Link copied!
Sign in / Sign up
43
Shares

पत्नी गर्भवती असताना पतीने या गोष्टी जाणून घेणे आवश्यक असते.

 बाळाचे आगमन हे प्रत्येक पालकाच्या आयुष्यात नवीन चैतन्य आणि झळाळी घेऊन येते. ते पती आणि पत्नीच्या नात्याची पूर्तता करते आणि एका अनोख्या पर्वाची सुरुवात करते. पत्नीची भूमिका आईमध्ये रुपांतरीत होते आणि हे कोणत्याही पत्नीसाठी अतिशय मौल्यवान गोष्ट असते. फक्त हेच नव्हे; तर पतीही एका पित्यामध्ये रूपांतरित होतो आणि हेही त्याच्यासाठी तितकेच महत्त्वाचे असते.
ज्याप्रकारे आई बाळाच्या अस्तित्वाची जाणीव अनुभवण्याची आतुरतेने वाट पाहत असते; त्याचप्रमाणे एक पितादेखील बाळाला आपल्या कुशीमध्ये घेण्यासाठी आतुर असतो. पण हा प्रवास सोपा नसतो; कारण पती आणि पत्नी दोघांनी खूप संयम आणि सतर्कता ठेवणे गरजेचे असते. कारण या टप्प्यात एका स्त्रीच्या आयुष्यात खूप बदल घडून येतात. यावेळी पतींनी पत्नींना पूर्ण आधार देणे गरजेचे असते; कारण अशावेळी पत्नीला पतीची सर्वाधिक गरज असते.
विशेषतः ज्या महिला प्रथमच माता बनणार आहेत; त्यांना शारीरिक बदलांशी जुळवून घेणे थोडे अवघड ठरु शकते. पण कधीकधी त्यांना त्यांच्या शरीरात काय काय बदल घडत आहेत; हेच कळत नाही. यामुळे त्यांना छोट्या-छोट्या गोष्टीही भयभीत करतात आणि त्या लगेचच चिंताग्रस्त होतात.
ही अशी वेळ असते; जेव्हा प्रत्येक पत्नीला आपल्या पतीची सर्वाधिक गरज असते. म्हणून या टप्प्यात तुमच्या पत्नीसह मार्गक्रमण करण्यास तयार राहा.

प्रत्येक पतीने ध्यानात घ्याव्यात अशा काही गोष्टी पुढीलप्रमाणे:

१) आराम सर्वाधिक महत्त्वाचा असतो

जेव्हा एक स्त्री माता बनते, तेव्हा तिच्या शरीरात भरपूर बदल घडत असतात; ज्यामुळे तिला घरगुती कामे करणेदेखील जिकिरीचे बनते. म्हणूनच तिला काही सांगण्यापेक्षा तुम्ही तिचे दैनंदिन वेळापत्रक आरामदायी बनवू शकता आणि काही तडजोडी करू शकता. कधीकधी गर्भार काळात स्त्रिया तणावग्रस्त बनतात; म्हणून एक उत्तम पती म्हणून तुमची जबाबदारी असते की तुमची पत्नी खुश राहावी आणि तिच्यावर कोणताही भार पडू नये.

२) मिळून काम करणे सर्वोत्तम असते

शक्य असेल तेव्हा तुमच्या पत्नीला मदत करा. गर्भारकाळाचे सुरुवातीचे दिवस अतिशय धोक्याचे असतात; कारण यावेळी गर्भपाताची शक्यता भरपूर असते. म्हणून यावेळी तुमच्या पत्नीने कोणतीही जड वस्तू उचलू नये याची खबरदारी घ्या. तिच्या छोट्या-छोट्या जबाबदाऱ्या तुम्ही पूर्ण करून तिला विश्वास द्या की, ती एकटी नाही आणि तुम्ही तिच्या जबाबदार्‍या पुऱ्या करण्यास पूर्णपणे सक्षम आहात!

३) मूड स्विंग्ज ना समजून घ्या

गर्भार काळात फक्त शारीरिकच नव्हे; तर मानसिक बदलही घडत असतात. अचानकपणे एका नवीन जबाबदारीची जाणीव होते आणि ती तुमच्या पत्नीला तणावग्रस्त बनवू शकते. याचा परिणाम मूड स्विंग्ज मध्ये होतो, जी एक सामान्य गोष्ट आहे. तुमची पत्नी खळखळून हसत असताना, अचानक तिला राग आणि संताप येणे तुमच्या नजरेत येऊ शकते. हे थोडे त्रासदायक ठरू शकते; पण संयमाने आणि योग्यपणे समजून घेतले तर मूड स्विंग्ज ना हाताळता येऊ शकते.

४. आहाराची विशेष काळजी घ्या

गर्भारपणातील आहाराचा बाळ आणि आई वर विशेष प्रभाव पडतो. या काळात आईच्या आवडीनिवडीत भरपूर बदल घडतो. अचानकपणे तिला काहीतरी आंबट वा आइसक्रीम सारखे काहीतरी गोड खायची इच्छा होऊ लागते!
म्हणूनच त्यांच्या आहारविषयक गरजांची तुम्ही विशेष काळजी घेतली पाहिजे; कारण ती आरोग्यदायी तसेच चविष्ट आहारही घेऊ शकतेच.

५. तिला तणावापासून दूर आणि आनंदी ठेवा

गर्भारकाळात स्त्रीमध्ये भरपूर शारीरिक आणि मानसिक बदल घडत असतात. म्हणूनच तिच्यासमोर कोणतेही तणावपूर्ण विषय काढू नका. तसेच तुम्ही बाकी परिवाराला देखील समजावा की, त्यांनी कोणतीही तणावपूर्ण परिस्थिती समोर आणता कामा नये. जास्तीत जास्त सकारात्मक वातावरण बनवा आणि शक्य असेल तर तिला घराबाहेर न्या, एखादा चित्रपट दाखवा किंवा तिच्या एखाद्या आवडत्या जागी तिला घेऊन चला.

६. पत्नीवर प्रेमाचा वर्षाव करा आणि तिचे कौतुक करा

गर्भार काळात स्त्रीचे शरीर अंतर्गतच नव्हे; तर बाहेरूनही बदलत असते. त्यांना असे वाटू लागते की, त्या जाड होत आहेत आणि छान दिसत नाहीयेत. म्हणून तुमच्या पत्नीला अधिक प्रेम द्या, तिचे लाड पुरवा आणि तिचे कौतुक करा. त्यांचे गैरसमज हटवा, त्या पहिल्याइतक्याच सुंदर आहेत आणि तुम्ही त्यांच्यावर तितकेच प्रेम करता; याची त्यांना जाणीव करून द्या.

७. नियमित चेक-अप

या सर्वांबरोबरच हे लक्षात ठेवा की, तुमच्या पत्नीला डॉक्टरकडेही जायचे असते. तिच्या नियमित तपासणीसाठी तुम्हीदेखील तिच्याबरोबर गेले पाहिजे; विशेषतः जेव्हा तिला इंजेक्शन घ्यायचे असते तेव्हा! कोणते औषध केव्हा घ्यायचे, हे ध्यानात ठेवा आणि जर तुमच्या पत्नीला कशाचीतरी ऍलर्जी असेल तर तेदेखील लक्षात ठेवा.

८. चालणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे

गर्भारकाळात थोडासा व्यायाम हा आवश्यकच असतो; म्हणूनच तुमच्या पत्नीला पहाटे फिरायला नेत जा. कधीकधी स्त्रीला मोकळ्या हवेत बावचळल्यासारखे वाटू शकते; म्हणून ती बाहेर पडायचे टाळते. अशावेळी तिला प्रोत्साहन द्या आणि बाहेर न्या. तुम्ही तिच्यासोबत आहात, याचा तिला विश्वास द्या आणि तिच्याशी विविध गोष्टींवर गप्पा मारा.


या सर्वांबरोबरच अशा भरपूर गोष्टी जशा की- तिच्या समस्या समजून घेणे, पुढचे नियोजन करणे, घरची सजावट करणे, शॉपिंगला जाणे आणि ती बोलत असताना लक्ष देणे- यांचेही भान ठेवा. तुम्ही ही जबाबदारी तिच्याबरोबर निभवण्यासाठी आणि एक आनंदी कुटुंब निर्माण करण्यासाठी पूर्ण तयार आहात याची तिला जाणीव करून द्या!
तुम्हाला पालकत्वाच्या शुभेच्छा!

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon