Link copied!
Sign in / Sign up
2
Shares

नात्यांमध्ये समस्या निर्माण होऊ नये म्हणून जोडीदाराशी चांगल्या रीतीने संवाद कसा साधाल

 

कोणत्याही यशस्वी नात्यासाठी सुसंवाद ही एक गुरुकिल्ली असते. जोडप्यांमधील बहुतेक गैरसमज हे एकमेकांशी न बोलल्याने आणि आपल्या भावना व्यक्त न करण्याने निर्माण होतात. कधीकधी तुम्हाला बोलण्यासाठी योग्य शब्दच सुचत नाहीत, तर कधीकधी जे बोलायचे ते शब्द ओठांतून फुटत नाहीत. म्हणून इथे आम्ही तुमच्या पती/पत्नीशी प्रभावीपणे संवाद कसा साधावा, याचे मार्ग देत आहोत

१. ऐकून घ्या.

तुमच्या जोडीदाराशी संवाद साधण्यासाठी पहिला मार्ग ऐकून घेण्याबाबत असलेला पाहून तुम्हाला विचित्र वाटेल! पण याचे एक कारण आहे. जेव्हा तुमचा पती बोलत असेल, तेव्हा त्याचा प्रत्येक शब्द ध्यानपूर्वक ऐका. ते जरी क्षुल्लक बोलणे असले, तरी ते नेहमी ऐकून घ्या. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या पतीशी बोलणार असाल; तेव्हा त्यानेही तुमचे ऐकून घ्यावे, असे तुम्हाला वाटणार नाही का?

२. 'त्या' आवाजात कधी बोलू नका!

हो, संसार करताना भांडणे होणे अपरिहार्य असते; आणि जर तुमच्या जोडीदाराने तुम्हाला निराश केले असेल वा तुमच्या भावना दुखावल्या असतील, तर तसे त्यांना स्पष्ट सांगणे योग्यच आहे. पण आरोपात्मक भाषेत कधी बोलू नका. 'तू' च्या जागी 'मी' आणि 'आपण' वापरा उदा.- 'तुला माझी काही कदरच नाहीय' म्हणण्याऐवजी असे म्हणा: 'मला माझी कदर झाल्यासारखे वाटतच नाहीय.' वरीलपैकी दुसरी पद्धत जास्त चांगली आहे; नाही का?

३. मांगो तो मिलेगा!

प्रत्येक वेळी तुमच्या पतीनेच तुमच्याशी संवाद सुरु केला पाहिजे, अशी अपेक्षा ठेवू नका. जर तुम्हाला बोलायचे किंवा काही विचारायचे असेल, तर तसे लगेच सांगा. जर तुमचा पती मनकवडा असेल; तरच त्याला कळेल की तुमच्या मनात काय चालले आहे! आणि हो, तुम्ही काही सूक्ष्म इशारे वा संकेत देत असाल. पण सखींनो पुरुषांना लगेचच त्याचा पत्ता लागत नाही. तुम्ही त्यांच्याकडे जाऊन स्पष्टपणे बोलणे हेच जास्त चांगले राहील.

४. हलक्याफुलक्या गोष्टींवर बोलणे सर्वोत्तम असते

संवाद नेहमी तुमच्या भविष्याबद्दल वा काही गंभीर गोष्टींबद्दल असावा, असे जरुरी नाही. तुम्ही दोघे एखादा चित्रपट वा टीव्ही कार्यक्रम पाहत असाल आणि तुम्ही एकदुसऱ्याचा दिवस कसा गेला किंवा बालपणीच्या तुमच्या आठवणी यांवर बोलू शकता. अशा साध्यासुध्या संवादांचा तुमच्या नात्यांवर तुम्हाला वाटते त्यापेक्षा भरपूर प्रभाव पडत असतो.

५. कधी थांबायचे हे जाणा

सुसंवाद हे नेहमीच तुम्ही तुमच्या जोडीदाराशी किती बोलता याच्याने ठरत नाही; तर तुम्ही त्यांना बोलायला किती मोकळीक देता यानेही ठरतो. जर कधी तुमचा पती निराश असेल किंवा त्याला काहीही बोलायची इच्छा नसेल, तर त्याला तशी मोकळीक द्या. त्याला अस्वस्थ करणे हे गोष्टी अजून बिघडवू शकते.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

Recently, we launched a baby-safe, natural and toxin-free floor cleaner. Recommended by moms and doctors all over India, this floor-cleaner liquid gets rid of germs and stains without adding harmful toxins to the floor. Click here to buy it and let us know if you liked it.

Stay tuned for our future product launches - we plan to launch a range of homecare products that will keep your little explorer healthy, safe and happy!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon