Link copied!
Sign in / Sign up
2
Shares

असा करा पास्ता विथ टोमॅटो सॉस

टोमॅटो सॉस साठीचे साहित्य 

१. ५-६ माध्यम आकाराचे पिकलेले टोमॅटो 

२. एक मोठा चिरलेले कांदा 

३. लसूण ८ पाकळया 

४. एक चमचा काळी मिरी पावडर 

५. पास्तासाठी लागणारे मिक्स हर्ब्स 

६. लाला मिरची पूड 

७. टोमॅटो सॉस 

८. बटर ३ चमचे 

पास्तासाठी लागणारे साहित्य 

१. २५०-३००ग्राम पास्ता 

२. चिरलेले गाजर पाव कप 

३. चिरलेला ब्रोकोली पाव कप 

४. पाव कप बेबी कॉर्न किंवा कॉर्नचे दाणे 

५. बटर २ चमचे 

६. पाव कप किसलेले चीज 

टोमॅटो सॉस कृती 

१. प्रथम टोमॅटो शिजवून घ्या ते गार  झाले कि त्याची प्युरी करून घ्या. 

२. कढईत  किंवा पॅन मध्य तेल गरम कंद कांदा लसूण परतून घ्या. परताना कांदा  गुलाबी व्हायला लागला की  त्यात थोडी मिरचीची पूड आणि मीठ चवीनुसार घालून जरासा परता 

३. त्यात टोमॅटो प्युरी मिक्स हर्ब्स घाला आणि अर्धा कप  पाणी घाला. आणि एक उकळी येऊ द्या. उकळी आल्यावर गॅस बंद करा. 

पास्ता कृती 

१. प्रथम पाणी उकळत ठेवा,त्यात मीठ घाला,पाण्याला उकळी आली की त्यात पास्ता घालावा साधरण आठ-ते दहा मिनटे पास्ता शिजवावा. पास्ता अति शिजवू नये 

२. पास्ता मऊसर झाला की  तो चाळीत घेऊन पाणी गाळून घ्यावे. 

३. थोड्याश्या तेलावरकिंवा बटर वर भाज्या ५ मिनटे परतून घ्याव्यात 

४. उकडलेला पास्ता एका भांड्यात घेऊन (पाणी पूर्ण निथळयावर) त्यात वरील भाज्या तयार  केलेला टोमॅटो सॉस आणि बटर घालावे 

५. त्यानंतर यावर चीज किसून घालावे आणि गरम गरम खावा. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon