Link copied!
Sign in / Sign up
38
Shares

हे ७ प्रश्न बायकोने तुम्हाला विचारले असतीलच......नाही तर बघून घ्या..

              लग्न ३ वर्षांपूर्वी झालेले असो वा तीस वर्षांपूर्वी काही प्रश्न नेहमीच विचारावेसे वाटतात. यातील काही प्रश्नांची उत्तरे मिळाली तर हायसे वाटते आणि काही प्रश्न अनुत्तरित जरी असली तर चांगलेच असते. काही काही प्रश्न एखाद्या टाईम बॉम्ब सारखे असतात जे तुमच्या नवऱ्याला सतत धडकी भरवत असतात. पण ही प्रश्न खूप सामान्य आहेत त्यांची उत्तरे द्यायला नवऱ्याला आवडेल आणि तुम्हालाही नवऱ्याविषयी व त्याच्या विचाराविषयी नवीन माहिती मिळेल.

 

    १] तुझा देवावर विश्वास आहे का?

आपल्या देशात संस्कृतीची जपणूक करण्याला प्राधान्य दिले जाते. सण आणि देवता यांची संख्या अधिक असल्याने हा विषय टाळता येण्यासारखा नाही. ''तुमच्या इतकाच त्याचा ही देवावर विश्वास आहे का,''रोज पूजा करणे त्याला आवडते का, ''तुमच्या पेक्षा जास्त वेळ तो देवाच्या सहवासात घालवतो का,"तो कुणाला प्राथमिकता देतो, तुम्हाला कि देवाला, "तुमच्या साठी तो देवावरील विश्वास सोडू शकतो का, यांसारखे अनेक प्रश्न तुम्हाला छळत असतात आणि तुम्हाला अगदी काळजीने घेरून टाकतात. अशा प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तुमच्या नवऱ्यावर दबाव टाकू नका. शेवटी, त्याच्या श्रद्धा त्याच्या आहेत आणि त्यांचा स्विकार करून आदर करा.

 

 

२] माझ्यातील तुला सर्वात जास्त भावणारी गोष्ट कोणती?

स्वतःची प्रशंसा प्रत्येकाला आवडत असते. तुमचा पोशाख त्याला आवडत असेल,तुमची नवी केशरचना त्याला आवडली असेल,तुमची नखे खूपच सुंदर आहेत असे तो म्हणत असेल किंवा तुम्ही लावलेला परफुम्य त्याला आवडत असेल,पण तुमच्यातील कोणती गोष्ट त्याला सर्वात जास्त भावते?तुम्ही बुद्धिमत्ता त्याला भावते का,तुमचा खट्याळ विनोद त्याला आवडतो का,तुमची चाल त्याला आवडते?तुमच्यातील ती कोणती एक गोष्ट त्याला खुलवते?असे अनेक प्रसन्न तुमच्या मनात येत असतात आणि या प्रश्नांची उत्तरे देणे तुमच्या पतीसाठी अवघड असते कारण आपली उत्तरे पत्नीला नाराज करू शकतात अशी भीती त्याला सतत वाटत असते.

 

३] मी जाड आहे असे तुला वाटते का?

एखाद्या बॉम्बपेक्षा हि हा प्रश्न त्याच्यासाठी भयंकर असतो. सर्वच पुरुषांना या प्रश्नाची भीती वाटते. पण तुमच्या नवऱ्याला जे काही खरे वाटत असेल ते त्याने प्रामाणिकपणे व्यक्त केले ते महत्वाचे आहे. असे प्रश्न विचारतांना आपण अवघडून जातो तर मग विचार करा तुमच्या पतीला कसे वाटत असेल!

४] तुला माझा अभिमान वाटतो का?

नक्कीच,त्याला तुमचा अभिमान वाटत असतो आणि हे तुम्हालाही चांगलेच माहित असते पण कधीतरी हेच त्याच्या तोंडून ऐकायला छान वाटते.जेव्हा तुम्ही अगदी दिमाखात किंमतीची घासाघीस करता किंवा जेवणात अगदी योग्य प्रमाणात मीठ टाकता किंवा जेव्हा तुमचा विश्वास ज्या गोष्टीवर असतो त्यावर तुम्ही ठाम असता तेव्हा "मला तुझा अभिमान वाटतो" हे शब्द तुमच्या मनाला समाधान देऊन जातात. तुमच्या पतीसाठी या प्रश्नाचे उत्तर देणे सहज ठरू शकते किंवा अवघड पण लक्षात घ्या त्यांच्यावर अनावश्यक दबाव टाकू नका.

 

५] तुमच्या नात्याला कमकुवत करणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत?

पतीला खिजवणे आणि त्याच्या सहनशक्तीला काही प्रमाणात ताणणे यांत तुम्हाला खूप मजा येते पण यातील सीमारेषा ओलांडू नका ज्यामुळे तुमचे पती तुमच्यावर रागावतील.जेव्हा तुम्ही दोघे खेळकर मूडमध्ये असाल तेव्हाच असे प्रश्न विचारा आणि लक्षात ठेवा ,याचा अतिरेक होणार नाही. तसेच तुमच्या दोघांचे नाते कसे आहे यावरही बरेच काही अवलंबून असते.

 

६] माझ्यापेक्षा सूंदर दुसरे कोण आहे असे तुला वाटते का?

हा प्रश्न म्हणजे त्याला खूप वाईटरित्या कात्रीत पकडणे. हा प्रश्न प्रत्येक पत्नीच्या मनात येत असतो. या प्रश्नाचे उत्तर माहित नसते तोपर्यंत तुम्ही निश्चितं असता पण याचे उत्तर कदाचित तुम्हाला अस्वस्थ करू शकते. तुमचा तुमच्या पतीवर विश्वास असला तरीही असे प्रश्न मनात येण्यापासून तुम्ही स्वतःला रोखू शकत नाही.

 

७] माझ्याशी लग्न केल्यानंतर तुला सर्वांत जास्त आनंद देणारी गोष्ट कोणती?

तुम्हाला तुमच्या पतीला हा प्रश्न विचारावा वाटत असेल तर नक्की विचारा कारण याचे मिळणारे उत्तर तुम्हाला आनंदित करेल.वैवाहिक नाते प्रत्येकासाठी महत्वाचे असते आणि पतीला आनंद देणारी गोष्ट कोणती हे जाणून घेण्याने तुमचे नाते मजबूत होते.

 

महिलांनो, सर्व गोष्टींची माहिती करून घ्या! या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला जाणून घ्यावीशी वाटत असतील तर नक्की हे प्रश्न तुमच्या पतीला विचारा पण तुम्हाला हे सर्व तुमच्या मनातच ठेवून पतीच्या छोटया -छोट्या कृतींतून आणि हावभावातून सर्व काही जाणून घ्यावेसे वाटत असेल तर तो ही पर्याय चांगला (आणि खरे तर सर्वांत छान) आहे!! 

     शब्दांकन - माधवी रावते 

 

 

 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon