Link copied!
Sign in / Sign up
14
Shares

पाठदुखी टाळण्यासाठी झोपण्याबाबतच्या काही टिप्स!

शरीराची योग्य ठेवण ही उभे असताना वा कामाच्या ठिकाणी बसतानाच महत्त्वाची असते, असे तुम्हाला वाटत असे;ल तर आणखी एकदा विचार करा! चुकीच्या अवस्थेत झोपण्याने तुम्हाला पाठदुखीचा विकार होऊ शकतो, जो दररोज तुमचा पिच्छा पुरवत राहील. तुमच्या सुदैवाने जर आतापर्यंत तुम्हाला कोणती समस्या जाणवत नसेल; तर तुमची झोपण्याची अवस्था योग्यच म्हणायला हवी. पण जर तुम्हाला अधूनमधून पाठीच्या कण्याचा वा पाठदुखीचा त्रास जाणवत असेल, तर निजताना कोणती शारीरिक अवस्था तुमच्यासाठी योग्य आहे; हे जाणून घेण्यात काही वावगे नाही.

१.  फेटल पोझिशन आणि पोटावर झोपण्याची अवस्था टाळा

'फेटल पोझिशन' आणि पोटावर झोपणे या दोन्ही अवस्थांमुळे सांधेदुखी व पाठदुखी होऊ शकते. कारण तुमच्या पाठीचा कणा हा तटस्थ नसतो; यामुळे पाठीचा कणा, स्नायू, नितंब आणि सांध्यांवर अतिरिक्त तणाव पडतो.

२. जर तुम्ही पाठीवर झोपू शकत नसाल; तर एका कुशीवर झोपा

पाठदुखी टाळण्यासाठी झोपण्याबाबतच्या काही टिप्स!जर तुम्हाला पाठीवर सरळ झोपता येत नसेल; तर तुमच्या एका बाजूवर झोपणेच उत्तम राहते. दुर्दैवाने अवघे १५ % लोकच अशाप्रकारे झोपतात! या पद्धतीतही तुमच्या पाठीचा कणा लांबलेला राहतो आणि धड व पाय बहुतांशी सरळ राहतात. म्हणजेच तुम्ही पाठीचा कणा सरळ ठेवता; म्हणून त्यावर किमान दाब पडतो आणि मान किंवा पाठदुखीची शक्यता कमी राहते.

३. मध्यम जाडी असलेली गादी घ्या

जर तुम्ही झोपण्याची योग्य अवस्था ठरवली, तरी आधार पुरवत नसलेल्या अयोग्य अशा गादीवर तुम्ही झोपत असाल; तर तुम्हाला पाठदुखी होणे अटळ असते.

४.  योग्य अशी उशी वापरा

उशीही पाठदुखी रोखण्यामध्ये खरोखर निर्णायक ठरू शकते. बहुतांशी लोकांसाठी झोपेची वेगळी अवस्था अवलंबणे हे आचरणात आणणे कठीण असते. शेवटी ज्या अवस्थेत ते झोपतात; ती अवस्था अनेक वर्षांपासून पक्की बनलेली असते आणि कोणत्याही सवयीप्रमाणेच ती बदलण्यास अवघड असते. उदा. जर तुम्ही अनेक दशकांपासून पोटावर झोपत असाल; तर रातोरात पाठीवर झोपण्यास चालू करणे कठीण असते आणि येथेच तुमच्या पाठीवरचा ताण कमी करण्यामध्ये उशी कामाला येते. जर तुम्हाला पाठीवर झोपण्यास आवडत असेल; तर तुमच्या पोटाच्या थोडे खाली मागे उशी ठेवून झोपणे हे तुमचा पाठीचा कणा सरळ ठेवू शकते. जर तुम्ही एका कुशीवर झोपत असाल आणि पाठीवरचा ताण कमी करण्याची गरज असेल; तर गुडघ्यांमध्ये एक उशी ठेवणे तुमची समस्या सोडवते. पाठीवर झोपणारेसुद्धा त्यांच्या गुडघ्यांच्या खाली उशी ठेवून पाठीचा कण्याला आधार देऊ शकतात.

५. गादीवरून उठताना नीट उठा 

झोपणे आणि अवस्थेबाबत आपण नेहमी एक गोष्ट विसरतो; ती म्हणजे- आपण बेडवरून कसे उठतो! तुम्ही झोपेतून कसे उठून बसता आणि कसे उभे राहता यावरून जर तुम्ही सतर्क नसाल; तर तुमच्या पाठीवर ताण पडू शकतो. याबाबत येथे काही सूचना आहेत:

तुमच्या हालचालींबाबत हळुवार आणि काळजीपूर्वक राहा. कोणतीही जलद किंवा अचानक हालचाल टाळा.

एका कुशीवर वळा आणि हळुवारपणे तुमचे पाय खाली घ्या आणि तुमच्या हाताच्या आधारांनी उठा.

जेव्हा तुम्ही बेडवरून उठता, तेव्हा लगेच पुढे वाकू नका; कारण त्यामुळे पाठीला दुखापत होऊ शकते.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon