Link copied!
Sign in / Sign up
77
Shares

पती-पत्नीच्या नात्यातील आनंदसाठी झोपायला जाण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा.

कोणाला आपल्या जोडीदारबरोबर आनंदी आणि कोणत्याही प्रकारचे भांडण वाद नसलेले नाते नको असते ? आपण आपल्या जोडीदारशी आपलं नातं कसं चांगलं राहील आणि जसं -जसे वर्ष जातील ते कसे बहरत जाईल याचा प्रयन्त करत असतो. परंतु असं करत असताना आपण मोठ्या-मोठया गोष्टीवर भर देतो. आणि काही छोट्या-छोट्या गोष्टी तश्याच मागे राहतात. आणि याच छोट्या-छोट्या गोष्टी नात्यांमधील अंतर वाढवतात. म्हणून काही जोडपी आपले जोडीदाराशी असलेले नाते घट्ट होण्यासाठी आणि अजून बहरण्यासाठी काही गोष्टी दिवस संपण्यापूर्वी रात्री झोपण्यापूर्वी करतात. या गोष्टीं तुम्हांला देखील तुमच्या जोडीदाराशी असलेलं नाते घट्ट होण्यास मार्गदर्शक ठरतील

१.ऑफिसचे काम करणे /कामाची चिंता टाळा

हल्ली कामाच्या व्यापात काही जोडप्याना आपल्या जोडीदाराशी बोलायाला वेळ मिळत नाही दिवसभर कामाच्या आणि जेव्हा ते घरी परततात त्यावेळी ते जेवतात आणि झोपतात. त्या दरम्यान ऑफिसचे फोन लॅपटॉप आणि मेसेज चालूच असते. म्हणून झोपायला जाण्यापूर्वी ऑफिसचे काम करणे,त्याबाबत चिंता करणे टाळा. दिवस संपण्यापूर्वी ऑफिसचं कामकिंवा इतर कामाच्या चिंता करणे टाळा. आपल्या जोडीदारासोबत असाल तर फक्त त्यांच्याबरोबर रहा. आपल्या सर्व चिंता आणि तणाव विसरून जा.

२. भांडणं टाळा.

आणखी एक चूक बहुतांश जोडपी करतात दिवसाच्या शेवटी झोपायला जाताना आपल्या जोडीदारशी भांडतात. यामुळे त्यांना झोपायला जाताना दोघे नाखूष होतात. आणि सतत भांडण आणि एकमेकांच्या चुकांबाबतच विचार डोक्यात चालू राहतात. आणि याचा परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे एक झोपायला जाण्यापूर्वी भांडणे टाळा.

३. मनापासून गप्पा मारा.

रोमँटिक व्हा. जोडीदाराशी मनापासून गप्पा मारा दिवसभरातील गोष्टी एकमेकांना सांगा. दोघांच्या आयुष्यात काय गोष्टी चालू आहेत याची माहिती एकमेकांना वेळोवेळी होत राहील. मनापासून मनाने एकमेकांच्या जवळ येण्याचा प्रयन्त करा.

४. एकाच वेळी झोपा.

 झोपायची एक वेळ ठरावा . एक झोपायला जात आहे आणि एक काम करत आहे, किंवा फोन मध्ये गुंतला आहे. असे न करता एकावेळी झोपायला जा. किंवा कोणतंही गोष्ट करत असाल तर ती बरोबर करा. जसे एखादा सिनेमा पाहत असाल तर दोघांनी मिळून बघा.

५. मुलांची जबाबदारी

जर तुम्ही पालक असाल तर मुलांची जबाबदारी वाटून घ्या. ज्यामुळे दोघांचा ताण कमी होईल. एकावरच ताण पडून एकच व्यक्ती दमणार नाही. तसेच रात्री झोपवण्याची जबाबदारी देखील वाटून घ्या. एक जर मुलाला झोपवत असेल तर दुसऱ्याने बाकी कामे करावी. यामुळे कमी लवकर होऊन एकमेकांना वेळ देता येईल. 

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon