परफेक्ट मॅरेज जगात शक्यच नाही, असा तुमचा समज असेल तर तुम्ही चुकत आहात. तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये खूप भांडण होत असली, तरीही तुम्हीसुद्धा एक परफेक्ट कपल होऊ शकता. तुमच्यातील नातं टिकवण्यासाठी तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराने त्यासाठी काही गोष्टी समजून घेणं खूप आवश्यक आहे. तुम्ही दोघांनीही प्रौढासारखं वागणं खूप आवश्यक आहे. विशेषत: तुम्हा दोघांमध्ये जेव्हा कडाक्याची भांडणं होतात, त्यावेळी ते तसं वागणं अतिशय आवश्यक आहे.

कधीकधी प्रौढ व्यक्तीही लहान मुलांसारखी वागतात. जसं एखाद्या महिलेला साडी हवी असेल, तर काहीही करून ती साडी ती घेतेच. जरी तिच्याकडे 100 साड्या असतील आणि तरीही ती तुम्हाला साडीच्या दुकानात ओढत नेते. ते तुमच्यासाठी थोडंस त्रासदायक ठरू शकतं.
तुम्ही तिचे पती म्हणून तिला हसवणे, तिचे अश्रू पुसणे, तिला घट्ट मिठी मारणे आणि आयुष्यभर तिचा कणा बणणे खूप आवश्यक आहे. अन्यथा तुमच्यासाठी काही गोष्टी असं असह्य होऊ शकतात.
आम्ही पत्नींच्या अशाच काही त्रासदायक ठरू शकणाऱ्या गोष्टींची यादी देतोय. तुमच्या सोबतही त्या गोष्टी घडत असतील.
१) राक्षसासारखं आक्रमक बनणं

महिला नेहमी त्यांना न आवडणाऱ्या गोष्टींना खूप शांतपणे सामोरे जातात. सर्व काही ठिक होईल असं त्यांना वाटतं. पण तसं झालं नाही तर त्या अचानकपणे उसळतात. त्यांना राग अनावर होतो. तुम्ही त्यांना काय झालं हे विचारल्यास त्या काही झालं नसल्याचं सांगतात.
२) जेव्हा मत्सर वाढतो.
पती पत्नीवर जीवापाड प्रेम करत असतो, त्यामुळे पतीचे अवतीभोवती असलेल्या महिलांविषयी पत्नीला मत्सर वाटण्याचे काहीच कारण नाही. पण महिलांना मत्सर वाटतो. तसेच जेव्हा पतीकडे मॉलमध्ये कुणी बघत असेल, तरीही त्यांना मत्सर वाटू शकतो.
३) सतत व्यत्यय आणणे
महिलांना अनेक वेळा कोणत्याही संभाषणात आणि कामात व्यत्यय आणण्याची सवय असते. जर पती त्याच्या ऑफिसमध्ये काय झालं हे सांगत असेल, तर पत्नीला मध्ये इतर महिलांच्या साडीचा विषय़ही सुरू शकतो. त्याविषयावर बोलत त्या पतीच्या बोलण्यात व्यत्यत आणू शकतात. महिलांची ही गोष्टी पतीसाठी खूप त्रासदायक ठरते. एक बदल म्हणून पतीच्या गोष्टी ऐकून घेण्यास काय हरकत आहे.
४) पतीवर नियंत्रण

काही महिलांना वैयक्तिक ओळख ही गोष्टच माहिती नसते. जर पतीने त्याच्या मित्रांसोबत बाहेर जाण्याचं प्लॅनिंग करत असेल आणि त्यात पत्नीला सहभागी करून घेतलं नाही, तर ती गोष्ट त्यांना महिलांना खूप त्रासदायक ठरते. नंतर त्या गोष्टीवरून त्या पतीला भांडावून सोडतात. जर तो ती गोष्ट स्पष्ट करून सांगत असेल, तरी त्याला पुन्हा त्रासदायक ठरेल असं वागतात. पत्नीचा हा स्वभाव तुमच्या पतीसाठी खूप त्रासदायक ठरू शकतो. ज्यामुळे पुन्हा तो त्याच्या मित्रांसोबत आनंदही साजरा करू शकत नाही. कधीही तुमच्या जोडीदाराला बंदिस्त करून ठेवू नका. त्यामुळे तुमच्या नात्यातील आनंद कमी होऊन ते नात कडवट बनू शकतं.
५) तुला माहीत असायला हवं

पुरूष हे समोरच्याच्या मनात काय चाललंय हे समजू शकत नाहीत. त्यांच्याकडे तशी मानसिक शक्ती नसते. त्यामुळे तुमच्या मनात काय चाललंय हे ओळखू शकत नाहीत. त्यामुळे ती गोष्ट सोडून देणंच उत्तम. तुमच्या सोप्या संकेतांचा अर्थही पुरूष समजू शकत नाहीत. त्यामुळे तुम्हा काय हवं हे तुम्ही त्यांना थेट सांगायला हवं. त्यामुळे तुमची निराशा होणार नाही. आणि तुमची मेहनतही वाचेल.
