Link copied!
Sign in / Sign up
49
Shares

पाठदुखीचं कारणे आणि पाठदुखी होऊ नये या करता टिप्स


 सध्याची धावपळीची जीवनशैली, वाढता प्रवास, सतत एकाच ठिकाणी बसून कामे करणे अश्या अनेक कारणांमुळे पाठदुखीचे प्रमाण वाढत आहे. ही पाठदुखी कोणत्या कारणांमुळे होते आणि ती टाळण्यासाठी काय उपाय करावे हे आपण पाहणार आहोत.

पाठदुखीची कारणे
१. बराच वेळचे बैठे काम आणि बसायची पद्धत

ऑफिसमध्ये खुर्चीत तासन्तास एकाच स्थितीत बसण्याची सवय अधिक कारणीभूत ठरते. तसेच खूर्चीत बसताना शरीराचे वजन पाठीवर येते. कंबरेत वाकून बसण्याची सवय असल्यास किंवा खुर्ची योग्य नसल्यास पाठ दुखण्याची शक्यता जास्त असते.

२. प्रवास

रोज लांबचा प्रवास करणाऱ्या किंवा सतत प्रवास करणाऱ्या पाठदुखीचा समस्येला कधीतरी सामोरे जावेच लागते. त्यात देखील विशेषतः दुचाकीने प्रवास करणाऱ्यांना पाठदुखीचा प्रवास होण्याची शक्यता जास्त असते.

३. चुकीच्या पद्धतीने झोपणे

उंच-सखल पृष्ठभागावर झोपणे किंवा दोन गद्यामध्ये अंतर असलेल्या भागात झोपणे किंवा आखडलेल्या स्थितीत झोपल्याने पाठीचे दुखणे उदभवू शकते.

४. वयोमानामुळे आणि स्त्रियांना होणारी पाठदुखी

वाढत्या वयोमानानुसार अनेक जणांना हाडे ठिसूळ झाल्यामुले पाठदुखीला सामोरे जावे लागते त्रासाला सामोरे तसेच स्त्रियांमध्ये देखील गर्भारपणामध्ये आणि प्रसूतीनंतर पाठदुखीचा त्रास सुरु होतो. तसेच उतार वयात स्त्रियांना पाठदुखी जास्त होते.

५. मानसिक ताणाचा पाठीवर येणार ताण

मनावरील ताण-तणावमुळे पाठीवर ताण येऊन पाठदुखी होऊ शकते.

इतर कारणे

संधिवात, सांधेदुखी, मणक्यांमध्ये गाठ आल्यास, मूतखडे यामुळेही पाठदुखी होऊ शकते. ओटीपोटात सूज आल्याने स्त्रियांना पाठदुखी होते.यामुळे होणाऱ्या पाठदुखीसाठी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक असतो.

पाठदुखी होऊ नये म्हणून हे करा.

१. एकाच स्थितीत बराच वेळ बसू नका. नियमित वेळाने बसण्याची स्थिती बदला, पाठ खुर्चीला पूर्ण टेकेल अश्या स्थितीत बसा मध्ये गॅप ठेऊ नका. असुन-मधून उठून चक्कर मारून या.

२. प्रवासाचा वेळ कमी करण्याच्या प्रयत्न करा.

३. पाठीचे व्यायाम करा.

४. उंच टाचांच्या चपला घालणे टाळा.

५. वस्तू उचलताना आळशीपणा न करता गुडघ्यात वाका, पाठ सरळ ठेवा व वस्तू शरीराजवळून उचला.

६. टेबलावर कोपर ९० अंशांमध्ये टेकतील, अशा प्रकारे खुर्चीची उंची ठेवा.

 

७. झोपताना पाठीला आधार मिळेल अशा टणक सपाट पृष्ठभागावर झोपा. उंच-सखल आणि अति गुबगुबीत पृष्ठभागावर झोपणे शक्यतो टाळा.

८. कामाचा आणि इतर गोष्टींचा ताण-तणाव कमी करण्याचा प्रयन्त करा. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon