंट चालू असेल त्या केसांसाठी सल्फेट फ्री शाम्पू वापरा. तुम्ही जर हेयर स्टायलिंग किंवा हेयर ड्रायर चा केसांवर वापर हा खूप हिट मुळे केसांच्या मुळांसाठी खूप धोकादायक असतो. त्यामुळे अति त्याचा वापर करू नका.
असे म्हटले जाते की, पावसाच्या पाण्यातून आणि वातावरणातून काही बॅक्टरीया आणि फंगस सारखे जीव केसांमध्ये अडकतात आणि त्यामुळे डोके खाजायला लागते. आणि केसही गळायला लागतात. टाळूवर वापरण्यासाठी एकच शाम्पू वापरा कारण ह्यातूनच खूप साऱ्या केसांच्या समस्या उद्भवत असतात. आणि टाळूला नेहमी कोरडे राहू द्या. आठवड्यातून त्याला शाम्पू ने धुवायचे. केसांच्या समस्या जास्त असतील तर एंटी-फ्रीज मास्क आणि एंटी-फ्रीज कंडीशनर चा वापर करा.

पावसाच्या पाण्याने केस ओले झाल्यावर केस धुवून घ्यायचे. आणि पावसात वाटल्यास तुम्ही केसांना बांधून ठेवू शकता. त्यामुळे बराच फरक पडून जातो.
त्याचप्रकारे पावसाचे पाणी हे शुद्ध पाण्याचा स्रोत असतो. पण पावसाचे पाणी आणि आपण केलेले प्रदूषण ह्यांचा संगम झाल्यामुळे ते पाणी केसांसाठी थोडेसे धोकादायक होते. पण जर तुम्ही जंगलात आणि शेतात व गावात पावसाचे कितीही पाणी केसांवर घ्या त्याचा परिणाम होत नाही.
